मुंबई सायबर क्राईम : या मॉडर्न दुनिया मध्ये जसे जसे इंटरनेटचे वापर वाढत आहे, त्याच प्रकारे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढतच आहेत. सायबर क्रिमिनलच्या जाळ्यात लोक येऊ नयेत म्हणून पोलिसही वारंवार वेगवेगळ्या मोहीम राबवत असतात, तरीही सायबर क्राईम काही कमी होण्याचे दिसतच नाही आहेत. अशीच घटना एका मुंबईतील व्यक्तींबरोबर घडलेली आहे(mumbai cyber crime), त्यांच्याकडून 40 लाख रुपये सायबर क्रिमिनल ने उकळले होते.
कोण होता हा सायबर क्रिमिनल?
पीडिताने दिलेल्या माहितीनुसार एक कायद्याची अंमलबजावणी करणारा व्यक्ती म्हणून कॉल आला आणि त्याने पिडीताला अटक करण्याची धमकी दिली तसेच पीडिताला बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासही भाग पाडले.
कसे मिळाले 40 लाख परत?
जसे की पिडीताला समजले आपल्याकडून 40 लाख रुपये उकळले आहेत पिडीताने लगेचच 1930 या सायबर क्राईमच्या नंबर वरती कॉल करून पोलिसांना ही माहिती कळवली.
मुंबई पोलिसांना ही माहिती कळताच लगेचच त्यांनी ही तक्रार नॅशनल क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वरती पाठवली आणि नोडल ऑफिसर शी संपर्क करून ज्या सायबर क्रिमिनल ने 40 लाख रुपये उकळलेले होते त्याचे अकाउंट फ्रीज केले आणि पिडीताला त्याचे पैसे वापस मिळवून दिले. अशाप्रकारे पिडीताने योग्य वेळी पोलिसांची मदत घेऊन त्यांनी ते परत मिळवले.
सायबर क्राईम पासून कशाप्रकारे आपण सुरक्षित राहू शकतो?
ज्याप्रकारे इंटरनेट चे वापर दिवसेंदिवस वाढत आहे त्याच प्रकारे सायबर क्राईम ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत आणि सायबर क्राईम चा वापर सायबर क्रिमिनल कडून वेगवेगळ्या प्रकारे केला जात आहे त्यामुळे जर आपल्या मोबाईल वरती किंव्हा कॉम्पुटर सिस्टीम वरती एखांदी लिंक येत असेल तर आपल्याला त्यावर क्लिक करायचे नाही आणि तसेच कुठलाही कॉल येत असेल तर त्याची पूर्ण तपासणी करूनच समोरील व्यक्तीवर विश्वास करायला हवे.
अशाप्रकारे आपण सायबर क्रिमिनल पासून सुरक्षित राहू शकतो नाही तर आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते
My Name is Satyanews Web Desk, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Dynamic Articles