आजच्या लेखात आपण चंदन शेती लागवड संपूर्ण माहिती पाहूया. चंदन हे परजीवी आहे. चंदन शेतीसाठी जमीन निवड करताना आपल्याला अनेक गोष्टी ध्यानात ठेवल्या लागतील. जमिनीची निवड करताना सर्वसाधारण दोन ते तीन फूट ती खोल खोदता गेली पाहिजे. जिथे कडुलिंब, बाभळीचे झाड आपल्याला दिसत असेल, होत असेल त्या जमिनीमध्ये चंदन हा हमखास येते. हलकी मध्यम पोटाची भारी, लाल मातीची,काळ्या मातीची किंवा पाण्याची निचरा होणारी कोणती जमीन चंदन लागवडीस उपयुक्त आहे. जमिनीची पूर्व मशागत करत असताना जमीन खोल नांगरली गेली पाहिजे. जिथे आपल्याला नवीन लागवड करायची आहे तिथे एकदा नागरून रोटर मशीन ने नांगरून माती भुसभुशीत करून घ्यावी. जेणेकरून तिथे आपल्याला पाणीसाठा ठिबक सिंचनाद्वारे चांगला करता येईल.
जमिनीच्या प्रत वालीनुसार दीड बाय दीड खड्डा करणे आवश्यक आहे. लागवडीच्या नुसार एक महिना अगोदर हे खड्डे तापउ दिले पाहिजे. तापवू दिल्यानंतर लागवडीच्या वेळेस त्या मध्ये निंबोळीचे 100 ग्रॅम पेंड हे सुद्धा टाकू शकतो. आणि लागवड करत असतानी त्याच्यामध्ये कंपोस्ट खत टाकू. साधारणता दहा बाय बारा वर तीनशे झाड लागतात. ऑगस्ट महिन्यापासून तर फेब्रुवारी पर्यंत ही लागवड आपण कधी करू शकतो. लागवड करीत असताना सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या शेतीला पाणी द्यावे लागत नाही. परंतु हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गरजेनुसार आठवड्यातून आठ ते दहा लिटर पाणी द्यावेच लागते. आणि ठिबक सिंचन असल्यास आठवड्यातून आठ ते नऊ लिटर पाणी दिले तरी चालेल. अशाप्रकारे आपण चंदनाची शेती आणि लागवड करू शकतो.
चंदन लागवडीच्या काही महत्त्वाच्या टिप्स :
आपण जर चंदनाची लागवड करणार असाल तर चंदनाच्या लागवडीसाठी लाल चंदन किंवा पांढऱ्या चंदनाचे रोपे लागवडीसाठी वापरावीत. आपण चंदनाची लागवड करत असताना सोळा बाय बारा फुटावर लागवड करावी. आणि ही काळजी घ्यावी दोन झाडांमध्ये लागवड करत असताना पोस्ट प्लांट अर्थात यजमान वृक्षाची लागवड सुद्धा करावी. यासोबतच चंदन रोप लागवडी च्या विक्रीसाठी बँक लोन साठी सबसिडीसाठी व या या संदर्भातल्या इतर माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या वन विभाग च्या ऑफिसला भेट द्या किंवा कृषी विभागाला भेट द्या. या महत्वपूर्ण टिप्स वापरून आपण चंदन शेतीमध्ये भरगो द उत्पन्न करु शकतात.
चंदन शेती लागवड :
आपल्या देशात फार कमी प्रमाणात चंदनाची शेती केली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेला आहे. तुमच्या शेतातील चंदनाचा एक झाड तुम्हाला तब्बल पाच लाख रुपये रुपये एवढी किंमत मिळून देऊ शकतो. हे माहीत असूनही बरेच शेतकरी चंदनाची शेती करण्याचे टाळतात कारण त्यांच्याकडे त्याबद्दल च योग्य मार्गदर्शन नसते आणि तेच मार्गदर्शन या लेखांमधून तुम्हाला मिळणार आहे.
आपल्याकडे प्रामुख्याने पांढरे चंदन नाची लागवड केली जाते. कारण आपल्या शेतामधील माती पांढरा चंदनासाठी पोषक असते. त्या पांढऱ्या चंदनाची रोप जवळच्या रोपवाटिका मध्ये मिळू शकतात किंवा तिथे नाही मिळाली तर भारत सरकारच्या वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये हमखास मिळतात. ही रोप खूप महाग असतात म्हणजे त्याच्याकडून रोपाची किंमत 500 ते 600 रुपये एवढी असते. आता आपण चंदन रोपांची लागवड कशी करायची याबद्द पाहणार आहोत. तुम्ही जून जुलै ऑगस्ट या महिन्यात चंदनाची लागवड करू शकतात पावसाळ्यात चंदनाची लागवड करणे फार फायदेशीर असते कारण पावसाळ्याचे वातावरण चंदनाच्या लागवडीसाठी फार फायदेशीर असते. लागवडीसाठी सोळा बाय बारा या तंत्राचा वापर करावा.
चंदनाचे भाव :
आत्ताचे बाजार भाव बघितले तर साधारणता पांढरा चंदनाची किंमत भारतात 16 ते 12,00 इतका आहे आणि लाल चंदनाची किंमत पाच हजार इतकी आहे.
चंदन शेती भारतात कायदेशीर आहे का?
चंदन लागवडीसाठी भारतात कोणत्याही सरकारी किंवा विभागाची परवानगी लागत नाही. परंतु चंदन लागवडी झाल्यानंतर काही प्रमुख कायदेशीर बाबी आहे, ते काही अवघडही नाही, त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. चंदन लागवड झाल्यानंतर तलाठी ऑफिसला जाऊन तलाठी साहेबाकडून सातबारावर नोंद करून घ्यावी लागेल, आणि चंदनाचे झाड तोडताना फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट ची परवानगी घ्यावी लागेल. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 हेक्टर मागे 45,000 ₹ अनुदान सरकारकडून तीन टप्प्यांमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील.
जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही औषधी निर्माण अधिकारी यांना भेटून चंदन लागवडीसाठी काही माहिती मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही वन विभाग अधिकारी यांच्याकडे जरी गेले तरी तुम्हाला चंदन लागवडीसाठी काही माहिती मिळून जाईल. कारण वन विभाग अधिकारी यांच्याकडे चंदन लागवडीचे पूर्ण G.R असतो.
चंदनाचे झाड वाढण्यास किती वर्षे लागतात :
चंदन हे पर रुक्क्ष जीव पीक असल्यामुळे त्याच्या सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्र पिकाची लागवडही तुम्ही करू शकतात. यासाठी मिश्रण पद्धती तंत्रज्ञान वापरावे लागते. मिश्र पद्धतीने फुल शेती वनशेती, चंदन शेती 100% सक्सेस रित्या पार पडतात. मिश्र पद्धतीने चंदन, सीताफळ, कडू लिंबू, आंबा, आवळा आशा मिश्र पिकांमुळे चंदनाच्या उत्पादना अधिक शेतकऱ्याला लाखो रुपयाची उत्पन्नही मिळते. चंदन लागवडीनंतर 8 ते 12 वर्षात प्रति एकर कोट्यान रुपये मध्ये उत्पादन मिळते. या वरील दिलेले माहितीवरून तुम्ही चंदनाची शेती करू शकतात.
मला चंदन लागवडीसाठी परवाना कसा मिळेल :
भारतामध्ये चंदन असो, जांभूळ असो, अंबा असो, अशा प्रकारचे काही विविध वृक्ष आहेत. वृक्षतोड होऊ नये म्हणून अधिनियम 1964 हा कायदा या ठिकाणी लागू आहे, ज्या कायद्याच्या आधीन राहून अशा प्रकारचे वृक्षाची तोड आपल्याला करता येत नाही. जर वृक्षाचे तोड करायची असेल. तर आपल्याला वन अधिकारी च्या माध्यमातून परवाना घ्यावा लागतो. शासनाचे याच्यासाठी परवाना घ्यावा लागते. परंतु याच प्रमाणे आपण पाहिले तर चंदन लागवड आपल्याला खूप फायदेशीर लागवड आहे. कारण याच्या माध्यमातून आपण पाहिले तर बांधावर चंदन लागवड करून किंवा इतर कोड्या क्षेत्रांमध्ये चंदन लागवड करून शेतकरी एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो.
