ग्रामीण आणि शहरी जीवन हा आहे फरक :

ग्रामीण आणि शहरी जीवन हा आहे फरक :

Village and City : शहरी आणि ग्रामीण जीवनामध्ये बरेच असे वेगवेगळे फरक आहे. चला तर मग आपण बघूया की शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन हे एकमेकांपेक्षा किती वेगळे आहेत.

village-vs-city life

शहरी जीवन कसे असते :

शहरी जीवन म्हणजे तेथील मानवी वस्त्या की जिथे शहरीकरण आणि औद्योगिककरनाचा वेग हा जास्त असतो. शहरामध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध असतात. शहरी भागामध्ये लोकसंख्या जास्त असते. शहरी भाग हे खूप विकसित झालेले आहेत.आणि त्यांना विविध प्रकारच्या प्रदूषनांचा सामना करावा लागतो.

ग्रामीण जीवन कसे असते :

ग्रामीण भागात जास्त प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध नसतात. ग्रामीण जीवन हे खूप निवांत आहे. ग्रामीण भागात लोकसंख्या ही कमी असते. ग्रामीण भागातील जीवन निसर्ग आणि वन्यप्राण्यांनी वेधलेले असते तसेच ग्रामीण भागात जास्त प्रदूषण ही होत नाही.

village-description

ग्रामीण आणि शहरी (Village and City) भागात काय फरक आहे?

ग्रामीण आणि शहरी भागात खूप फरक आहे हे तर आपण समजले. शहरे ही ग्रामीण भागापेक्षा जास्त प्रगत आहे. पण त्यांना अनेक प्रकारच्या प्रदूषनांचा सामोरे जावे लागते.कारण ते विकसित असलेल्या मानवनिर्मित वातावरणात असतात.तसे गावाकडे जास्त प्रदूषण ही होत नाही. गावात सण उत्सव हे बंधुत्व भावनेने साजरी केले जातात. गावाकडील लोकं हे एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांची मदत सुद्धा करतात. तसे शहरातील लोकं हे आपापलं बघतात आणि एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. 

ग्रामीण आणि शहरी (Village And City) भागामध्ये पाच मुख्य फरक आहेत :

city-description

जसे की, लोकसंख्येचा आकार, सामाजिक गतीशीलता, श्रम विभागणी, विकास,आणि पर्यावरणाचा प्रकार. शहरी भागातील लोकसंख्या ही जास्त आहे आणि त्या तुलनेत ग्रामीण भागाची लोकसंख्या ही कमी आहे. खेड्यामध्ये शाळा, वीज, नर्शिग होम आणि कारखाने रोजगार या बहुतेक मूलभूत सुविधा उपलब्ध नसतात.

पण शहरातील जीवनाची एक नकारात्मक बाजू आहे, शहरातील लोकं हे ताण तणाव, चिंता आणि दबावाने भरलेले असतात.ते फक्त आपल्या वयक्तिक आणि व्यावसायिक कामे पार पाडण्यात व्यस्त असतात.कधीकधी तर हे सुद्धा माहित नसते की आपल्या शेजारी कोण राहतात.शहरातल्या लोकांमध्ये सुख आणि सुविधा आहे पण मानसिक शांतता नाही.

हे गावातही दिसून येते परंतु खूपच कमी प्रमाणात. परंतु गाव फक्त हंगामी रोजगार प्रदान करतात आणि तेथील बरेच लोकं त्यांच्या फायद्यासाठी नोकरी करत नाहीत.साधेपणा ही ग्रामीण जीवनाची ओळख आहे.

शहरी आणि ग्रामीण (Village and City) भागातील लोकांची जीवनशैली कशी असते!

ग्रामीण लोकं हे छान राहतात. कारण येथील लोक हे व्यस्त जीवनशैली जगत नाहीत तर ते सकाळी लवकर उठून सर्व परिसर स्वच्छ झाडून काढतात.शेती, पशुपालन,आणि इतर काही उद्योग करून ते आपले घर चालवतात. ग्रामीण भागात नेहमी स्वच्छ पर्यावरण असते. तसे शहरी भाग हे खूप विकसित आहे. आणि सतत काम करण्याच्या दबावामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

ग्रामीण भागात प्रदूषण आणि गर्दी कमी असते. म्हणून गावाकऱ्यांना आपले जीवन हे सहज जगण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना जास्त तणाव निर्माण होत नसतो. गावातील लोकं हे लवकर उठतात आणि वेळेवर झोपी जातात. तसे शहरातील लोकं हे सकाळी सुद्धा लवकर उठत नाहीत आणि रात्री सुद्धा वेळेवर झोपत नाही.ग्रामीण भागात हवा ही जास्त प्रदूषित होत नाही. आणि शहरात कारखान्यामुळे जास्त प्रमाणात हवा प्रदूषित होते. ग्रामीण भागातील लोकांचा कामात आणि राहणीमाणात बुद्धीचा वापर जास्त नसल्याने ते आपले जीवन हे नैसर्गिकरित्या जगत असतात.

शहरातील लोकं हे आपले जीवन स्वातंत्र्यपणे जगतात. कारण तिथे त्यांचे ओळखीचे कोणी नसतात. त्यांना सांगणारे सुद्धा कुणीच नसतात. ते वाटेल तसे जीवन जगू शकतात. तर गावाकडील लोकं हे मर्यादित असतात. ते शांत स्वभावाचे असतात. त्यांना भीती असते की काही चुकलं तर कुणी काही बोलेल काय. ते फक्त आपल्या कामात व्यस्त असतात. तर शहरे ही ज्ञान, संस्कृती आणि सामाजिक जीवनासाठी उत्तम आश्रयस्थान आहे, तसेच ग्रामीण जीवन हे संस्कृती आणि सामाजिक जीवनासाठी उत्तम आश्रयस्थान आहे.

ग्रामीण जीवन हे शहरी जीवनापेक्षा चांगले आहे का?

ग्रामीण भागातील जीवन हे निसर्गाशी निगडित आहे आणि ग्रामीण भागामध्ये मोकळी हवा असते. रम्य वातावरण असते. त्यामुळे गावाकडील मालमत्ता अधिक प्रशस्त आहे आणि त्यांच्या स्वतःच्या बागा असण्याची जास्त शक्यता असते, की ज्यामुळे ते आपल्या वाढत्या कुटुंबांना चालविण्यासाठी ते आदर्श बनवतात. तर शहरी भाग हे खूप विकसित आहे. कारण तेथील नातेसंबंध ओपचारिक असल्याने अनोपचारिक संबंध शहरी जीवनात व्यवहारिकपणे अस्तित्वात नाहीत.शहरे समृद्ध आणि सामाजिक संधी देखील देतात. स्थानिक लोकसंख्या कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकं केवळ मर्यादित सामाजिक संधीचा आनंद घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *