मराठा समाज हा खरोखरच मागास समाज आहे त्यामुळे या समाजालाही आरक्षण मिळायलाच पाहिजे ही भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठे उपोषण केले आणि त्या उपोषणाला यशही मिळाले, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ?
- नोंदी मिळालेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करणे.
- ज्या लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यांचा डेटा आम्हाला देणे.
- शिंदे समिती रद्द करायची नाही.
- सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.
- जोपर्यंत हा मुद्दा न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत शंभर टक्के मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे.
- महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेणे.
इत्यादी मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत.
हे दोन व्हिडिओ पहा :
या सर्व मागण्या मान्य झालेल्या असूनही काही तज्ञ लोकांचे असे म्हणणे आहे, की ह्या मागण्या जरी मान्य झाल्या असतील तरीही मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना फसवण्यात आलेले आहे.
My Name is Satyanews Web Desk, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Dynamic Articles