आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सातवा संसदीय बजेट प्रस्तुत केला या बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टर साठी वेगवेगळ्या वेगवेगळे संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी नवनवीन योजना या बजेटच्या दरम्यान सादर केलेले आहेत आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत बजेट मधील महत्त्वाचे हायलाइट्स.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा नऊ गोष्टींना देणार नेहमी प्राधान्य:
अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा बजेट प्रस्तुत करत होत्या तेव्हा त्यांनी नऊ गोष्टींना प्रथम प्राधान्य देण्याचे सांगितले आहे त्या गोष्टी खालील प्रमाणे:
- शेतीसाठी समर्थन आणि उत्पादकता वाढवणे.
- देशातील युवकांसाठी रोजगार देणे तसेच कौशल्य वाढवणे
- नागरी विकास व तसेच शहरी विकास
- विकास, संशोधन आणि नवीन उपक्रम
- येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षा प्रदान करणे
- देशातील जनतेला पायाभूत सुविधा देणे
- ऊर्जा सुरक्षा याची घोषणा केली
- मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
- सेवा आणि उत्पादन क्षेत्र यामध्येही बदल घडून आणणे.
वरील सेक्टर मध्ये निर्मला सीतारमण यांनी नवीन काहीतरी करणे अशी घोषणा दिलेली आहे आणि त्यामध्ये नवनवीन करण्यासाठी प्राधान्य देखील दिले आहे.
5 वर्षात 4.1 तरुणांसाठी लक्ष केंद्रित केले जाणार:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट प्रस्तुत करत असताना येणाऱ्या पाच वर्षांमध्ये 4.1 तरुणांसाठी रोजगार कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यमवर्ग यांच्यावर भर देणार आहे. अशी घोषणा देखील निर्मला सीतारमण यांनी केलेली आहे.
शैक्षणिक 10 लाखापर्यंत कर्ज देण्याची मदत:
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शैक्षणिक लोन 10 लाखापर्यंत मदत देण्याची घोषणा देखील या बजेटमध्ये केलेली आहे त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक लोन काढायचे आहे त्यांना मदत होऊ शकते यामध्ये त्यांना 10 लाखापर्यंत कर्ज शिक्षणासाठी मिळू शकतो.
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका महिन्याचा पगार दिला जाईल:
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका महिन्याचा पगार देण्याची घोषणा केलेली आहे जो कोणी पहिल्यांदा एखाद्या कामावर जाईल तेथे त्याला एका महिन्याचा पगार भारत सरकार कडून देण्यात येणार त्यासाठी त्या कामगाराला गव्हर्मेंट च्या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
वर्कफोर्स महिलांसाठी वसतिगृह आणि भागीदारी वाढवणे:
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्कफोर्स महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचे आणि तसेच त्या कामांमध्ये महिलांचे भागीदारी वाढवण्याचे घोषणा केलेली आहे.
3 कोटी नवीन घरे उभारणार:
निर्मला सीतारमण यांनी 3 कोटी नवीन घरी उभारण्याची घोषणा केलेली आहे व तसेच 3 लाख कोटी रुपये महिलांना यातून फायदा होणार आहे.
एमएसएमई साठी कर्ज योजना:
निर्मला सीतारमण यांनी MSME साठी 100 कोटी रुपये पर्यंतचे गॅरंटी फंड देणारी योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे यामध्ये वेगवेगळे उपकरणे आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी मदत होईल.
निर्मला सीतारमण यांच्या काही ठळक घोषणा:
- शहरातील घरे बांधण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची घोषणा
- पावसामुळे प्रभावित राज्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा
- आयकर नियमांची तपासणी करण्याची घोषणा
- पर्सनल इन्कम टॅक्स वरती मोठी घोषणा
- नवीन इन्कम टॅक्स रिजिम मध्ये बदलाव केला.
सूचना: आजच्या बजेट मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वरील सर्व घोषणा केलेली आहे ज्या घोषणा महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी नाहीत त्यांना आपण येथे कव्हर केलेले नाही.
My Name is Jagdish Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles