शेतकरी शेतीसाठी कोणती साधने वापरतात : सध्या शेतीमध्ये आधुनिकतेचे वारे वाहत आहे. शेतकरी आता आत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक प्रकारचे यंत्राचा वापर करून शेती करत आहे. व शेतामध्ये यंत्राचा वापर केला तर वेळेची आणि पैशांची बचत तर होतेच परंतु त्यात उत्पन्नातही वाढ होण्यास मदत मिळते. या लेखामध्ये आपण भात शेती व इतर उत्पन्नास लागणाऱ्या काही आवश्यक यंत्राच्या बद्दल जाणून घेणार आहोत.
रिपर यंत्र
आपल्या देशात आधुनिक यंत्राचा वापर शेतीसाठी जास्त केला जात आहे. ज्या द्वारे आपण अधिक अधिक पिके घेतो आणि नंतर त्याची कापणी करतो. पिकांची कापणी करणे हेही मोठे काम आहे. व यात जास्त वेळ आणि मेहनत लागते. परंतु पिक काढण्यासाठी रिपर बाईंडर मशीन वापरून हे काम सहज करता येतो. हे मशीन फक्त पीक कापण्यासाठी तयार केला आहे. साधारणपणे पीक कापण्यासाठी हे मशीन दोन प्रकारची अधिक लोकप्रिय आहेत. या मध्ये पहिला प्रकार; हाताच्या साह्याने चालवणे व दुसरा प्रकार; ट्रॅक्टर ला जोडून चालवणे. रिपर यंत्राचे पुढील काही प्रकार पडतात.
- ट्रॅक्टर रिपर मशीन
- स्ट्रॉ रिपर मशीन
- हॉड रिपर बाईंडर मशीन
- स्वयंचलित रिपर मशीन
- रिपर मशीनच्या मागे चालणे.
रिपर यंत्र व त्याचे इंजिन
स्वयंचलित भात कापणी व गहू कापणी यंत्र (रिपर) या यंत्रामध्ये भात व गहू कापण्यासाठी कटर बसवले असून स्टार व्हील आणि बेल्ट मुळे कापणी चालू असताना गहू उत्पन्न व भात उत्पन्न हे एका बाजूला टाकले जातात. व कापले जाणारे पीक एका रांगेत पडतात. त्यामुळे बांधनीचे काम सोपे होते. या रिपर यंत्राच्या इंजिनचा विचार केला तर या यंत्रावर 3.5cc चे शक्तिशाली पेट्रोल इंजिन असून हे इंजिन यंत्राला व त्यातील चाकाला गिअर बॉक्स द्वारे शक्ती संक्रमण होते. या रिपर यंत्राचे वजन फक्त 225 किलो असून त्याच्या कटर बरची रुंदी 1.2 मीटर असते. हा यंत्र भाताची किंवा गव्हाची कापणी करीत असताना 11 सेंटीमीटर उंची पासून करतो. जर जमीन पाण्याने भिजलेली असेल तर यंत्राला चालवणे सोपे व्हावे म्हणून केज विल बसवता येतात. या यंत्राचा वेगाचा विचार केला तर हा यंत्र ताशी वेग 2.5 km चालतो.
शेती कामासाठी लागणारी काही यंत्रे
- ट्रॅक्टर
- नांगर
- Combined हार्वेस्टर
- रोटव्हेटर/रोटरी टिलर
चला तर जाणून घेऊया या वरील यंत्राचे वापर शेतकरी कशाप्रकारे करतो.
ट्रॅक्टर :-
ट्रॅक्टर हे आधुनिक शेतीचा कणा आहे. आणि त्याने शेती पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. कारण या यंत्राचा उपयोग शेतकरी खूप जास्त करतो. ट्रॅक्टर चा उपयोग नांगरणी करण्यासाठी, शेत भुसभुशित करण्यासाठी, ट्रॉली चालवण्यासाठी आणि पेरणी करण्यासाठी व अनेक काम करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो.
नांगर :-
नांगर या यंत्राचा वापर, शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीने करतो. या यंत्राचा वापर शेतकरी शेती तयार करण्यासाठी वापरतो. जेणेकरून शेतकरीला शेत तयार करण्यास जो वेळ लागतो तो वेळ वाचवण्यासाठी या यंत्राचा वापर केल्या जातो. नांगरा चे 6 प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.
- मोल्ड बोर्ड नांगर
- डिस्क नांगर
- माती काढणारा नांगर
- राईजर नांगर
- ट्रल फ्रेम्स/कॅरियर्स मो बोर्ड नांगर
- नांगरणी स्पिप नांगर
हे वरील यंत्रे माती तोडण्यासाठी डिझाईन केलेले सुधारित अवजारे आहे.
Combined हार्वेस्टर :-
शेतकरी साठी हा हार्वेस्टर खूप उपयोगी पडणारा यंत्र आहे. कारण हार्वेस्टर चा वापर शेतकरी गहू, ज्वारी, सोयाबीन, बाजरी, सूर्यफूल, तांदूळ, मका या अनेक धान्य पिकांना कापण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. शेतकरीला एका एकर मध्ये असलेल्या पीक कापण्यास 2 ते 3 दिवस लागतात. तेच पीक कापण्यासाठी 2 ते 3 तासांमध्ये शेतकरी या यंत्राच्या साह्याने हे काम सहज करू शकतो.
रोटाव्हेटर किंवा रोटरी टिलर :-
रोटाव्हेटर किंवा रोटरी टिलर हे एक आवश्यक मशागतीचे उपकरण आहे. या उपकरणाचा वापर शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो. हा यंत्राचा वापर शेतकरी जमिनीतील मातीला वर काढण्यासाठी किंवा भुसभुशीत करण्यासाठी करतो.रोटाव्हेटर, या यंत्राला रोटरी टिलर म्हणूनही ओळखले जाते, हा यंत्र कापून, उल्व्हा राइजिंग, मिक्सिंग आणि माती सपाट करून जमीन नांगरण्यासाठी ब्लेडच्या मालिकेचा वापर केला जातो. व शेतातील अनेक कामासाठी वरील असणारे यंत्रे शेतकरी साठी खूप फायदेशीर ठरतात.
My Name is Satyanews Web Desk, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Dynamic Articles