गेल्या काही महिन्यात साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या कारखान्यात छापा मारला होता. व त्या कारखान्यामधून 300 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. तर आता साकीनाका पोलिसांनी केलेल्या तपासात उघड केल्यानंतर ससुन रुग्णालयात भरती असून ललित पाटील 300 कोटी पेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज मुंबई या शहरात विकले.
ससून हॉस्पिटलच्या प्रकरणात किती लोकांचा हात!
सकीनाका पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रकरणात 20 लोकांना अटक केल्याची माहिती दिली. व यात काही ड्रग्ज डिस्ट्रीब्यूटस॔चा देखील समावेश असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिलेली आहे.
ड्रग्जच्या पैशाने केली सोन्याची खरेदी :
ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोंबर पासून फरार झालेला ललित पाटील व त्यांचे मित्र दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. साकीनाका पोलिसांनी ललिताच्या अनेक गुप्त ठिकाणावर पडताळणी केल्यावर पोलिसांना पाच किलो सोने देखील मिळाले हे सोने देखील ड्रग्जच्या पैशाने खरेदी केले असे ललित च्या माणसाने सांगितले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिलेले आदेश, कोणत्या ही खात्याचे अधिकारी व पोलीस अधिकारी हे ड्रग्जच्या धंद्यात शामिल असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. व ड्रग्ज च्या धंद्यात कोणतेही पोलिसाने संरक्षण देताना आढळले तर त्या पोलिसांवर कारवाई होईल व त्या पोलिसाला नोकरीतून काढण्यात येईल असे उपमुख्यमंत्री ने आदेश दिले.
My Name is Pavan Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles