पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्यामुळे गावोगावी व तसेच शहरांमध्येही पिण्याचे पाणी टँकर द्वारे दिले जात आहेत त्याच प्रकारे पुण्यातील फुरसुंगी पावर हाऊस भागामध्येही सकाळी पिण्याच्या पाण्याचा टँकर आला होता. टँकर आल्यानंतर तेथील लोक पाणी भरण्यासाठी जाऊ लागले आणि पाणी भरू लागले, पाणी भरता भरता पाण्याचा टँकर चा पाईप बंद होऊ लागला.
पाणी बंद झाल्यामुळे टँकरचे चालक ते पाईप तपासण्यासाठी टँकर मध्ये पाहू लागले त्यांना दिसले की साडी पाईप मध्ये अडकल्यामुळे टँकरचे पाणी बंद झाले आहे, ते साडी काढण्याचे प्रयत्न करणारच होते की तेवढ्यात त्यांना एका महिलेची मृत अवस्थेत बॉडी त्या टॅंकर मध्ये दिसली ही घटना पुण्यातील फुरसुंगी पावर हाऊस च्या भागातील आहे.
जेव्हा महिलेची बॉडी टँकर मध्ये असल्याचे लोकांना माहीत पडले लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि ही घटना उघडकीस येताच पोलिसांना ही माहिती मिळाली तात्काळ पोलीस घटनेच्या जागी येऊन टँकर मधून महिलेची बॉडी काढून बॉडी ताब्यात घेतली आणि ती बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवून घटनेची चौकशी सुरू केली.
मृत्यू झालेल्या महिलेची ओळख कौशल्या मुकेश चव्हाण कशी आहे ही महिला उत्तर प्रदेश ची रहिवासी असून एक महिन्या पूर्वी पुण्यामध्ये राहायला आले होते. तसेच तिच्यासोबत तिचे पती आणि दोन मुले असा सहपरिवार उंद्री परिसरात राहत होते या महिलेचे पती फ्लोर इंस्टॉलर म्हणून काम करत होते.
पोलिसांच्या तपासात आढळून आले की या महिलेला एक मानसिक आजार होता व गावातील डॉक्टर आणि पुजाराकडून या महिलेवर उपचार चालू होते जेव्हा ती समोरच्या बिल्डिंग मध्ये कामाला गेली तेथे एक टँकर होते आणि त्या टॅंकर मध्ये तिने उडी घेऊन आत्महत्या केली अशी शंका केली जात आहे कारण शरीरावर कोणत्याही प्रकारचे निशान नाहीत.
My Name is Pavan Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles