सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहे. त्यात हवा प्रदूषित झालेली आहे.आणि वाढत्या प्रदूषणामुळे आणि हवेतील धुळीमुळे खूप लोकांच्या चेहऱ्याच्या नाकावर, गालावर अशा काही भागावर छोटे छोटे काळे डाग दिसून येतात ते डाग म्हणजेच ब्लॅकहेड्स. ब्लॉकहेड्स ही एक समस्या आहे की जी समस्या काही लोकांना खूप त्रास देते. या समस्येमुळे बहुतेक लोकं त्रस्त सुद्धा असतात.ते ब्लॉकहेड्स हे चेहऱ्यावर अतिशय कुरूप दिसू लागतात. त्वचा पूर्ण खडबडीत होऊन जाते. काही लोकांना तर आपल्या त्वचेच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा पार्लर मध्ये सुद्धा जावे लागते.नाकाजवळील ब्लॉकहेड्स काढणे हे खूप अवघड असते कारण ते त्वचेच्या आतमध्ये चिकटलेले असतात. काम कसे असते तसेच ब्लॉकहेड्स काढणे हे कोणत्या कामापेक्षा कमी नाही.
चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावरील ब्लॉकहेड्स घालवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत :
- बेकिंग सोडा आणि लिंबू
- अंडी
- हळद आणि दही
बेकिंग सोडा आणि लिंबू :
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा.आणि मग तुम्ही ती बनवलेली पेस्ट ब्लॉकहेड्स वर 10-15 मिनिटे लावून ठेवा.नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.यामुळे ब्लॉकहेड्स दूर होण्यास मदत होईल.हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.
अंडी :
अंड्यांचा पांढरा भाग हा एका भांड्यात काढून घ्या. आणि त्यात एक चमचा मध मिक्स करून घ्या.आणि हा मिक्स केलेला पेस्ट चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वरती लावा. लावलेला पेस्ट 15-20 मिनिटापर्यंत तसेच राहू द्या. आणि मग नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या.यामुळे ब्लॉकहेड्स दूर होण्यास मदत होईल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
हळद आणि दही :
दोन चमचे हळद आणि एक चमचा दही हे एका वाटीमध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करा. आणि मग नंतर तयार केलेली पेस्ट ही चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वरती लावा. आणि ते 10-15 मिनिटे तसेच राहूद्या. आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. या उपयामुळे चेहऱ्यावरील ब्लॉकहेड्स दूर होण्यास मदत होईल.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles