महिला आणि पुरुष साठी घरून करता येणारे व्यवसाय – Home Business

महिला आणि पुरुष साठी घरून करता येणारे व्यवसाय - Home Business

आजचा लेखात आपण महिला आणि पुरुष साठी घरून करता येणारे व्यवसाय पाहणार आहोत. खूप महिला किंव्हा पुरुष घरी असतात, त्यांना नोकरी नसते किंवा काही कारणामुळे नोकरी करता येऊ शकत नाही, शिवाय पैशाची  तर खूप गरज असते. अशावेळी घरी राहून काय करता येईल हे सुचत नाही अशा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी काही बिझनेस आयडिया आणि टिप्स.

घरी बसल्या व्यवसाय सुरू करा; जाणून घ्या पूर्ण माहिती.

सरकारी नोकरीचा आणि खाजगी नोकरीचा खूळ हळूहळू कमी होत चालला आहे. आणि अनेक पुरुष व्यवसाय कडे वळत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, की व्यवसाय तयार करण्यासाठी लोकांकडे भांडवल नाही. आणि देखील तुम्ही जर अशा लोकांकडे होत असाल, आणि तुम्हाला एक चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल, परंतु तुमच्याकडे भांडवल नसेल, तर तुम्ही ही माहिती सविस्तर वाचावी; जेणेकरून तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी अडचण येणार नाही. असा एक व्यवसाय आहे, जो तुम्ही घरी बसल्या बसल्या अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. ते म्हणजे आपल्या स्वयंपाक घरात वापरल्या जाणारा हरभऱ्या च्या दाळीचे पीठ जो तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हरभऱ्याची दाळ विकत घेऊन त्याचे पीठ बनवून आणि त्या पिठला पॅकिंग करून विकू शकतात. जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल. कारण हरभऱ्याची पिठाची मागणी ही खूप आहे, जर तुम्हाला हा व्यवसाय अगदी फायदेशीर ठरेल.

ब्युटी पार्लर व्यवसाय किंवा ब्युटी प्रॉडक्ट :

ब्युटी पार्लर व्यवसाय किंवा ब्युटी प्रॉडक्ट ज्याच्यात वेगवेगळे प्रकारचे जसे ब्युटी पार्लरची सर्विस येऊ शकते किंवा मेकअप म्हणजेच मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही तुमचा घरबसल्या व्यवसाय सुरू करू शकता. हेअर स्टायलिश म्हणून सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. अशी जी ब्युटी रिलेटेड जे काही व्यवसाय आहे ते या पहिल्या कॅटेगिरी येतात. तर जर तुम्हाला मेकअपची किंवा मग ब्युटी पार्लर चे आवड असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स करून घेऊ शकता. ब्युटी पार्लर चे जी काही कोर्सेस आहेत तर ते प्रायव्हेट जे पार्लर्स असतात तिथे सुद्धा अवेलेबल असतात त्यांची फीस ज्या त्या ब्युटी पार्लर वरती डिपेंड्स असतात.

शिवाय गव्हर्मेंट च्या सुद्धा कोर्सेस असतात. तर ते सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात. कोर्सेस केल्यानंतर फक्त एवढं आहेत तुम्हाला त्याच्यात थोडसं भांडवल टाकावं लागतं. जसं जर तुम्हाला ब्युटी पार्लर टाकायचं असेल तर तुम्हाला एक शॉप पाहिजे शॉप नसेल तर तुम्ही घरात सुद्धा सुरू करू शकतात, पण त्या साठी खुर्ची किंवा जे काही प्रॉडक्ट असतात ते प्रॉडक्ट तुम्हाला घ्यावे लागतात. तर त्यामुळे यामध्ये थोडीफार इन्व्हेस्ट करावी लागते. तर आजच्या घडीला ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के  ग्रोथ आहेत. फक्त एवढा आहे ब्युटी पार्लर साठी तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्ट करावी लागते.

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय (Candle Making Business) :

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊयात. जसं की सर्वांना माहित आहे मेणबत्ती उपयोग सर्वत्र केला जातो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर बर्थडे पार्टी असो किंवा हॉटेल्स मध्ये होणाऱ्या कॅन्डल्स लाईट डिनर एवढेच नाही तर चर्च मध्ये होणाऱ्या प्लेयर्स मध्ये आणि दिवाळीमध्ये प्रकाश करण्यासाठी या मेणबत्ती चा उपयोग केला जातो. तसेच ठीक ठिकाणी सजावट करण्यासाठी ही मेणबत्ती महत्त्वाची भूमिका दर्शवते.

आज काल मेणबत्त्या अनेक रंगांमध्ये आणि आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या सुगंधा सहित बाजारामध्ये उपलब्ध झाल्यामुळे आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तुम्ही हा बिजनेस अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या सुरू करू शकता. आणि लोकांना असलेली मेणबत्ती ची गरज पूर्ण करून चांगला नफा कमावू शकता. चला तर जाणून घेऊया या मेणबत्ती कशा बनवल्या जातात. मेणबत्ती बनवण्याकरिता रॉ मटेरियल मेणाचे ब्लॉग, धागा, कलर्स इत्यादींची गरज लागते. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्रथम मेणबत्ती ला एस ट्रेडिंग मशीन चा धागा जोडला जातो मग त्यानुसार रंगांमध्ये मेणाचे ब्लॉग्स त्या स्टडी मशीन मध्ये ठेवले जातात. अशाप्रकारे मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकता.

पापड व्यवसाय :

पापड व्यवसाय हा एक लघुउद्योग आहे. अनेक पापड व्यवसाय तुम्हाला मार्केटमध्ये पाहिला मिळतीलच. आणि त्याच माध्यमातून अनेक घरगुती व्यवसाय सुद्धा अनेकांनी चालू केली आहेत. पापड हा मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात त विक्री जाणारा पदार्थ आहे. की ज्या माध्यमातून त्याची विक्री ही प्रत्येक घरा घरात होत असते. अनेक लोक वेज असो या नॉनव्हेज कापड हे प्रत्येकांचा आवडीचा पदार्थ आहे. त्यासाठी ज्या प्रकारे तुम्ही मसाला तयार करा त्याप्रमाणे निश्चितच त्याप्रमाणेच पापड सुद्धा तयार होतील. मार्केटमध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत अनेक ठिकाणी कॉम्पिटिशन असलं तरी त्याचप्रमाणे याला खूप पोटी मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. आणि हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या तुमच्या घरून अथवा तुम्ही मोठ्या स्वरूपात सुद्धा करू शकतात.

असा हा प्रचंड मागणी असलेला व्यवसाय आहे. ज्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या प्रकारे कंपनी तयार करून किंवा लघुउद्योग स्वरूपात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तर यासाठी जे भांडवल लागनार आहे ते आपण पाहूयात. पापड मशिन, या पापड मशीनच्या माध्यमातून हे पापड तयार होतात. काही दोन किंवा दहा गरज नाहीये. एक माणूस हे मशीन  चालवू शकतो. पापड तयार करण्यासाठी दुसरी एक मशीन आहे ती आहे त्याचे जे पीठ आहे ते आठा बनवण्याची मशीन याप्रमाणे जो संपूर्ण मसाला असतो पापड करण्याचा तो या पद्धतीने तयार केला जातो. आणि त्याच प्रमाणे तुमचे हे पीठ पूर्ण तयार झाल्यानंतर मशीन वरती तुम्ही पापड तयार करू शकता. आणि सोबतच लागणारा जे काही पीठ आहे त्याचा खर्च होणार आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचं जे भांडवल आहे जवळजवळ पन्नास हजार इतके या व्यवसायात लागणार आहेत अशा प्रकारे हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या करू शकता आणि प्रचंड कमाई या व्यवसायातून करता येते.

पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय :

तंबाखू खान है शरीराला हानिकारक आहे. पण तरीही भारतातील अनेक लोक याचे सेवन करतात. अनेक लोक तंबाखू खात असताना चुना लावूनच खातात. एवढेच नाही तर पान खाताना सुद्धा सुना लावूनच खातात. तुम्ही कधी असा विचार केला आहे का? की चुना कसं बनवतात. तर आम्ही या चुन्याच्या बिजनेस ची माहिती सांगणार आहोत ते पुढील प्रमाणे.

चुना बनवण्याचा घरगुती उपाय :

चुन्यासाठी लागणारा कच्चामाल हा मार्केटमध्ये फक्त 5 ते 7 रुपये मध्ये मिळतो. या 5 ते 7 रुपये मध्ये तुम्ही घरबसल्या शंभर रुपयाचा नफा आरामशीर मिळू शकतात. तर आता जाणून घेऊया की हा चुना घरबसल्या कशाप्रकारे बनवायचा, सगळ्यात आधी कच्चा चुना तुम्हाला मार्केटमधून खरेदी करून आणायचा असतो. तो कुठेही मार्केटमध्ये 5 ते 7 रुपये मध्ये आरामात मिळून जातो. हा जो काही कच्चा चुना असतो, तो मोठ्या खड्यांच्या रूपात असतो. व तो अतिशय उष्ण आणि गरम असतो.

तर त्याला थंड आणि जी काय त्याची प्रवृत्ती असते ती थंड करावी लागते. कच्चा चुना इतकी गरम असतो, की त्याला पाण्यात टाकल्याबरोबर त्याची उकळी यायला लागते. त्यामुळेच त्याला थंड पाण्यात ठेवावा लागतो. कच्चा चुनाला एक दोन तास थंड पाण्यात ठेवल्याने त्याचे उकळी थांबायला लागते. आणि ते उकळून थांबल्यानंतर तरीसुद्धा त्याला एक दिवस पाण्यातच ठेवावे लागते. त्यानंतर जे काही वरचे वरचे पाणी असतो, तो आपल्याला काढून फेकावा लागतो. आणि जो काही खालचा चुन्याचा पेस्ट बनतो त्याचा वापर आपल्याला करावा लागतो. तर त्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्ट द्वारे एकदा साधा मशीन जो तुम्हाला दोन ते तीन हजार मध्ये मिळून जातो. आणि त्या मशीनला विजेचाही गरज नाही तो हाताने चालू शकतात. त्याचा वापर करून तुम्ही चुना तयार करू शकतात. या प्रकारे तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्ही घरबसल्या चांगल्या प्रकारे कमवू शकता.

दुकानात लागणारे कुरकुरे पॅकिंग करणे :

वाढत्या स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक पुरुषांना नोकरी पासून वंचित रावा लागतं, त्यामुळे अनेक पुरुष विचार करत असतात, की कंपनीमध्ये काम करावे, परंतु कंपनीमध्ये आठ ते बारा तास काम करणे हे खूप अवघड जातं, त्यामुळे अनेक पुरुष कंपनीमधूनही बाहेर पडतात, तर अशा पुरुषांसाठी आम्ही हे एक सल्ला देऊ शकतो. ज्या द्वारे तुम्ही घरगुती व्यवसाय करू शकतात, ते म्हणजे दुकानात लागणारे कुरकुरे बनवणे आणि त्याला पॅकिंग करून दुकानदाराला विकणे हा एक अतिशय चांगला व्यवसाय आहे. जो तुम्ही घरी बसल्या-बसल्या करू शकतात.

कुरकुरे कशाप्रकारे बनवणे आणि पॅकिंग करणे :

कुरकुरे बनवणे हे एवढे अवघडेही नाही, जो तुम्ही घरीबसल्या सहजपणे बनवू शकतात. आणि पॅकिंग सुद्धा तुम्ही एका मशीनद्वारे सहज पॅकिंग करू शकतात. पॅकिंग मशीन हे तुम्हाला फ्लिपकार्ट केव्हा अमेझॉन द्वारे सहज मिळू शकतात. ते मशीन फक्त तुम्हाला एक ते दीड हजार मध्ये सहज मिळून जाईल. त्या पॅकिंग मशीन द्वारे तुम्ही कुरकुरे पॅकिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला मिठाच्या सहाय्याने आणि कुरकुरे बनवण्याचा काय कच्चामाल मिळतो. त्याच्याद्वारे तुम्ही सहज कुरकुरे बनू शकतात.

हे ही वाचा : बचतगट कसा सुरु करायचा आणि बचत गटाचे फायदे

घरी बसल्या एलईडी लाईट बनवणे :

पुरुषांसाठी हा एक अतिशय उत्तम व्यवसाय आहे, जो तुम्ही घरी बसल्या एलईडी लाईट बनवून दुकानात विकू शकतात. आणि हा एलईडी लाईट अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या बनवू शकतात, तर तुमच्या मनात विचार आलाज असेल, की हा एलईडी लाईट घरी बसल्या कस काय बनवू शकतो. तर ते म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एलईडी लाईटची प्लेट आणि त्याला लागणारे काही साहित्य आणणे, एलईडी लाईट ला लागणारे साहित्य मार्केटमध्ये अगदी स्वस्त दरात मिळतात, म्हणजे एक एलईडी लाईट चे साहित्य जर तुम्ही घ्यायला गेले तर, त्या साहित्याची किंमत अगदी स्वस्त आहे, ते म्हणजे तुम्हाला 30 ते 40 रुपये मध्ये सहज मिळू शकेल. जो तुम्ही एका एलईडी लाईट द्वारे तुम्ही 60 ते 70 रुपये सहज कमवू शकतात. हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर तुम्ही हा व्यवसाय घरी बसल्या सहज करू शकतात.

दुधाचा व्यवसाय करणे :

दुधाचा व्यवसाय हा पुरुषांसाठी अगदी सविस्तर व्यवसाय आहे, जो तुम्ही घरी बसल्या-बसल्या करू शकतात, ते म्हणजे कसे ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत,

घरी बसल्या दुधाचा व्यवसाय कशाप्रकारे करावा :

घरी बसल्या बसल्या दुधाचा व्यवसाय हा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ते म्हणजे तुमच्या गावात एक दुधाची डेअरी उघडू शकतात. त्याच्याद्वारे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांकडून दूध विकत घ्यावा लागेल, जो तुम्ही त्या दुधाची पॅकिंग करून विकू शकतात. जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा प्राप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *