Causes Of Unhealthy Lifestyle : खूप सारे असे रोग आहेत की जे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण त्यांना आमंत्रण देतो.आणि आज कालची जी मॉडर्न जीवनशैली आहे.त्यामुळे आपण वेगवेगळे विचार करत असतो,की आजकालची जीवनशैली आहे ती खराब आणि चुकीची आहे.कारण या जीवनशैलीमुळे आपल्याला खूप कमी वयातच वेगवेगळे आजार होऊ लागलेले आहेत.आपल्याला असलेल्या आहार विहाराच्या सवयी आपले आरोग्य चांगले ठेवायचे की बिघडवायचे यासाठी कारणीभूत असतात. आपण अनेक गोष्टींमुळे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असतो. जसे की महिलांच्या बाबतीत म्हणायचे असेल तर महिलांना कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी लागते. काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे राहून जाते. घरातली कामे स्वयंपाक करणे, हे सर्व करता करता महिलांचे स्वतःकडे खूप दुर्लक्ष होते. पाहूया तर कोणत्या जीवनशैलीकडे लक्ष न दिले तर आपल्या जीवावर बेतू शकते.
प्रतिकारशक्ती :
हवामानातील बदलासी किंवा इतर कोणत्याही रोगाशी लढायचे असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय केले पाहिजे तर नियमित व्यायाम, चांगला आहार आणि आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर, आपल्याला वेगवेगळ्या गंभीर आजारांचा सामना करावा लागेल. त्यासाठी प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे.
लठ्ठपणा :
लठ्ठपणा ही आता सध्या जगभरातील एक मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीस, बीपी हृदयरोग, यांसारखे बरेच आजार होतात. हे सर्व कशामुळे होतात तर, आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोप पूर्ण न होणे, व्यायामाचा अभाव, कौटुंबिक ताण तणाव यामुळे सुद्धा लठ्ठपणा होऊ शकतो. आणि हा लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यासाठी आपले वजन जर वाढत असेल तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
मानसिक आजार :
मानसिक आजार हा जगभरातील सर्वच लोकांना होऊ लागला आहे. मानसिक आजाराचे कारण फक्त नैराश्य. नैराश्यामुळे सर्व लोकांना मानसिक आजार होत आहे. निराशामुळे जगात दररोज शेकडो लोक आत्महत्या करतात. तर आपल्या जवळच्या व्यक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. की आपल्या जवळची व्यक्ती नैराश्यात आहे का?
अकाली वृद्धत्व :
हालचाल न केल्याने अन्नाचे पोषण होत नाही. आणि पचनासी निगडित किंवा इतरही समस्या निर्माण होऊ शकतात. सतत एकाच ठिकाणी बसून राहणे, आणि शरीराची हालचाल न करणे, अशा लोकांना लवकरच अकाली वृद्धत्व येऊ शकते. त्यासाठी आपल्या शरीराची हालचाल केली पाहिजे. आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
कोणताच आजार होऊ नये आणि चांगले आरोग्य रहावे यासाठी आपण काय केले पाहिजे?
आपण अनेक रोगांना निमंत्रण देऊ शकतो. चांगला आहार,पुरेशी झोप,दररोज व्यायाम आणि जास्तीत जास्त पाणी पिणे महत्त्वाचे आहे. हे सर्व एक चांगल्या आणि निरोगी जीवनशैलीचे भाग आहेत. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. हाय ब्लड प्रेशर, एलर्जी,लठ्ठपणा,सांधेदुखी,तणाव,हाय शुगर, टीबी, अशक्तपणा आणि दमा ही सर्व रोगांची लक्षणे आहेत. तर आपले आरोग्य कसे चांगले राहील. यासाठी आपण नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगला आहार घ्यायला हवा.
निरोगी राहण्यासाठी वेळेवर काम करावे तसेच वेळेवर नाश्ता सुद्धा करणे महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी सकाळी सगळ्यांनी योग्य वेळी नाश्ता करण्याची सवय लावली पाहिजे.नाश्त्यामध्ये फळे,दूध,अंडी आणि लोणी घ्यायला पाहिजे.
निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे महत्त्वाचे आहे. तर बरेच लोक हे सकाळी सर्वात पहिले चहा पितात. असे बघितले तर चहा पिणे ही सवय चांगली नाही. तर एका दिवसात सुमारे पाच ते सहा लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. आणि ते प्यायला हवे.
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे.सकाळी लवकर उठणे आणि वेळेवर झोपणे यामुळे फक्त शारीरिकच फायदा होत नाही तर, यामुळे बरेच मानसिक फायदेही होतात. शिस्तबद्ध जीवन जगल्याने देखील आपण केवळ निरोगी राहतो असे नाही तर आपल्याला आनंद देखील वाटते.
सुदृढ शरीर ही एक देणगी आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळेच इतकं गतिमान झाला आहे की, आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आपलं शरीर सुदृढ असणं महत्त्वाचे आहे. पैशांच्या बाबतीत बघितले तर पैसे खर्च झाले आणि आपल्याकडील पैशांची बचत शून्यावर आली. की पैसे सांभाळून ठेवावे. आणि त्यांना जपून वापरावे. हे आपल्या लक्षात येते. तसेच जोपर्यंत आपल्याकडे सदृढ आणि निरोगी आरोग्य असते तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नसते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष दिले पाहिजे. तर निरोगी आरोग्यासाठी लवकरात लवकर चुकीच्या सवयी बदलल्या तरच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles