पावसाळ्यात कपड्यांचा वास येतो (clothes smell during monsoons) : आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कपडे भिजून जातात भिजलेले कपडे लवकर वाळत नसल्यामुळे खूप वेळेपर्यंत ते भिजलेले असतात आणि त्यापासून घाण वास येत असतो आणि हा वास बॅक्टेरिया पासून येत असतो त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकते. जर तुम्ही ही या समस्येला कंटाळले आहात तर आज आपण कपडे कशाप्रकारे धुवावे किंवा पावसाळ्याच्या दिवसात काय करावे हे आजच्या लेखात पाहणार आहोत.
चांगल्या साबणाचा किंवा सोड्याचा वापर:
पावसाळ्याच्या दिवसात चांगल्या साबणाचा किंवा सोड्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून चांगल्या क्वालिटीचे साबण आणि सोड्याचा वापर केल्यास ते कपड्याला चिटकून राहत नाही जर आपण चांगल्या सोड्याचा किंवा साबणाचा वापर कपडे धुण्यासाठी नाही केला तर कपडे धुतल्यानंतर ते कपड्याला चिटकून राहतात आणि कपड्याचा वास येण्यास कारणीभूत ठरतात.
पावसाळ्यात कपडे कसे वाळविले पाहिजे:
कपडे धुतल्यानंतर ज्या जागेवर किंवा रूम मध्ये आपण कपडे वाढवणार आहोत त्या रूमचा व्हेंटिलेशन ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण रूमच्या व्हेंटिलेशन चांगले असेल तर कपडे वाळण्यास मदत होते आणि कपडे चांगल्या प्रकारे वाळतात त्यामुळे रूमचे व्हेंटिलेशन चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे
एकाच जागी कपडे जमा करून ठेवणे टाळावे:
पावसाळ्यात कपडे धुतल्यानंतर आपण सर्व कपडे एकाच जागी एकत्रित करतो आणि सर्व कपडे एकाच जागी एकत्रित केल्यामुळे धुतलेल्या कपड्यांचा वास येऊ शकतो त्यामुळे धुतलेले कपडे पावसाळ्यात कधीही एकत्र ठेवायला नको पाहिजे, जेणेकरून कपड्यांचा वास येणार नाही. आपण बघतो आपल्या घरामध्ये कपडे धुतल्यानंतर सर्व कपडे एकाच जागी ठेवले जातात आणि मग नंतर त्यांना वाळवले जाते असे केल्यास कपड्यातून वास येण्याची शक्यता जास्त असते.
सेन्टेड सॉफ्टनर चा वापर करणे:
पावसाळ्यामध्ये कपडे धुताना चांगले सुगंधित सॉफ्टनर चा वापर केला पाहिजे सुगंधित सॉफ्टनर चा वापर केल्यास कपड्यांचा वासही येत नाही या सॉफ्टनर मुळे कपड्याचा वास चांगला येतो आणि सुगंधित सॉफ्टनर चा वापर करून धुतलेले कपडे घालण्यासही चांगले वाटतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये सुगंधित सॉफ्टनर चा वापर करूनच कपडे धुवायला पाहिजे.
वाचा: वजन कमी करण्याचा उपाय झोप ! आणि ते कसे
बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि विनेगर चा वापर:
बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि विनेगर चा वापर करून कपडे धुतल्यास किंवा धुतलेले कपडे यामध्ये पुन्हा धुतल्यास कपड्या मधील वास तर निघून जातो सोबतच कपड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया देखील निघून जातात, आणि आपल्या त्वचेला हानिकारक बॅक्टेरिया पासून संरक्षण मिळते आणि कपडे घालण्यासही चांगले वाटतात.
तर आता पावसाळ्यामध्ये कपड्यांचा वास येत असेल तर वरील उपाय करून कपड्यांचे वास तुम्ही दूर करू शकता. त्याच प्रकारे ते कपडे आपल्या त्वचेलाही नुकसान करणार नाहीत ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंट करून नक्कीच कळवा.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles