सध्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम तब्येत बरोबर त्वचेवर होताना दिसून येत आहे. अनेक जण त्वचेच्या समस्येने त्रस्त आहेत.कारण हवेत विषाणू द्रव्य विरघळलेली आहेत. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषणामुळे हवेत विरघळलेल्या सूक्ष्मकण आणि रसायनांमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असलेल्या दिसून येत आहेत. सध्या हवेची गुणवत्ता सुद्धा खूप खालावलेली आहे त्यामुळे हवेतील सूक्ष्म कण, ओझोन आणि विषारी द्रव्यांमुळे प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होत आहे.
त्वचेचे संरक्षण कसे करावे :
- सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
- त्वचेची योग्यरीत्या निगा राखा.
- आवळा,अश्वगंधा,एलोवेरा,त्रिफळा अशा काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.
- विटामिन सी आणि इ यासारख्या घटकांचा आपल्या आहारात समावेश करा.
- चांगल्या दर्जाचे मॉश्चरायझर वापरा.
- चेहरा वारंवार स्वच्छ पाण्याने धुवा.
- घराबाहेर पडायचे असेल तर चेहऱ्यावर रुमाल बांधा.
त्वचा संरक्षणासाठी काही टिप्स :
1.चेहरा वारंवार स्वच्छ पाण्याने धुवा
आपण आपला चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवायला पाहिजे. कारण प्रदूषणामुळे आपला चेहरा तेलकट होतो किंवा त्वचेवर धूळ जमा होते. त्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायला हवी. बाहेरील हवेमुळे त्वचेवर धूळ जमा होते आणि चेहऱ्यावर त्याचा परिणाम आपल्याला दिसू लागते.चेहरा व्यवस्थित आणि स्वच्छ करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा.
2.घराबाहेर पडायचे असेल तर चेहऱ्यावर रुमाल बांधा :
आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर रुमाल बांधला पाहिजे. त्यामुळे चेहऱ्याचे संरक्षण होते. बाहेरील हवेमुळे त्वचेवर त्याचे परिणाम होतात. जर तुम्ही बाहेर पडताना चेहऱ्यावर रुमाल बांधला तर प्रदूषणाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही.
3.त्वचेची योग्यरीत्या निगा राखा :
आपली त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवायची असेल तर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.प्रदूषणामुळे त्वचेवर वेगवेगळे परिणाम दिसून येत आहेत. जसे की त्वचेवर मुरूम येणे, त्वचेला खाज येणे, त्वचेवर पुरळ येणे अशा खूप साऱ्या समस्या दिसून येत आहेत तर त्यासाठी आपण आपल्या त्वचेची योग्य निगा राखली पाहिजे.
4.आवळा,अश्वगंधा,एलोवेरा,त्रिफळा अशा काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करा :
जर तुम्हाला आपली त्वचा मऊ आणि सुंदर ठेवायची असेल तर काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करायला हवा. त्वचेवर आवळा,अश्वगंधा,एलोवेरा, किंवा त्रिफळा यापैकी कोणत्याही नैसर्गिक गोष्टीचा वापर केला तर चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ येत नाहीत.त्यामुळे त्वचा चमकते.
स्किन केअर टिप्स :
हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसून सुद्धा येत आहे. या दिवसात चेहऱ्यावर मुरूम येणे, पुरळ येणे, खाज येणे यासारख्या खूप सार्या समस्या दिसत आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. हवेतील विषारी द्रव्य आणि रसायनांमुळे त्वचेवर परिणाम दिसून येत आहेत. तर त्यासाठी आपण आपली त्वचा जपली पाहिजे.हवेतील प्रदूषणामुळे हवेत अनेक प्रकारचे हानिकारक घटक असतात. तर या सर्व गोष्टींपासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles