वजन कमी करण्याचा उपाय झोप ! आणि ते कसे

वजन कमी करण्याचा उपाय झोप ! आणि ते कसे

सर्वात पहिले तुम्हाला प्रश्न पडला असेल की झोपल्याने वजन कसे कमी होते. तर झोपल्याने तुमचे वजनच नाही तर तुमचे आयुष्य सुद्धा वाढू शकते. वाढते वजन ही आजच्या युगातील खूप मोठी समस्या झाली आहे.रात्री झोप घेणं हे आरोग्यासाठी नव्हे तर वजन कमी करण्यात ही होते. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला दिवसभर भूक लागल्यासारखे होईल आणि तुमची भूक वाढतच राहील.रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर ब्लड प्रेशर आणि तणाव असे आजरही होऊ शकतात.आपलं शरीर हे झोपेमध्ये दुसऱ्या दिवशी कामासाठी लागणारी ऊर्जा एकत्रित करते.आपलं वजन कमी करण्यासाठी लोकं खूप वेगवेगळे उपाय करतात. काही दररोज नियमित व्यायाम करतात, तर काही जिम ला जातात.पण हे सर्व आहेच आणि झोप सुद्धा वजन कमी करण्यासाठी उपायकारक आहे.झोप आणि वजन यांचा खोलवर संबंध आहे.आपलं शरीर हे रात्री झोपेत हार्मोन्स संतुलित करत असत.वजन आणि झोप यांचा ग्रेलीन आणि लेप्टीन या दोन हार्मोन्सच्या संतुलनाशी संबंध असतो.ग्रेलीन मुळे भूक लागल्याची जाणीव होते, आणि लेप्टीन मुळे आपली झोप वाढते आणि भुकेले पोट भरल्यासारखे जाणवते.

weight-loss-tips-with-sleep

वजन कमी करण्यासाठी काही टिप्स :

  • पाणी जास्त घेणे
  • ग्रीन टी
  • खारट पदार्थ टाळणे
  • सकस आहार

weight-loss-tips-with-sleep

पाणी जास्त घेणे : 

जर तुमचे वजन वाढलेले असेल आणि त्या वाढत्या वजनावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे असेल तर पाणी जास्त प्रमाणात प्यायला हवे.पाणी जास्त  पिल्याने तुमची भूक ही नियंत्रित राहते.पाणी पिल्याने तुमची चरबीही नियंत्रणात असते आणि तुमची पचणाची क्रिया सुद्धा वाढते. आणि याचाच परिणाम तुमच्या वजनावर देखील दिसून येतो.

ग्रीन टी : 

ग्रीन टी प्यायल्याने पचनाची क्रिया ही फास्ट होते.आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील जास्तीची चरबी ही तुम्ही झोपेत असताना जळत राहते. चरबी जळते आणि तुमचे वजन कमी होते. त्यामुळे ग्रीन टी चा सेवन केला पाहिजे.

खारट पदार्थ टाळणे :

तुमच्या रोजच्या आहारामध्ये मिठाचा प्रमाण कमी केला पाहिजे.जेवणात मिठाचे प्रमाण कमी असेल तर हृदय विकार, रक्तदाब यासारखे आजार टाळले जाऊ शकतात.सर्वात महत्वाचे म्हणजे वजन कमी करण्यासाठी मिठाचे सेवन हे कमी केले पाहिजे.

सकस आहार :

सकस आहार हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.सकस आहारामध्ये गोड पदार्थ अजिबात सेवन करू नका. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन,मिनरल्स,आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ जास्त प्रमाणात घेतले पाहिजे. सकस आहार घेतल्यामुळे वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे सकस आहार घेतले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *