दूध व्यवसायाची माहिती – Dairy Farming : शेती हा तर पूर्वीपासूनच चालत आलेला शेतकऱ्यांसाठी एक पूरक व्यवसाय आहे. शेतकरी हा शेती तर करतोच परंतु जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतो. दुधासाठी गाई,संकरित गाई, देसी गाई, दुधाळ गावठी गाई आणि म्हशी पाळल्या जातात. दूध व्यवसाय हा धंदा आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो म्हणून शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतो.
दुधाला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. दुध आपल्या दैनंदिन जीवनातील लागणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुधाचा व्यवसाय छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. दूध व्यवसाय करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास,चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्या अंगी असणे गरजेचे आहे. दूध व्यवसायासाठी आपण चांगल्या गाईंची किंवा म्हशीची निवड करतो. तर गाईंमध्ये अनेक वेगवेगळ्या जाती असतात. जसे की गिरगाय, मालवी गाय, निमाडी गाय, डज्जल गाय, नागोरी गाय, लाल सिंधी गाय, थारपारकर गाय, सहिवाल गाय, लाल कंधारी गाय अशा अनेक प्रजाती असतात.
तसेच म्हशीच्या वेगवेगळ्या जाती पाहिल्या तर मुरा म्हशी, सुरती म्हैस, मेहसाणा म्हैस तर म्हशिंमध्येसुद्धा वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. दूध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या शेतातली सर्व कामे करावी लागतात. आणि शेतातील कामे आवरली की, शेतकरी दुधासाठी गाय किंवा म्हशी किंवा बकरी जे काही असेल तर त्यांची योग्यरीत्या व्यवस्था करतो, त्यांना राहण्यासाठी गोटा तर पाहिजे असतो. गोठा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. गाई म्हशींना राहण्यासाठी एक आदर्श गोटा असणे गरजेचे आहे. गोठा असावा की त्यांना त्यामध्ये मोकळी जागा असायला पाहिजे.
शेतकरी हा शेती व्यवसाय तर करतोच परंतु जोडधंद्यासाठी दूध व्यवसाय सुद्धा करतो. तर दूध व्यवसाय शेतीला एक जोडधंदा असे का म्हणतात.कारण आपल्या शेतीत आपण गायना किंवा म्हशिंना लागणारा चारा तयार करून दूध व्यवसायामध्ये लागणाऱ्या खर्चाची मोठी बचत करू शकतो. आपण गाय व म्हशींचे पालन करतो. आणि त्यापासून आपल्याला शेणखत सुद्धा मिळते, जे की आपल्या शेतीसाठी पूरक असते. शेणखताचा वापर करून शेतीमध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतो.
सध्याच्या स्थितीत आपण बघितले तर निसर्गाचे वेगवेगळे बदल, पाण्याची कमतरता, या सर्व कारणांमुळे शेतीमध्ये सुद्धा काही व्यवस्थित पिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला दूध व्यवसाय हा पूरक ठरू शकतो.
दूध व्यवसाय कसा सुरु करायचा?
कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्यातील बारकावे समजून घेणे आवश्यक असते. तसेच दुध व्यवसायाच्या बाबतीतही आहे. दूध व्यवसायासाठी चांगल्या प्रजातीच्या गाई आवश्यक असतात. म्हशी असल्यास त्या सुद्धा चांगल्या प्रजातीचा असणे गरजेचे आहे. दूध व्यवसाय करण्यासाठी जनावरांचे खाद्य, पाण्याचे नियोजन, चारा नियोजन अशा अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. गाईंमध्ये वेगवेगळ्या प्रजाती असतात. गाई निवडताना चूक झाली तर, दूध व्यवसायात मोठे नुकसान होते. गाईंची योग्य निवड केल्यास आपला दूध व्यवसाय फायदेशीर राहतो. दूध व्यवसायासाठी जातिवंत व निरोगी गाई आवश्यक असतात.
गाई व म्हशी पाळत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याचे व्यवस्थापन करावे लागते. दूध व्यवसायामध्ये चाऱ्याचे व्यवस्थापन आणि नियोजन योग्यरीत्या होणे गरजेचे असते. दूध व्यवसायातून आपल्याला भरपूर नफा मिळतो. जर आपण चाऱ्याचे व्यवस्थापन आपल्या शेतात केले तर आपली खूप मोठी बचत होते.आपल्या शेतामध्ये घास गवत किंवा हिरवा चारा तयार केल्यास गायी व म्हशींना पौष्टिक आहार मिळते. जर आपण गाई व म्हशींना पौष्टिक आणि सकस आहार दिला तर त्यांच्या दुधाच्या क्षमतेत वाढ होते. त्यामुळे आपला धंदा सुद्धा व्यवस्थित चालतो. दूध व्यवसाय आणि शेती व्यवसाय हे दोन्ही एकमेकांशी संलग्न व्यवसाय आहेत.
दूध व्यवसायामध्ये खात्रीपूर्वक आणि भेसळ विरहित दूध जर आपण ग्राहकांना दिल्यास आपल्या दुधाला चांगला दर मिळतो.जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करायचा असला तर आपण दूध कंपन्यांना दुधाचा मोठा पुरवठा करू शकतो. कोणत्याही व्यवसायात नफा कमवणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय शोधणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शेतीला दूध व्यवसाय हा एक जोडधंदा म्हणून केला जाऊ शकतो.
दूध व्यवसायाचे फायदे कोणते आहेत?
दूध व्यवसाय करून आपल्या शेतीसाठी शेणखत मिळते. गाईचे गोमूत्र हे पिकावर फवारण्यासाठी उत्तम असते.उरलेल्या दुधापासून दही, तूप, खवा,पनीर तयार करून आपण त्यांचाही व्यवसाय करू शकतो.गाईच्या गोमूत्राचा वापर देवाच्या पूजेसाठी सुद्धा केला जातो.गाईच्या शेणापासून उत्तम असे सेंद्रिय खत तयार होते.आणि शेंद्रीय खतामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढते.तसेच दुग्धजन्य पदार्थांची मागणी आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दुध व्यवसाय करणे फायदेशीर ठरेल.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles