आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय : नमस्कार आज आपण अर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे आणि ते कशाप्रकारे काम करते याची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अशा प्रकारचा विज्ञान आहे ज्यामध्ये मशीन आपल्यासारखे विचार करू शकतात आणि आपल्यासारखे कामही करू शकतात किंवा आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे दिलेले काम करू शकतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक प्रोग्राम असतो ज्याला कम्प्युटरच्या कोडींग द्वारे बनवले जाते आणि त्या प्रोग्रामला खूप सारी माहिती दिली जाते.

जसे की पॅटर्न समजून, घेणे योग्य निर्णय घेणे, इमेजेस समजून घेणे त्यामध्ये काय फरक आहे हे समजून घेणे, अशाप्रकारे विविध माहिती या प्रोग्रामला दिली जाते आणि त्यानंतर हा प्रोग्राम त्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतो आणि दिलेले काम अतिशय चांगल्या प्रकारे  सटीक पणे पूर्ण करत असतो.

तर तुमच्या लक्षात आले असेल की आर्टिफिशल इंटेलिजन्स काय असतो आणि तो कसा बनवला जातो. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स-3

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशी कार्य करते 

आता आपण समजून घेऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशाप्रकारे काम करत असतो. जी माहिती आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला देत असतो ती माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप चांगल्या प्रकारे समजून घेत असतो आणि त्यातून त्याची विचार करण्याची आणि काम करण्याची क्षमता वाढवून घेत असतो.

जेव्हा आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बनवत असतो तेव्हा त्यास वेगवेगळे गणितीय समीकरण म्हणजेच अल्गोरिदम  त्याला आपण शिकवतो त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या अल्गोरीदम चा वापर करून योग्य उत्तर आपणास देत असतो.

जेव्हा जेव्हा नवीन माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला मिळत असते तेव्हा तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वतः शिकत जातो आणि स्वतःच्या चुका समजून दुरुस्त करत असतो.

जर आपण आर्टिफिशल इंटेलिजन्स ला एखादी इमेज बनवायला सांगितले किंवा काही लिहायला सांगितले तर तो स्वतःच त्या जवळ असलेल्या माहितीच्या आधारे कल्पना करतो आणि चांगल्या प्रकारे त्याचा आउटपुट आपणास देण्याचा प्रयत्न करतो. जेवढी माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जास्त असेल तेवढे आऊटपुट योग्य असेल.

तर वरील गोष्टींच्या आधारे  आर्टिफिशिअल इंटेलिजेंस काम करत  असतो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स-4

AI चे उपयोग काय आहे 

तर चला आता आपण समजून घेऊया आपल्या जीवनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स का महत्वाचे आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स या डिजिटल युगामध्ये खूप महत्त्वाचे आहे कारण ते खूप महत्त्वाचे कामे करू शकतो जसे की फसवणूक  शोधून काढणे, जर कोणी व्यवसाय करत असेल तर त्यासाठी योग्य ग्राहक शोधून देणे आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे तसेच ग्राहकांच्या समस्याचे समाधान करणे हे काम देखील आर्टिफिशल इंटेलिजन्स करू शकतो. 

आणि काही क्षेत्र अशी आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यापेक्षाही चांगल्या प्रकारे काम करू शकतो जसे की एखादी गोष्ट किंवा माहिती शोधणे एखादे काम जे पुन्हा पुन्हा केले जातात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे  फायदे 

आता आपण समजून घेऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे  वेगवेगळे फायदे आपल्याला मिळू शकतात.

वैद्यकीय क्षेत्र :

वैद्यकीय क्षेत्रामध्ये अर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला डॉक्टरांपेक्षाही चांगल्या प्रकारे कॅन्सर सारख्या आजाराचे निदान करू शकतो.

बँकिंग क्षेत्र :

बँकिंग क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप सारी माहिती अगदी कमी वेळेमध्ये प्रोसेस करू शकतो जसे की जे लोन दिलेले आहेत त्याची माहिती प्रोसेस करणे वेगवेगळे व्यवहार कमी वेळेत पूर्ण करणे आणि माहितीच्या आधारे जी सद्यस्थिती आहे ती दाखवणे अशी खूप सारी कामे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बँकिंग क्षेत्रामध्ये करतो आहे.

सुरक्षा क्षेत्र :

सुरक्षा विषयी बोलायचे झाले तर दोन प्रकारच्या सुरक्षा असू शकतात एक म्हणजे डिजिटल युगात ऑनलाइन सुरक्षा आणि दुसरे म्हणजे भौतिक जीवनात असणारी सुरक्षा ऑनलाइन सुरक्षेमध्येही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपणास सूचित करू शकते की काही ज्या गोष्टी ज्यामुळे आपली ऑनलाइन सुरक्षा संपुष्टात येत आहेत आणि त्या आपण सुधारू शकतो.  आणि बहुतेक सुरक्षा बद्दल बोलायचे झाले तर जर कोणी स्फोटक वस्तू कुठे ठेवत असेल तर ती माहिती देखील आर्टिफिशल इंटेलिजन्स आपल्याला खूप कमी वेळेमध्ये सांगू शकतो आणि त्यावरील उपाय देखील तो सांगू शकतो अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या भौतिक सुरक्षा आहेत त्यामध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला मदत करू शकतो.

Cost Effective :

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीही न थकता काम करू शकतो आणि जेवढ्या जास्त प्रमाणात  काम करत जाईल तेवढी त्याची क्षमता सुधारत जाते अतिशय कमी लेबर चा वापर करून देखील आपण खूप जास्त काम करून घेऊ शकतो आणि कमी वेळेमध्ये जास्त आर्थिक फायदा आपण करून घेऊ शकतो कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही काम स्वतःहून करून घेत असतो जेथे कोणत्याही मनुष्य  बळाची गरज नसते त्यामुळे पैसाही वाचतो वेळही वाचतो आणि आपले काम खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्यातून खूप जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो.

व्यवसाय :

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मोठ्या व्यवसायामध्ये खूप सारे काम करू शकतो जसे की जे ग्राहक असतात त्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रॉडक्ट ची माहिती दाखवणे सोप्या भाषेत त्या प्रॉडक्टची मार्केटिंग करणे हे काम आर्टिफिशिअल इंटेलिजन्स करू शकतो तसेच ग्राहकाला ई-मेल देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो.

अशाप्रकारे आर्टिफिशल इंटेलिजन्स चे खूप सारे फायदे आपण मिळवून घेऊ शकतो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स-2

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे नुकसान 

ज्याप्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे फायदे आपल्याला मिळू शकतात त्याच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप सारे  नुकसान हि आपल्याला पाहायला मिळतात. जसे की,

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पैसे खर्च करावे लागतात छोट्या उद्योजकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवणे जास्त महागात पडू शकते.
  • जोपर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ला खूप सारी माहिती मिळत नाही किंवा त्यामध्ये जर योग्य  अल्गोरिदम वापरले गेलेले नसेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला चुकीचे निर्णय देऊ शकतो.
  • जसे की आपणास माहित आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप सार्‍या लोकांचे काम स्वतः करून घेऊ शकतो तेही सटीक आणि कमी वेळेत याचा मोठा नुकसान असा होतो की खूप सार्‍या लोकांची नोकरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊ शकतो.
  • जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवला जातो तो कोणत्याही काम करून घेऊ शकतो परंतु काम करत असताना माणसाप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला कोणत्याही प्रकारचे भावना नसते.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणतेही चुकीचे काम करत असेल तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा   इथिक्स  नसतो त्यामुळे खूप सार्‍या लोकांना त्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

अशा प्रकारचे खूप सारे नुकसान आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे होण्याची शक्यता असते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *