चंदन शेती लागवड कशी करावी : आजच्या लेखामध्ये आपण चंदन शेती लागवड विषयी बघणार आहोत.चंदन लागवडीसाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व जमीन लागवडी साठी योग्य आहे. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी लागते.
चंदनाचे दोन प्रकार आहेत
एक रक्तचंदन आणि एक श्वेत चंदन. चंदन हे परबजीवी असल्यामुळे त्याला सोबत दुसरं झाड लावावे लागते. जसे कडुलिंब,आवळा,आंबा आणि चिकू विश्वरूपी पद्धतीने चंदनाचा लागवड करू शकता.
चंदन हे परबजीवी असल्यामुळे आवळा सिताफळ,कडुलिंब आणि आंबा अशा आपण शेजारी जी पिक लावलेली आहे. त्या पिकांच्या मुळांमधून चंदन आपलं अन्न शोषण करून स्वतःची उपजीविका भागवतो. त्याच प्रमाणे तुर,गहू बाजरी आणि कांदा ही पीक आपण चंदन शेतीत आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. प्रमाणे आंबा सिताफळ अशा जुन्या भागांमध्ये सुद्धा चंदनाची लागवड करू शकता.
चंदनाची लागवड करत असताना शेणखत आणि पंधरा पंधरा हे खत देऊ शकता त्याचप्रमाणे लागवडीपासून पहिल्या वर्षी भरपूर पाणी देऊ शकता. त्यामुळे सुरुवातीला झाडाचा आकार मोठा होतो. चंदन ही वनस्पती जंगली असल्यामुळे जास्त काही खताची मात्रा लागत नाही ,परंतु आपल्याला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी पहिल्या चार वर्षे शेणखत,गांडूळ खत झाडांचा कुजलेला पाला पाचोळा अशी खत देणे गरजेचे असते. त्याच प्रमाणात झाडाची चांगल्या वाढण्यासाठी 10 26 26 ,15 15 ,18 46 अशी खत अधून मधून देऊ शकता.
सुरुवातीचे पाच वर्ष भरपूर प्रमाणात पाणी दिलं तरी चालत. परंतु पाच वर्षा नंतर चंदन पिकाला जास्त पाणी द्यायचं नाही, कारण आपल्याला हाडवूड करण्यासाठी मदत होते, चंदनाची लागवड जून ,जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपण करू शकता सरासरी चंद न रोपाची भाव 6 ते 1 फूट असल्यास 30 ते 50 रुपया त मिळतं आणि 1.5 ते 2 फूट असल्यास 50 किंवा 90 रुपयात मिळते.
त्याचप्रमाणे होलसेल मध्ये घेतली तर 2 फुटापर्यंतची रोप 35 ते 40 रुपये पर्यंत मिळतील. मिलीया डुबिया मार्केट 20 ते 30 रुपये होलसेल मध्ये 16 ते 18 रुपये पर्यंत मिळू शकते चंदनाची लागवड करत असताना साधारण 10*10 फुटावर लागवड करावी लागते आणि मधल्या पाच फुटामध्ये मीलिया डुबिया लावावा लागतो.एकरी 225 चंदन 425 निधिया डुबया सर्वप्रथम1*1 चा खड्डा करून त्यात कंपोस्ट टाकून रोप लावावे.
ही जंगली शेती असल्यामुळे नंतर फवारणी खताची गरज नसते. वर्षातून दोनदा निंबोळी खत द्यावे सुरुवातीचे तीन वर्ष ड्रीप ने पाणी द्यावे त्याचप्रमाणे जर आपल्याला चांगलं पी क अपेक्षित असे तर 10 26 26 दर सहा महिन्याला 200 ते 250 ग्राम प्रति झाडाला देऊ शकता, आणि जसं वय वाढल तसं 50 ग्रॅम दरवर्षी ऍड करू शकता.
चंदन शेती विषयक माहिती
चंदनाचे एक झाड साधारण त 8 ते 10 वर्षांमध्ये 1500 ते 2500 किलोग्रॅम पर्यंत गाभा निघतो. त्याचा सरासरी आजचा भाव 9 000 ते 10000 किलो आहे. आणि आज जर आपण लागवड केली तर आपल्याला पंधरा ते वीस हजार पर्यंतचा भाव मिळू शकतो. चंदनाच्या बिया आपल्याला तीन वर्षानंतर उत्पन्न देण्यास सुरू होतात.
500 ते 700 भाव आपल्याला या बियांपासून मिळू शकतो. 2 ते 3 किलो बिया प्रति झाडापासून आपल्याला मिळतात. क्लासिक सुवासिक तेल कंपन्या या बियांना विकत घेतात. मिलीया डुबिया पासून लाईव्ह एक झाड पाच वर्षांमध्ये आठ हजार ते अकरा हजारांमध्ये विकले जाते.
खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा असतो चंदनाचा लागवड करू झाड तयार करू परंतु ते विकलं कुठे जातं त्यासाठी विक्री आणि उत्पा दन उत्पन्न याविषयी सविस्तर माहिती घेऊया चंदन विक्रीसाठी आपण मैसूर सॅंडल कर्नाटका यांच्याशी संपर्क करू शकता यांच्याकडे चंदनासाठी खूप डिमांड आहे ते त्यांच्या मते फक्त दोन ते तीन टक्के पुरवठा त्यांना होतो तसेच इतरही भरपूर कंपन्या आहे किंवा स्वतः उत्पादन कंपनी टाकू शकता सरकार चंदन तेलावरती सुद्धा उत्पादनासाठी सबसिडी देतो.
दुसरा शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न चंदनाची रोप कुठे मिळतील तर ते अंकुर हायटेक नर्सरी लातूर यांना संपर्क करून चंदनाच्या रोपण विषयी सविस्तर माहिती घेऊ शकता प्रति रोप आपल्याला साधारण 40 ते 50 कृपया मध्ये मिळू शकतो.
My Name is Satyanews Web Desk, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Dynamic Articles