मात्र या प्रकारच्या कायद्याला अधीन राहून या ठिकाणी चंदन लागवडीचा परवाना घेऊन, चंदन तोडणी चा परवाना, या सगळ्या बाबींमुळे शेतकरी चंदन पिकाकडे वळत नाही. याच वृक्षतोड अधिनियम 1964 च्या या कायद्यांमध्ये काही बदल करण्याची एक अधिकृत सूचना 30 मार्च 2021 रोजी काढण्यात आलेली आहे. आणि ती आधी सूचना तुम्ही पाहू शकतात. 30 मार्च रोजी जे काही राजपत्र आहे. 2021 रोजी ची महसूल विभागाची अधिसूचना या राजपत्रात प्रकाशित करण्यात आलेली आहे. हे महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत अधिनियम 1964 कलम दोन नुसार याबाबतीत इतर सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिनियमांमध्ये समाविष्ट असलेल्या चंदन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाडाची संरक्षणाची आवश्यकता विचारात घेतल्यानंतर गुप्ता अनुसूचित खालील प्रमाणे सुधारणा करीत आहे. या अधिनियमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले अनुसूचित अनुक्रमांक 8 मधील चंदन यांच्याशी संबंधित नोंदवण्यात येत आहे. तर अशाप्रकारे ही अधिसूचना काढून या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहे.
रेड सँडर्स आणि पांढरा चंदन यांच्यात काय फरक आहे?
रेड सँडर्स याच चंदनाचे वापर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी बनवण्यासाठी केला जातो. रेड सँडर्स हा चंदन भारताच्या ईस्ट भागातच पाहायला मिळतील. त्याचबरोबर या चंदनाला पूर्णपणे येण्यासाठी 30 वर्षे लागतात. त्याचबरोबर दुसरीकडे पांढऱ्या चंदनाची लागवड पूर्ण भारत देशात पाहायला मिळतील. या पांढऱ्या चंदनाची पूर्णपणे वाढ होण्यास फक्त 8 ते 12 वर्षे लागतात. आणि या चंदनाची झाडाची उंची 4 ते 10 मीटर असते, तर दुसरीकडे रेड सँडर्स चंदनाची उंची, 5 ते 8 मीटरची असते. याप्रकारे रेड सँडर्स आणि पांढऱ्या चंदनात फरक आहे.
चंदनाचा वास किती काळ टिकतो
चंदन हा वृक्ष जर तुम्ही पाहिले तर पारंपारिक दृष्टीने या चंदनापासून अगरबत्ती सुद्धा तयार होते. आणि त्या अगरबत्तीचा वास जोपर्यंत ती अगरबत्ती विजत नाही, तोपर्यंत त्या अगरबत्तीचा वास येत असतो. तर त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडाची साल जर तुम्ही काढली तर यात चंदनाचा वास 1 ते 2 तासा पर्यंत असतो. त्याच प्रमाणे चंदनाद्वारे काही अनेक प्रकारचे सेंट ही बनवले जातात. चंदनाच्या सेंटरचा वास पाहिला तर 2 ते 3 तासापर्यंत या चंदनाच्या सेंड चा वास असतो.
लाल चंदन त्वचेसाठी चांगले आहे का?
लाल चंदनाला रक्तचंदन सुद्धा म्हणतात, लाल चंदन हा तुमचा चेहरा चांगल्या प्रकारे निहारण्यासाठी कामी पडतो. जर तुम्ही या लाल चंदनाचा फेस वास जरी केले तर तुमच्या त्वचाला अनेक प्रकारे लाभ होऊ शकतात. लाल चंदन हा एक प्राकृतिक सामग्री आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. चेहरा साफ करायचा असेल किंवा पिंपळ हटवायचा असेल, तर तुम्ही घरी बनवलेल्या लाल चंदनाचा फेस वास तुम्हाला खूप कमी पडेल. जर तुम्हाला त्वचावर निहार पाहिजे असेल तर लाल चंदन आणि मुलतानी माती चे प्रमाण बराबर-बराबर मात्रा मध्ये दूध किंवा दही मध्ये मिक्स करून त्वचेवर लावने. चंदन हा एक असा वृक्ष आहे, जे तुमच्या चेहऱ्याच्या मधून पोषण पाठवण्याचा काम करतो. यावरील दिलेल्या प्रकारे तुम्ही जर लाल चंदनाचा वापर करत असाल, तर तुमच्या त्वचेसाठी लाल चंदन हा नक्कीच फायदेशीर पडेल.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles