रात्रीच्या वेळी अभ्यास केल्यास आश्चर्यजनक फायदे :

रात्रीच्या वेळी अभ्यास केल्यास आश्चर्यजनक फायदे :

Benefits To Study In Night : अभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळच्या 4 ते रात्री 10 या दरम्यान असतात रात्रीच्या वेळी हे एकांतात आणि शांततेत असल्याने आपला मेंदू अभ्यासात चांगले लक्ष केंद्रित करतो. तर काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सकाळची  वेळ तर काही विद्यार्थ्यांना रात्रीचा वेळ फायदेशीर ठरते.

important-benefits-to-study-in-night

रात्रीच्या वेळी अभ्यास करण्याचे अनेक फायदे.

  1. रात्रीच्या वेळी अभ्यास केल्याने लक्षात ठेवणे अतिशय सोपे जाते.
  2. रात्रीच्या वेळी एकांतता आणि शांतता असल्याने चांगला अभ्यास करता येतो.
  3. शास्त्रज्ञाच्या मते रात्रीचा अभ्यास लक्षात ठेवणे अतिशय सोपे जाते.
  4. रात्रीच्या वेळी अभ्यासात अडथळे येत नाही For Example सोशल अडथळे किलबिल यांचा आवाज यामुळे अभ्यासात खंड पडत नाही.
  5. रात्री ची वेळ अभ्यासासाठी आरामदायक ठरते.

रात्री अभ्यास करत असाल तर हे टिप्स Follow करा जेणेकरून तुम्हाला फायदेशीर ठरेल.

  • रात्री उशिरापर्यंत जागण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. दुपारी जेवढा शक्य असेल तेवढी झोप घ्या जेणेकरून रात्रीच्या वेळी अभ्यास करताना झोप येणार नाही.
  • रात्री अभ्यास करताना चॉकलेट ,चहा, कॉफी आणि इतर गोड  पदार्थाचा सेवन करा यामुळे अभ्यास करताना झोप येणार नाही.
  • रात्री अभ्यास करताना zero लाईटचा वापर न करता शक्य असल्यास घरामध्ये चांगला उजेड असलेला लाईट वापरावा यामुळे तुम्हाला झोप येणार नाही..
  • रात्री कधीही झोपून अभ्यास करू नका कारण असं केल्याने आपल्याला झोप येण्याची शक्यता जास्त असते म्हणून टेबल किंवा खुर्चीचा वापर करावा.
  • झोप येत असल्यास पाण्याने तोंड धुवावा असं केल्याने अभ्यास करताना झोप येणार नाही.

important-benefits-to-study-in-night

अभ्यास करण्याची योग्य वेळ    

अभ्यास करण्यासाठी कोणती वेळ  निवडावी असा प्रश्न सगळ्यांना पडतो. कुणाला तर दुपारचा वेळ तर कुणाला रात्री जागून अभ्यास करायला बऱ्याच जणांना आवडतं. सकाळी फ्रेश वातावरणात केलेला अभ्यास जास्त फायदेशीर ठरतो. पण जर सकाळच्या वेळेस कॉलेज किंवा क्लासेस असतील तर त्यानुसार आपल्याला अभ्यासाचे टाईम टेबल बदलावा लागतो. यासाठी तुम्ही रात्रीची वेळ निवडू शकता. जेणेकरून तुमचा अभ्यास  चांगला होईल रात्री ज्यांना जागून अभ्यास करण्याची सवय असते त्यांनी थोडा वेळ दिवसा झोप घेतली पाहिजे. यामुळे रात्री अभ्यास करतांना झोप येणार नाही. मेंदूचा विचार केला जातो तेव्हा विद्यार्थी म्हणतात की रात्री मेंदूची अभ्यास करण्याची कार्यक्षमता ही चांगली असते. त्यामुळे अभ्यास हा चांगला होतो. शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितले आहे की रात्रीची वेळ ही अभ्यास करण्यासाठी लाभदायक ठरते मेंदू रात्री चांगल्याप्रकारे कार्य करतो. पेपरच्या वेळी ज्यांना रात्र रात्रभर जागून अभ्यास करण्याची खूप जास्त गरज असते रात्री अभ्यास करण्याचे अनेक फायदे आहेत पण बऱ्याच वेळी असं होतं की अभ्यास तर खूपच करायचा असतो पण निद्रा आपल्याला कुशीत घेते. अशावेळी काय करावे सर्वात  सोपे पर्याय आहे की दिवसा शक्य असल्यास थोडा वेळ झोप काढावी यामुळे रात्री अभ्यास करताना झोप येणार नाही आणि रात्री अभ्यास करणार करताना चहा कॉफी घ्यावी असं केल्याने झोप येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *