चांदीपूरा व्हायरस चा प्रभाव गुजरात राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे, या संसर्ग मुळे तज्ञांचे आडचणी वाढत आहे. गुजरात मध्ये या आजाराचे 50 रुग्ण आढळून आले होते त्यापैक 16 जणांनाआपले जीव गमावावे लागले आहे, तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातूनही 3 रुग्ण समोर आलेले आहेत.
लोकांमध्ये का आहे भीतीचे वातावरण?
या विषाणूच्या संसर्गामुळे तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोम (AES) धोका दिसून येतो. या विषाणूच्या संसर्गामुळे मानवी मेंदूला सूज येणे अश्या वेगवेगळ्या समस्या रुग्णांना होत असतांना दिसतात. यामुळे लोकामध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहेत. 15 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये मागील 3 महिन्यामध्ये 78 रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी गुजरात राज्यात जास्त रुग्ण आहेत व तसेच या रुग्णांचे मृत्यू दरही जास्त आहेत.
चांदीपूरा व्हायरस का आहे धोकादायक?
हा व्हायरस Rhabdoviridae प्रकारातील एक व्हायरस आहेत. हा व्हायरस दुर्मिळ आहे परंतु या व्हायरस चे मृत्यू दर 56 ते 75 टक्के एवढे दिसून येते. या व्हायरस चे प्रमुख लक्षण ताप किंव्हा फ्लू सारखे असते परंतु या पासून एन्सेफलायटीस होण्याचा धोका असतो परिणामी रुग्ण कोमात जातात किंव्हा रुग्णाचे मृत्यू देखील होऊ शकतो.
या व्हायरस पासून कशा बचाव करू शकतो?
हा आजार दुर्मिळ असल्यामुळे यावर प्रभावी उपचार नाहीत म्हणून, ज्या ठिकाणी हे व्हायरस दिसून येत आहेत अश्या भागातील शेतात किंव्हा झाडी झुडपांमध्ये जाणे टाळावे, या संसर्गाचे लक्षण आढळून आल्यास त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे कारण वेळीच उपचार घेतल्यास मेंदूला होणारी इजा टळू शकते.
Also Read :
नाकावरील ब्लॅकहेड्स मुळापासून नष्ट कसे होईल
My Name is Jagdish Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles