पीएम किसान सम्मान निधी योजना १७ हप्ता कधी येणार

पीएम किसान सम्मान निधी योजना १७ हप्ता कधी येणार

पीएम किसान सम्मान निधि योजना : जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण या योजनेमध्ये 17 व्या हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी लाभार्थी आहेत हे समजून येईल आणि 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार याची माहिती मिळणार आहे.

या योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना जवळजवळ 200 कोटी रुपये एवढी मदत केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत आलेले आहे तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेच्या सतराव्या हप्त्या कडे आहे, तर चला मग जाणून घेऊया केव्हा मिळणार आहे हा हप्ता आणि फक्त कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जाणून घेऊया या लेखामध्ये.

अंतर्गत या योजनेचा कुणाला होणार आहे फायदा ?

आतापर्यंत केंद्र सरकारने 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि आता शेतकरी वर्ग सतराव्या हप्त्या कडे लक्ष लावून आहेत, त्यामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आता या योजनेचा लाभ फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी या योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण केलेले आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना या योजनेतून सतराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

केव्हा येणार 17 वा हप्ता ?

काही मीडियाच्या रिपोर्टनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 हप्ता येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु याविषयी अधिकृत माहिती आतापर्यंत मिळालेली नाही तसेच याची सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.

तरीही आमच्या माहिती नुसार मतदानाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच जून किंवा जुलै महिन्यात सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

हे शेतकरी असणार अपात्र ?

  • ई-केवायसी : ई-केवायसी न करणारे शेतकरी या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार नाही
  • एक लाभार्थी : जर या योजनेमध्ये एका परिवारातील एकापेक्षा अधिक लोक लाभ घेत असतील तर या योजनेअंतर्गत त्यांना हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
  • सरकारी नोकरी : जर लाभार्थी एखाद्या सरकारी नौकरीचे लाभ घेत असेल तर या योजनेमध्ये अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहे.
  • भूमिहीन शेतकरी : जे शेतकरी भूमिहीन आहेत अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे लाभ या योजनेअंतर्गत मिळणार नाही.

One thought on “पीएम किसान सम्मान निधी योजना १७ हप्ता कधी येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *