ट्रेन मध्ये चार्जिंग करत आहात आपला फोन ;तर सावधान फोन हॅक होऊ शकतो : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मध्ये वाढ. कधीही लोकं आपला स्मार्टफोन हा रेल्वे स्टेशन किंवा कुठेही चार्जिंग करतात.आणि आपला फोन कुठेही चार्जिंग करणे हे काम खूप जड पडू शकते.कारण रेल्वे स्टेशन किंवा पब्लिक प्लेस च्या ठिकाणी जर तुम्ही आपला फोन चार्जिंग केला तर तो हॅक होऊ शकतो.कारण हॅकर हा रेल्वे स्टेशन, बस स्टॅंड, किंव एअरपोर्ट येथील वापरल्या जाणाऱ्या USB द्वारे आपल्या मोबाईल किंवा इतर कोणत्याही डिवाइस मध्ये मॉलेशियस इन्स्टॉल करून पर्सनल डेटा चोरून घेतात.चार्जिंग केबल ही डेटा ट्रान्सफर करण्याचा काम करते.आणि त्या केबल द्वारे हॅकर आपल्या फोनमध्ये मालवेयर इन्स्टॉल करून आपली खासगी माहिती व पैसे चोरी करू शकतात.
चला तर मग बघूया कसा हॅक केल्या जातो आपला फोन!
भारतात ऑनलाईन कामात फसवणूक आणि स्मार्टफोन हॅकिंगच्या घटनामध्ये खूप वाढ होत चाललेली दिसून येत आहे.मॉलेशियश अँप लिंक द्वारे स्मार्टफोन हॅक केले जात आहेत.हॅकर्स हे मॉलेशियस अँप द्वारे नागरिकांची फसवणूक करत आहेत.
जाणून घेऊया स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही या काही टिप्स मधून!
स्मार्टफोन गरम होणे :
जर तुमचा स्मार्टफोन आपोआप गरम होत असेल तर तुमचा स्मार्टफोन हॅक होण्याची शक्यता आहे.
तुमचा फोन हॅकर्स ऑपरेट करत असल्याची शक्यता आहे.
अँप क्रॅश होणे :
जर तुमचा स्मार्टफोन हॅक झाला असल्यास अँप क्रॅश होत असल्याचे दिसून येते.तर तुम्ही काय केले पाहिजे लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन चेक करायला पाहिजे की अँप अपडेट आहे की नाही. तर खूप वेळेस काय होते अँप अपडेट नसल्याने सुद्धा क्रॅश होतात.
फ्लॅश लाईट आपोआप सुरु होणे :
जर तुमच्या स्मार्टफोनची फ्लॅश लाईट आपोआप सुरु होत असेल तर तुमचा स्मार्टफोन हॅक झाल्याची शक्यता आहे.तर यामुळे तुम्हाला स्वतःला वाचण्यासाठी लगेच तुम्ही फॅक्ट्री रिसेट करा.कारण फॅक्ट्री रिसेट केल्याने तुमच्या स्मार्टफोन मधील मालवेअर डिलिट होईल.
मॅलवेअर इन्स्टॉल कसे करतात :
तर रेल्वे स्टेशन किंवा पब्लिक प्लेस च्या ठिकाणी चार्जेर सॉकेट वर स्मार्टफोन केला तर तुमच्या फोनमध्ये एक पॉप अप येतो आणि त्यामध्ये विचारले जाते की, तुम्ही या केबल चा वापर कशा पद्धतीने करू इच्छिता.आणि तुमच्या स्मार्टफोनची USB केबल ही तुमचा डेटा ट्रान्सफर करण्याचा काम सुद्धा करते. आणि यावरून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर इन्स्टॉल करतात.
जाणून घेऊया की या सर्व गोष्टींपासून स्वतःला कसे वाचवायचे :
तर रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, बस स्टॅंड किंवा कोणत्याही ठिकाणी आपला फोन चार्जिंग करू नये.कुठेही जायचे असेल तर आपल्या फोनचा चार्जेर सोबत घेऊन जाणे. जर फोनची चार्जिंग जास्त वेळ टिकत नसेल पॉवर बँक सोबत ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपला फोन लगेच चार्जिंग करता येईल.तर अशीच एक प्रायवशी केबल सुद्धा असते. यामुळे तुमच्या फोनमधून काहीही ट्रान्सफर होऊ शकत नाही.आणि या केबल मुळे सुद्धा तुम्ही आपला स्मार्टफोन सुरक्षित ठेऊ शकता.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles