Control Hair Fall Problem : केस गळणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. केस सुंदर, काळे, मऊ आणि मजबूत असावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. केस गळण्याचे मुख्य कारण हे अनुवांशिकता, हार्मोनल बदल, वैद्यकीय परिस्थिती किंवा वृद्धत्वाचा सामान्य भाग असू शकतो. वाढते वय, मानसिक ताण, पोषक तत्वाची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत.
केस गळणे कमी करण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा राखणे महत्वाचे आहे. केस तुटणे किंवा गळणे यामागे कारणे ही वेगवेगळी असू शकतात.शारीरिक तसेच मानसिक ताणतनावामुळे सुद्धा केस गळती होते. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर याचा परिणाम तुमच्या केसावर दिसून येईल.चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी योग्य वेळी योग्य उपाय केले तर केसांचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होईल.
केस गळण्याची कारणे : Why Hair Loss Happen :-
- गरम पाणी
- झोप न लागणे
- तणाव
- केसांवर वेगवेगळे प्रयोग करणे
- जास्त शाम्पू करणे
गरम पाणी :-
केस धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर केला तर केसांमध्ये कोंडा होतो. आणि केस गळण्यास सुरु होते. त्यामुळे केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर केला पाहिजे.
झोप न लागणे :-
आपली झोप ही सात तासांपेक्षा जास्त झाली पाहिजे. झोप ही सात तासांपेक्षा कमी झाली तर कमी झोपेमुळे त्याचा परिणाम हा तुमच्या वजनावर होतोच, तसेच त्याचा परिणाम तुमच्या केसांवर सुद्धा दिसून येईल. कारण त्यामुळे केस देखील गळतात. तर त्यामुळे सात तासांची पूर्ण झोप करण्याचा प्रयत्न करा.
तणाव :-
तणाव आणि केस गळणे यांचा खूप मोठा संबंध आहे. तणावामुळे सुद्धा केस गळतात.केसांच्या कुंपाला कमकुवत करणारा पोषण, त्यामुळे केस गळतात. जेव्हा तुम्ही तणावत असता तर तुमचे शरीर व्यवस्थित काम करत नाही.आणि त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. तणावामुळे केसं हे खूप गळतात.
केसांवर वेगवेगळे प्रयोग करणे :-
आपण काय करतो कोणी काही सांगितले का केसांसाठी तर आपण तेच उपाय करून बघतो.आणि त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो.काही उत्सव किंवा कार्यक्रम असले तर वेगवेगळी हेअरस्टईल करणे.आणि स्टाईलिंग करून बाहेर जाणे. किंवा गर्दीत गेल्यामुळे हवेतील धूळ ही केसांवर बसते.त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. आणि मग केस पातळ होतात आणि गळतात. वारंवार वेगवेगळी हेअर स्टाईल केल्यामुळे सुध्दा केस गळतात.
जास्त शाम्पू करणे :-
आपल्याला असे वाटते की रोज केस धुतल्याने केसं स्वच्छ आणि सुंदर राहतात.परंतु रोज केस धुतल्याने केसं हे पातळ होण्याचा धोका असतो. रोज केस धुतल्यामुळे शाम्पूमधील रसायन हे केसांना कमकुवत बनवतात आणि त्यामुळे केसं गळतात.
तुम्ही हि माहिती इंग्लिश मध्येही वाचू शकता, त्यासाठी येथे दाबा.
केसगळती थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय : Hair Loss Remedies :-
तर केसगलतीसाठी थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊया.
- नारळाचे तेल
- कोरफडं
- कांद्याचा रस
नारळाचे तेल :-
जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर केसं मऊ आणि सतेज होण्यास मदत होते.नारळाचे तेल हे केसांवर अत्यंत गुणकारी आहे.नारळाच्या तेलाने केसं हे मजबूत आणि काळे असतात. नारळाचे दुध हे केसांवर चोळले की त्याचा चांगला परिणाम तुमच्या केसांवर दिसून येईल.
कोरफड :-
कोरफडीचा आतील भाग म्हणजे कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस गळणे थांबते. आणि केस मऊ आणि मजबूत होतात. आणि केस वाढण्यासही मदत होते.कोरफड हे केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
कांद्याचा रस :-
दोन कांद्याचा रस मिक्सरमध्ये बनवला आणि केसांना लावला तर केसांच्या वाढीस मदत होते.आणि कांद्याच्या रसामुळे नवीन केस उगण्यास मदत होते.
केसगळती थांबवण्यासाठी काही वैद्यकीय उपाय : Hair Loss Medical Remedies :-
तर केसगळती कमी करण्यासाठी काही वैद्यकीय उपचार तर ते पुढीलप्रमाणे :
- लो लेवल लेझर लाईट थेरपी (low level laser light therapy )
- प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी (platelet rich plasma therapy )
- मिझो थेरपी (mesotherapy )
- रिझेनेरा ऍक्टिवा (rizenera Activa)
लो लेवल लेझर लाईट थेरपी :-
लो लेव्हल लेझर थेरपी हा AGA मधील पुरुष आणि स्त्रियांच्या केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी एक नवीन उपाय असल्याचा दावा केला आहे. हा देखील केस गळती कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.हा उपचार केल्याने केसांची घनता वाढते.
प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी :-
प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी च्या क्लिनिकल पुराव्यावरून असे दिसून आले आहे की प्लेटलेट रिच प्लास्मा थेरपी हे केस गळती कमी करण्यास मदत करते.
मिझो थेरपी :-
मिझो थेरपी मध्ये डोक्यावरील त्वचेला जीवनसत्वाचा पुरवठा केला जातो आणि तेथील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते. आणि त्यामुळे केस गळती थांबते आणि केसांच्या वाढीस मदत होते.
रिझेनेरा ऍक्टिवा :-
रिझेनेरा ऍक्टिवा हे केसांच्या वाढीसाठी नॉन सर्जिकल उपाय आहे.मुलपेशी,वाढीचे घटक आणि progenitor cells डोक्यावरील त्वचेत घातल्या जातात.आणि त्यामुळे केसगळती कमी होते, केसांच्या वाढीस मदत होते.
केसांच्या आरोग्यासाठी आहारा :Best Diet to Control Hair Fall :-
तर केसांच्या आरोग्यासाठी आपल्या हातात असणारा घटक म्हणजे आहार, तर अनेकदा असा प्रश्न पडतो की केसांच्या आरोग्यासाठी आहारात कोणते पदार्थ योग्य राहील, आणि काय खाल्ले पाहिजे.तर आहारामध्ये अनेक पदार्थ असे आहेत की जे तुम्ही रोजच्या आहारात समाविस्ट करू शकता आणि तुमच्या केसांचे आणि शरीराचे आरोग्य तुम्ही चांगल्या प्रकारे राखू शकता.तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या,फळभाज्या आणि फळे यांचा समावेश करा. जेणेकरून केस गळती रोखण्यास नक्कीच मदत होईल.
तुम्ही नाकावरील ब्लॅकहेड्स मुळापासून नष्ट कसे होईल हे ही वाचू शकता.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles