आई वडील मुलांना लहानाच्या मोठे करण्यासाठी जीवाचे पाणी करतात पण मुंबई वांद्रे परिसरात राहणारा निर्दयी आईबाप पोटच्या गोळ्यांना विकण्याची माहिती समोर आली आहे.
नशेसाठी दोन चिमुकल्या मुलांना विकले :
चिमुकल्या मुलांना विकणाऱ्या माता पित्याला अटक केली आहे दोन्ही नवरा बायको ड्रगच्या नशेच्या आहारी गेले होते. आणि या दोघांना ड्रगची नशा करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या दोघांनी विचार केला की दोन वर्षाचा मुलगा आणि काही महिन्यापूर्वी जन्मलेल्या मुलीच्या विक्री केली.
हे दोघे पती-पत्नी वांद्रे येथील भारत नगर परिसरात बहिणीच्या घरी राहत होते या दोघांना आमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे कळून आले. त्यामुळे घरात वारंवार भांडण होत असे या कारणामुळे शब्बीर पत्नीसह सासरी राहू लागला.
पाच ते सहा वर्ष सासरी राहिल्यानंतर शब्बीर पत्नीसह पुन्हा भारत नगर परिसरात घरी राहायला आले, या पाच ते सहा वर्षात यांना दोन अपत्य झाले दोन वर्षाचा मुलगा आणि एक मुलगी झाली होती.
पण वांद्रे येथे आल्यावर त्यांच्यासोबत फक्त एकच मुलगा होता घरातील माणसांना याबाबत विचारले असता दोघेही आगळे वेगळे उत्तरे देऊ लागले काही दिवसानंतर बहिणीने शब्बीरच्या नकळत शब्बीर च्या पत्नीस म्हणजेच सानियाला विचारपूस केले त्यावेळी तिने सगळं सांगितलं की दोन वर्षाचा आणि नुकताच जन्मलेली मुलीला विकण्याचे तिने सांगितले हा सगळा गंभीर आरोप शब्बीरच्या बहिणीने पोलिसांना सांगितले पोलिसांनी शब्बीर आणि सानिया या दोघांना अटक केली या दोघांनी मुलांचे विक्री कुणाला केली याचा तपास पोलीस करत आहे.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles