Top 10 मराठी चित्रपट

top 10 marathi movies

Top 10 मराठी चित्रपट जे तुम्ही पाहू शकतात. या लेखा मध्ये चित्रपटाचे नाव आणि त्याविषयी थोडीशी माहिती देण्यात आलेली आहे .

वास्तुपुरुष :

वास्तुपुरुष हा 2002 चा भारतीय मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने केली आहे. सुमित्रा भावे सुनील सुकथनकर यांनी जोडीने हे चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

वास्तुपुरुष या चित्रपटाच्या कथेची ओळ :

भास्कर 40 वर्षानंतर घरी परतला. म्हणजे त्याच्या मूळ गावी परतला.तर फक्त त्याच्या जागेचे अवशेष पाहण्यासाठी. तो त्याच्या आईचा ऋणी आहे, जिने त्याला डॉक्टर बनण्यास प्रवृत्त  केले. आणि तिची इच्छा पूर्ण करण्याचे वृत्त घेतले.

पुणे 52 :

पुणे 52 हा चित्रपट नायर थ्रिलर मराठी भाषेतील चित्रपट आहे. पुणे 52 हा चित्रपट निखिल महाजन यांनी 2013 मध्ये निओनॉयर थ्रिलर मराठी भाषेतील चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी,सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका आहे. पुणे 52 हा चित्रपट निखिल महाजनांचा दिग्दर्शकीय पदार्पण चित्रपट आहे. 1974 च्या हॉलीवुडच्या क्लासिक चायनाटाऊनपासून हा चित्रपट प्रेरित होता. 1992 मध्ये पुण्यात घडलेला पुणे 52 हा निओ -नॉयर ड्रामा आहे.

 पुणे 52 या चित्रपटाच्या कथेची ओळ :

अमर आपटे हा एक खाजगी गुप्तहेर आहे. की जो फसवणूक करणाऱ्या भागीदारांची हेरगिरी करून आपली कामे पूर्ण करतो. त्याचे जीवन हे डळमळीत आहे,आणि त्याचे लग्न,गोंधळ आहे. जसे की एखाद्या क्लाइंटला संधी मिळाल्याने त्याच्या जीवनात काहीनाट्यमय बदल घडतात, कारण तो ज्या शहरात राहतो ते शहर त्याच्या आजूबाजूला बदलते.

अनुमती (संमती) :

अनुमती हा 2013 मधील मराठी चित्रपट आहे.या चित्रपटाला गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेले आहे. विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी यांची या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका आहे. अनुमती हा चित्रपट 2013 मध्ये दिग्दर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांना त्यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटाला समीक्षकांची भरभरून प्रशंसा मिळाली आहे. अनुमती या चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे.

 या चित्रपटातील कथेची ओळ :

रत्नाकर, एक वृद्ध माणूस, जेव्हा त्याला समजले की त्याची पत्नी आजारी आहे,तेव्हा तो उध्वस्त होतो. आपल्या मरणासन्न पत्नीला वाचवण्यासाठी तो असहाय्यपणे परीक्षा आणि संकटांच्या मालिकेतून जातो.

जोगवा :

जोगवा हा चित्रपट 2009 मधील मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाला राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेला आहे. जोगवा या चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजीव पाटील यांना मिळालेला आहे. जोगवा चित्रपटांमध्ये उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटामध्ये अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांची संगीत दिग्दर्शक जोडी आहे.ज्यांना अजय -अतुल म्हणून ओळखले जाते. आणि ते दोघे खरे भाऊ आहेत. अजय अतुल यांना 2009 मध्येसर्वोत्कृष्ट संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील गायक दक्षिण भारतातील हरिहरन हे आहेआणि बंगाली श्रेया घोषाल या आहेत. यांनी सुद्धा देखील पुरुष आणि महिला गटातील गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे.

 जोगवा चित्रपटातील कथेची ओळ :

जोगवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला  दिलेली भिक्षा. जोगवा मागणारे लोक सामान्यतः जोगता किंवा जोगवीन म्हणून ओळखले जातात. समाजाने त्यांना आपल्या स्वतःचे सर्वस्व सोडून देवाची सेवा करण्यास भाग पाडले आहे. सुलीच्या आयुष्याला एका परंपरेमुळे तिला स्थानिक देवतेची बळजबरीने सेवा करायला लावल्यानंतर कलाटणी मिळते. जेव्हा ती तायप्पांना भेटते जे तायप्पा असेच भाग्य सामायिक करतात, तेव्हा त्यांना एकमेकांमध्ये सांत्वन  मिळते.

 मी शिवाजीराजे भोसले बोलतोय :

राजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर हे आहेत. मराठी माणसांची मुंबईत आणि महाराष्ट्रात होणारी घालमेल मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर,सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका आहे. संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

ताऱ्यांचे  बेट :

 ताऱ्यांचे बेट हा चित्रपट 2011 मधील मराठी चित्रपट आहे. किरण यज्ञपवीत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.आणि या चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे हे आहेत. ताऱ्यांचे बेट या चित्रपटांमध्ये सचिन खेडेकर,अश्विनी गिरी आणि अस्मिता जोगळेकर यांची प्रमुख भूमिका आहे.

टिंग्या :

 टिंग्या हे 2008 मधील मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट मंगेश हडवळे यांचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे. शरद गोवेकर यांनी या चित्रपटांमध्ये ग्रामीण मुलाची भूमिका साकारलेली आहे. ज्यामध्ये त्यांना 2008 सालचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.टिंग्या हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. जिथे त्याला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर  फिल्मचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला आहे.

श्वास :

श्वास हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.श्वास हा चित्रपट सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी अकादमी पुरस्कारामध्ये सहाव्या क्रमांकावर होता. श्वास हा चित्रपट 2004 मध्ये ऑस्कर साठी भारताचा अधिकृत प्रवेश होता. श्वास या चित्रपटाचे कथानक पुण्यातील एका वास्तव घटनेवर आधारित आहे.

नटरंग :

नटरंग हा चित्रपट 2009 मधील भारतीय मराठी भाषेतील नाटक चित्रपट आहे. नटरंग या चित्रपटाचे रवी जाधव,अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी हे दिग्दर्शक आहेत. अतुल -अजय यांची चित्रपटातील मूळ संगीतकार जोडी आहे. यांनी या चित्रपटांमध्ये गाणी संगीतबद्ध केली आहेत.

माहेरची साडी :

माहेरची साडी हा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आहे. या चित्रपटांमध्ये विजय कोंडके यांची प्रमुख भूमिका आहे. विजय कोंडके यांनी या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसर बारा कोटींची कमाई केली होती. माहेरची साडी या चित्रपटाची मराठी सिनेमा सृष्टीतील अजरामर चित्रपटांमध्ये गणना केली जाते. त्यावेळी सर्वात जास्त कमाई करणारा हा मराठी चित्रपट ठरला होता.या चित्रपटांमध्ये अलका कुबल,अजिंक्य देव,रमेश भाटकर, विक्रम गोखले आणि किशोरी शहाणे हे मुख्य भूमिकेत होते.

नटसम्राट :

 नटसम्राट या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली होती. नटसम्राट हा नाना पाटेकर यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील डायलॉग ने प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले होते.

देऊळ :

 देऊळ हा 2011 मधील मराठी चित्रपट आहे.या चित्रपटाचे निर्माते विनायक कुलकर्णी आणि अभिजीत घोलप हे आहेत. राष्ट्रीय पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट जागतिकीकरणाचा भारतातील लहान शहरांवर होणारा परिणाम आणि भारतीय खेड्यांची भीषण अवस्था याबद्दल आहे. या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी यांनी सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म यासाठी 59 वा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *