हृदय विकार म्हणजे काय : हृदय विकार म्हणजे आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य तीन रक्तवाहिन्या असतात,आणि त्या तीन रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयावीकराचा झटका म्हणतो.ज्यामध्ये हृदय, रक्तवाहिन्या, हृदयाचे ठोके यांचा समावेश असतो.हृदय व रक्तवाहिन्यांसबंधी विकार (kardinovaxclural डायसेस )हा हृदयाशी संबंधित विकार आहे.
हृदय विकाराची लक्षणे :
हार्ट अटॅक हे पुरुष आणि स्त्रिया दोघांना पण येऊ शकतो. तर त्याची काही लक्षणे आहेत.
- छातीत दुखणे.
- मळमळ.
- डोके दुखणे.
- थोडेसे थकल्यासारखे वाटणे.
- जबडा, मान, पाठ,हात किंवा खांदे दुखणे.
- धाप लागणे.
.तर अशी काही हृदय विकाराची लक्षणे दिसून येतात.
हृदय विकाराची कारणे :
उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टोरॉल ही हृदयविकाराची मुख्य कारणे आहेत.उच्च रक्तदाब हे स्ट्रोक आणि हृदयावीकराचे मुख्य कारण आहे.कारण त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरांना नुकसान पोहोचवते.आणि त्यामुळे हृदय आणि मेंदूकडे जाणाऱ्या धमण्या अरुंद होतात.
तर हृदयाविकाराची काही कारणे खालील प्रमाणे अशु शकतात.
छातीत दुखणे :
छातीमध्ये दुखणे हे हृदय विकाराचे एक सामान्य लक्षण आहे.छातीत दुखणे म्हणजे भविष्यात येणाऱ्या हृदयावीकराचे झटक्याचे लक्षण होय.
जर तुम्हाला कधीही असे वाटले की छातीमध्ये दुखतय तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका.
धूम्रपानाचे सेवन :
धूम्रपानाचे सेवन करणे हे खूप धोकादायक ठरू शकते.कारण यामुळे हृदयावीकराच्या समस्या निर्माण होऊ शकतात.आणि धूम्रपानाचे सेवन हे कर्करोग किंवा उच्च रक्तदाबाचे कारण ठरू शकते.धूम्रपानाचे सेवन हे अतिशय अपायकारक सवय आहे.ज्यामुळे हृदयाविकार होऊ शकते. त्यामुळे धूम्रपानाच्या शेवनापासून दूर राहा. की जेणेकरून हृदयाविकार किंवा कर्करोगाच्या समस्या निर्माण होणार नाही.
मधुमेह :
मधुमेह आणि हृदयारोग हे सुद्धा अतिशय एकमेकांशी जवळून जुडलेले असतात.मधुमेह हा रोग हृदय व रक्तवाहिन्याच्या निगडित असलेले विकार निर्माण करण्याच्या शक्यता वाढवण्याचे काम करतो.रक्तामधील साखरेच्या उच्च किंवा कमी पातळीचे रक्तावर अतिशय घातक परिणाम होतात.त्यामुळे मधुमेह झाला असेल तर त्यावर लवकरच उपाय केले पाहिजे.
कौटुंबिक समस्या :
कौटुंबिक समस्या हे तर हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे. कारण कौटुंबिक समस्येमुळे डोके दुखते,आणि मन हे सुद्धा विचलित होते.हृदयविकार हे अनिवांशिकतेमुळे होऊ शकते. त्यामुळे कौटुंबिक समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.
अनपेक्षित व्यायाम :
जरी तुम्हाला असे वाटत असेल की डेअली व्यायाम केल्याने शरीराला त्याचे अनेक फायदे होतात.पण असे अजिबात नसते, कारण जर तुम्ही अतिशय तिव्रतेने व्यायाम केला तर ते तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे.
मूत्रपिंडाचे विकार :
शरीरात असलेल्या सर्व धमण्या या रक्त हे शुद्ध करून हृदयाकडून सर्व शरीरामध्ये पोहोचवन्याचे कार्य करत असते.जर तुमच्या शरीरातील धमण्याचे निदान झाले असेल तर ते काळजी करण्याचे कारण आहे. त्यामुळे मूत्रपिंडाकडे लक्ष दिले पाहिजे.
हृदयविकार कसे टाळावे यासाठी काही उपाय!
हृदयविकाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसून येत आहे.आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेक आजार आहेत की जे मृत्यूचे मोठे कारण ठरले आहेत.आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रमाण वाढवायला हवे.की ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील.हृदय निरोगी ठेवण्यासाठी 30 वर्षातून दोनदा संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्यायला पाहिजे.आजच्या काळात लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की सर्वांनाच स्वतःकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळच नाही.त्यामुळे तुम्ही तुमच्या धावपळीच्या जीवनशैलीमधून थोडेसे वेळ काढून तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे सुद्धा देखील अतिशय गरजेचे आहे.आपल्याला आपले हृदय मजबूत आणि निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही धूम्रपानाची सवय मोडली पाहिजे.कारण धूम्रपान म्हणजे देखील ही तर जणू आजकालची फॅशनच बनलेली आहे.धूम्रपाणामुळे देखील कर्करोग होण्याचा धोका असतो.आणि कर्करोगामुळे हृदयविकार होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही धूम्रपान करणे थांबवले पाहिजे.
तुमचे वजन हे नियंत्रणात ठेवायला हवे कारण हृदयाच्या आरोग्यासाठी वजन हे नियंत्रित ठेवणे अतिशय गरजेचे आहे.जर तुमचे वजन जास्त असल्यास हृदयावीकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.तर वजन कमी करण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करायला हवा.कारण बाजरीची भाकर ही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे आणि त्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहू शकते.
तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे झोप आहे.तर तुमची झोप ही 7 तास झाली पाहिजे, की ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत राहते. त्यामुळे तुम्ही रात्री वेळेवर झोपले पाहिजेआणि सकाळी लवकर उठायला हवे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोड पदार्थ. कारण गोड पदार्थाचे सेवन करणे हे तर सर्वांनाच आवडते, परंतु गोड पदार्थांचे सेवन केले तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून आहारामध्ये गोड पदार्थांचा समावेश कमी प्रमाणात केला पाहिजे.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles