Skin Protection From Sun: सूर्यापासून त्वचेचे संरक्षण कसे करावे?

Skin Protection From Sun: सूर्यापासून त्वचेचे संरक्षण कसे करावे?

सूर्यकिरण आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.ते आपल्याला विटामिन डी तयार करण्यासाठी आवश्यक घटक प्रदान करतात. विटामिन डी केवळ शारीरिकच नाही तर, मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. पण जेव्हा सूर्याची किरणे तीक्ष्ण होतात किंवा सूर्यप्रकाशाचा अतिरेक होतो, तेव्हा ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक बनू लागते. सूर्याच्या आनितील किरणांमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यासाठी सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अनेकांकडून कृत्रिम प्रॉडक्ट चा वापर केला जातो. परंतु या कृत्रिमप्रॉडक्ट पासून दुष्परिणामांचा धोका असतो. त्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघूयात.ज्यामुळे तुम्ही सूर्याच्या अनितील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकतात. तर जाणून घेऊयात की कोणत्या आहेत ते उपाय, Skin Protection From Sun: सूर्यापासून त्वचेचे संरक्षण कसे करावे?!

सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण कसे करावे? असे करा सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण!

skip-protection-from-sun-2

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते म्हणून आपण जितकी त्वचेची काळजी घेतो तितकी काळजी आपण आपल्या त्वचेची उन्हाळ्यात घेत नाहीत.परंतु उन्हाळ्याच्या दिवसात मात्र सतत येणारा घाम आणि उन्हामुळे होणारे टॅनिंग याचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. सूर्यकिरणांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर काळे चट्टे पडणे, पिंपल्स येणे, टॅन होणे आणि त्वचा काळवंडणे अशा अनेक समस्या उद्भवतात. कधी तुमची त्वचा खूप तेलकट होते किंवा कधी त्वचा एकदम कोरडी पडते. तर या सर्व समस्यांसाठी आपण काही उपाय बघणार आहोत, तर ते पुढील प्रमाणे आहेत.

लिंबूचा रस:

एका वाटीत एक किंवा दोन लिंबू पिळून घ्यावेत, आणि त्यानंतर सुती कापडाने किंवा कापसाने सूर्यकीरणांनी प्रभावित झालेल्या त्वचेवर तुम्ही तयार केलेला लिंबूचा रस लावा.आणि रस लावल्यानंतर 30 मिनिटांनी तुमची त्वचा कोमट पाण्याने धुऊन घ्या.आणि त्वचा कोरडी करा.त्यानंतर त्वचेला हायड्रेड ठेवणारी एखादी क्रीम लावा.आणि हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करू शकतात.

भरपूर पाणी प्या:

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे.जसे उन्हाळ्यात पाणी पिणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.शरीराचं आणि त्वचेच तापमान हे बाहेरच्या तापमानाशी किंवा वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे.

skip-protection-from-sun-3

सूर्याच्या अनितील किरणांपासून बचाव

सूर्याची आणि तील करणे आपल्या शरीर, त्वचेसाठी हानिकारक असतात हे आपल्याला माहीतच आहे. परंतु अशामध्ये खोबरेल तेल एका चांगल्या सनस्क्रीनप्रमाणे काम करू शकते. खोबरेल तेल लावल्याने, तुमच्या शरीराचे सूर्याच्या आणि तील किरणांपासून संरक्षण होते. आणि प्रकर सूर्यकिरणामुळे तुमची त्वचा भाजून निघणार नाही, आणि त्वचा तुकतुकीत राहण्यास मदत होईल. त्यामुळे सूर्याच्या आणितील किरणांपासून बचाव करण्यासाठी खोबरेल तेलाचा प्रयोग करणे उपयोग ठरेल.

 न विसरता सनस्क्रीन लावा:

घराबाहेर कोठेही जायचे असल्यास, घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे. सन स्क्रीन हे फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर एरवी कधीही लावायला हवे. कारण सनस्क्रीनमुळे आपल्या त्वचेचे सूर्याच्या आणि तील सूर्यकिरणांपासून संरक्षण होते. सन स्क्रीन केव्हा लावायचे तर, घराबाहेर पडण्याअगोदर 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लोशन लावावे.त्यामुळे त्वचेला सूर्यकिरणांपासून त्रास होत नाही. आणि आपल्या त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते. त्यामुळे न विसरता सनस्क्रीन लावायला हवे.

 दूध आणि हळद:

अर्धा कप दुधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करावी. हळदीमध्ये अनेक महत्त्वाचे गुणधर्म असतात. आणि हळद लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हळद ही क्लींजर म्हणून सुद्धा उपयोगी पडते.दूध आणि हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवावी. आणि ही तयार केलेली पेस्ट चेहरा, मान आणि गळा इत्यादी ठिकाणी लावावे. आणि त्यानंतर ते कोरडे झाल्यावर त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे. हा उपाय सुद्धा त्वचेचा सूर्यकिरणापासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

skip-protection-from-sun-4

सनस्क्रीन सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करते का?

तर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सनस्क्रीनचा  वापर करणे. हा उपाय त्यावर प्रभावी ठरू शकतो. जसे की उन्हाळा सुरू होताच तुमच्या कपड्यांची निवड बदलते, तसेच ऋतूनुसार आपल्या त्वचेची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना त्वचेची योग्यरीत्या काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आणि सूर्याच्या हानीकारक सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्वचेवर सनस्क्रीन क्रीम वापरणे हा एक चांगला पर्याय आहे.

सनस्क्रीन कसे उपयुक्त ठरू शकते?

तर सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचेचा बाहेरील थर हा सुरक्षित राहतो आणि आपल्या चेहऱ्यावर आरोग्यदायी चमक येते. सूर्याच्या हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. जसे की, झिंक ऑक्साईड, टायटॅनियम ऑक्साईड, या गोष्टी आपल्या त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रभावापासून आणि सूर्यप्रकाशापासून सुद्धा संरक्षण करते. सनस्क्रीन हे आपल्या त्वचेवर एका थरासारखे काम करते की, जे आपल्या त्वचेला प्रखर सूर्यकिरणापासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते.

 सनस्क्रीन लावण्याचे फायदे:

  •  त्वचा निरोगी राहते.
  •  मुरुमांच्या खुणा कमी होण्यास मदत होते.
  •  टॅनिंगची समस्या उद्भवत नाही.
  •  सनबर्नपासून संरक्षण करते.
  •  अकाली वृद्धत्व येत नाही.
  •  हायपरपिगमेंटेशनपासून मुक्ती मिळते.

skip-protection-from-sun-5

 सूर्यापासून त्वचेचे संरक्षण कसे करावे!

तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुमची सर्वोत्तम पैज म्हणजे सनस्क्रीन वापरणे किंवा तुम्ही घराबाहेर असताना संरक्षणात्मक कपडे घालणे. आणि तुम्ही सावलीत असताना सुद्धा संरक्षणात्मक कपडे घालणे.छत्री, झाड किंवा इतर आश्रयस्थानाखाली सावलीत राहून तुम्ही सूर्यापासून होणारे नुकसान आणि तुमच्या त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता.उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी प्यावे व हे प्रमाण साधारणतः 3 ते 4 लिटर पाणी एका दिवसाला पिणे आवश्यक आहे.

उन्हात बाहेर फिरताना पाणी पिण्यासोबतच बाह्य त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. चहा,कॉफी आणि इतर पेय शक्यतो टाळावे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात जागरण करणेही आरोग्यास पूरक नाही. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी सन प्रोटेक्टर बरोबरच मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल. खूप घाम आल्यामुळे त्वचेवर ऍकने आणि कॉम्बेटोन्स उठण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे चेहरा अनेकदा धुणे आणि स्वच्छता राखणे, हात,पाय व चेहरा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *