हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकर? ज्वारीच्या भाकरीचे फायदे

हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकर ज्वारीच्या भाकरीचे फायदे

हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकर? ज्वारीच्या भाकरीचे फायदे : हिवाळ्यात वातावरण हे नेहमी बदलत असते. आणि या बदलत्या वातावरणामुळे खूप लोक आजारी सुद्धा पडतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती ही कमकुवत होते. आणि ज्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.तसेच हिवाळ्यात विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. आणि यापैकीच एक म्हणजे ज्वारीची भाकर. ज्वारीची भाकर ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण ती खायला पाहिजे. कारण ज्वारी मध्ये खनिजे आणि भरपूर जीवनसत्वे असतात. हिवाळ्यात आजारी पडू नये म्हणून आपल्या आहारात बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठीआहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करायला हवा.

चला तर मग जाणून घेऊया! ज्वारीच्या भाकरीचे फायदे?

ज्वारीची भाकर खाण्याचे फायदे जाणून घेऊयात. हिवाळ्यात ज्वारीची भाकर खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. ज्वारीची भाकर खाल्ल्याने देखील अनेक आजार आपल्यापासून लांब राहतात. एवढेच नव्हे तर ज्वारीची भाकर खाल्ल्याने आपली पचनक्रिया मजबूत राहते.

कशी करते ज्वारीची भाकर अनेक आजारांपासून बचाव?

ज्वारीमध्ये विटामिन बी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह,पोटॅशियम, प्रथिने आणि कॉम्प्लेक्स असे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक आपल्या शरीराला आजारांपासून लांब राहण्यात मदत करतात.तर वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ज्वारीची भाकर अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला पाहिजे.

हिवाळ्यात का खावी ज्वारीची भाकर ज्वारीच्या भाकरीचे फायदे

रक्तातील साखर कशी नियंत्रित ठेवते ज्वारीची भाकर!

हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी ज्वारीची भाकर खायला हवी. कारण हिवाळ्यात ज्वारीची भाकर ही आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. ज्वारी हे एक जटिल कार्बोहायड्रेट आहे की जे हळूहळू पचते.त्यामुळे मधुमेही आणि वजन कमी करायचे असेल या लोकांसाठी हा एक सर्वात उत्कृष्ट पर्याय आहे.

हाडे मजबूत करते :

ज्वारी मध्ये असलेले प्रोटीन आपले स्नायू आणि हाडे मजबूत करतात. ज्वारी हे ग्लुटेन मुक्त आहे. ज्वारी शरीरात कॅल्शियमची पातळी राखण्यास मदत करते. कारण मॅग्नेशियम कॅल्शियम शोषण वाढण्यास मदत करते. आणि चोरीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे ज्वारीची भाकर खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात. ज्वारी ग्लुटेन मुक्त असल्यामुळे ग्लुटेन मुक्त अन्न खाणाऱ्यांसाठी देखील ती आरोग्यदायी ठरते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त :

ज्वारीची भाकर खाल्ल्याने पोट भरलेले राहते. कारण ज्वारी मध्ये इतर धान्यापेक्षा जास्त फायबर असते. ज्यामुळे तुम्ही सारखे सारखे खाणे टाळता. कारण फायबर मुळे तुम्हाला पोट भरलेले वाटते. आणि त्यामुळे तुम्ही कमी खातात, यामुळेच वजन नियंत्रित राहण्यात मदत होते. म्हणजेच वजन कमी होण्याची शक्यता वाढते.

हृदयरोगापासून संरक्षण :

ज्वारीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्वारी ही हृदयविकारापासून देखील आपले संरक्षण करते.त्यासाठी आपल्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.

पचनशक्ती वाढवते :

ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पचनशक्ती वाढवण्यासाठी आपली पचन संस्था मजबूत करते. आणि त्यामुळे बद्धकोष्टता यासारख्या समस्येपासून सुद्धा देखील आपल्याला आराम मिळतो. आणि आपल्याला आपली पचनशक्ती वाढवायची असेल तर, आपल्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ज्वारीची भाकर ही आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

लोह भरपूर असते :

एक कप ज्वारी मध्ये 8.45 मिलीग्राम इतके लोह असते.आणि ज्वारीतील लोह हे नॉन – हेम असते.आणि त्यामुळे ते विटामिन सीच्या स्रोतासोबत एकत्र केल्यास तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील. त्यासाठी आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. आणि ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.प्र

प्रथीने जास्त असतात :

ज्वारीमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.आणि त्यामुळे उतींची दुरुस्ती होण्यास मदत होते.आणि 100 ग्रॅम ज्वारीमध्ये 11 ग्रॅम प्रथीने असतात.तर आपल्या शरीराला निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करायला हवा.

ज्वारी ही ग्लुटेन मुक्त कशी असते?

ज्वारी ग्लुटेन मुक्त आहे आणि ती सर्वोत्तम धान्यामध्ये गणली जाते.ज्वारीचा स्वभाव उष्ण आहे. आणि लोकांना हिवाळ्यात ज्वारीच्या भाकरी खायला आवडतात.भारतात ज्वारी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते.ज्वारी दळून पीठ दळले जाते.आणि ते भाकरी, डोसा, आणि चिला बनवण्यासाठी वापरले जाते.

ज्वारीचे आहारातील महत्व :

ज्वारी खाण्याचे फायदे ऐकून रोज ज्वारी खाल!

 1. ज्वारी थंड, गोड,रक्तविकारहारक, पित्तशामक,रुक्ष असून कफ व वायुकारक आहे.
 2. पांढरी ज्वारी बलदायक व पथ्यकारक असून मूळव्याध, अरुची, व्रण पडणे यावर उपयोगी असते.
 3. लाल ज्वारी पौष्टीक,थंड, गोड,बलदायी,त्रिदोषहारक मात्र किंचित कफकारी आहे.
 4. ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफ कमी होतो.
 5. ज्वारीमध्ये मिनरल,पोटॅशियम,मॅग्नेशियमचे प्रमाण असते त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
 6. ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ राहते.
 7. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खाणे फायद्याचे असते.
 8. लोह मुबलक प्रमाणात असल्यामुळे अँनिमीया सारखा आजार असणाऱ्यांनी ज्वारीचे पदार्थ खाल्ल्यास चांगला फायदा होईल.
 9. सध्याच्या राहणीमानमुळे लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढते आहे आणि लठ्ठपणा म्हणजे आजारांना निमंत्रण.आहारात भाकरीचे सेवन केल्यास लठ्ठपणा, चरबी नियंत्रणात येण्यास मदत होईल.
 10. ज्वारी रक्तवाहिन्यातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासही मदत करते.
 11. मुतखडाचा त्रास असलेल्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी व इतर पदार्थ खाल्ल्यास फायदा होतो.
 12. विविध रोगांना बळी पडण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होते.
 13. अशा बहुगुणी ज्वारीचे सेवन आपल्या दररोजच्या आहारामध्ये एकवेळी केल्यास आपले आरोग्य चांगले ठेवण्यास निश्चित उपयोग होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *