दूध डेरी व्यवसाय संपूर्ण सविस्तर माहिती

दूध डेरी व्यवसाय संपूर्ण सविस्तर माहिती

आजच्या लेखात आपण दुग्ध डेरी व्यवसाय संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. दूध डेरी या व्यवसायाला शहरी भागात असो या ग्रामीण भागात असो या व्यवसायाची खूप मागणी आहे. कारण लोक आज पॅकिंग दूध पेक्षा शुद्ध, ताज दूध घेण्यासाठी पसंती करतात. हा व्यवसाय  तुम्ही कमी भांडवलामध्ये सुद्धा सुरू करू शकता. यामुळे आज काल भरपूर भागात दूध डेरी बघितले असतील.

दूध डेरी हा व्यवसाय सकाळी सहा वाजेपासून तो रात्री दहा वाजेपर्यंत  हा व्यवसाय चालूच ठेवावा लागतो. दूध डेरी हा असा व्यवसाय आहे. जर तुम्ही हा व्यवसाय मनापासून आणि कष्टाने केला की याच्यात निश्चितच यश मिळते. या व्यवसायाला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. स्टेबल, स्थिरता येण्यासाठी थोडा कालावधी लागतो.  आज आपण दूध डेरी सुरू करण्याचे साहित्या बद्दल माहिती घेऊया. दूध हा पदार्थ हा नाशवंत पदार्थ आह. या व्यवसायासाठी मुख्य साहित्य म्हणजे फ्रीजश, कॅन, मोजमाप काटा अशा अनेक वस्तू लागतात. दुग्ध व्यवसायासाठी कर्ज हवा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बाब या व्यवसायाची तुम्ही लक्षात घ्या ती म्हणजे देशात कितीही संकट असू द्या हा उद्योग व्यवसाय कधीही बंद पडत नाही हा एक शेतीपूरक जोडधंदा असल्यामुळे तुम्हाला याच्या मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नफा कमवता येऊ शकतो.

हा व्यवसाय तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी नसाल तरीही हा व्यवसाय तुम्ही करू करू शकता. दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तुमची जर मनापासून तयारी आणि मेहनत घेण्याची मानसिकता असेल तर तुम्हाला हे सगळं शक्य आहे असं असलं तरी दुग्ध व्यवसाय जितकं सोपं वाटतं त्या मानेने या धंद्यात यशस्वी होणे तितकेच सोपं नसतं म्हणून तुम्ही जर या धंद्यात उतरणारच असाल तर अगोदर बारीक सारीक माहिती मिळवा. थोडासा का होईना किमान सहा महिन्याचा दूध डेअरी मध्ये काम करण्याचा अनुभव घ्या आणि मगच या धंद्यात उतरा.

दूध व्यवसायासाठी कर्ज :

तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज पाहिजेत असेल तर एक काम करा. लाभारीत च्या अनेक योजना आहे. त्या योजनेबद्दल तुम्ही माहिती मिळवा. यापैकी शून्य व्याजदर कर्ज मिळवून देणाऱ्या तीन  महत्वपूर्ण योजना आहेत, त्याबद्दल आपण पाहुयात.

दुग्ध व्यवसायासाठी प्रमुख कर्ज योजना :

  1. दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास योजना (Dairy Entrepreneurship Development Scheme)
  2. दूध धुण्याची तपासणी यंत्र शीतकरण यंत्रे खरेदी योजना (Commercial Production Units of Organic inputs).
  3. कृषी क्लिनिक आणि कृषी उद्योग केंद्र योजना. (Agriclinic and Agribusiness Centres scheme).

दूध डेअरी व्यवसाय फायदेशीर आहे का ?

दूध उत्पादनात भारत हा देश पहिल्या स्थानी असला तरी दुधाच्या उत्पादन क्षमतेत भारत जगाच्या खूप मागे आहेत.  फायदेशिर दुध व्यवसायासाठी डेअरी व्यवसाय  समजून घेण अति आवश्यक आहे..गाईंचा, म्हशी ना चुकीच्या पद्धतीने खाद्य व्यवस्थापनामुळे दुधव्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चालत आलेला आहे. दुधाला कमी भाव दर हा विषय वरती असला तरीही दुधाची उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ  याचाच विचार करून भविष्यात या व्यवसायात  बदल करावे लागणार आहे.  यामध्ये दुध व्यवसाय फायदेशिर करण्यासाठी गायी फायद्याच्या आहे की म्हशी?एक लिटर दूधामागे किती खर्च येतो? आणि फायदेशिर व्यवसायासाठी घरच्याघरी पशुखाद्य तयार कराव का? या गोष्टींचा विचार होण गरजेच आहे.

हे ही वाचा : बचतगट कसा सुरु करायचा आणि बचत गटाचे फायदे

दुग्ध व्यवसाय अनुदान योजना :

दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास योजना (Dairy Entrepreneurship Development Scheme) :

या योजनेअंतर्गत पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे गव्हर्मेंट सबसिडी डेरी फार्मर उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो जर तुमच्याकडे डेरी फार्म उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला या योजने अंतर्गत बँकेकडून सात लाख रुपये पर्यंतचा कर्ज मिळेल तुम्हाला ही डेरी फार्म उघडण्यात रस असेल ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. आणि उपयुक्त आहे.

आपण डेअरी उघडण्यासाठी बँकेकडून कर्ज कसं घेऊ शकता आणि सरकारच्या अनुदानाचा लाभ कसा घेऊ शकता हे जाणून घेणार आहोत. याशिवाय अर्ज करण्याची पद्धत आणि कागदपत्र बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. सरकारच्या डेरी उद्योजक विकास योजनेबद्दल डेरी उद्योजक विकास योजना पशुसंवर्धन आणि दुग्ध उद्योगाला डेरी प्लॅनच्या चालना देण्याच्या उद्देशाने सरकार द्वारे दुग्ध उद्योजक विकास योजना चालवली जाते या योजनेअंतर्गत दहा मशीन दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन म्हणजे गव्हर्नमेंट सबसिडी डेरी फार्मिंग विभागाकडून विभाग सात लाख रुपये पर्यंतचा कर्ज दिला जात आहे याशिवाय शासनाकडून सबसिडी दिल्या जाते.

भारत सरकारने एक सप्टेंबर 2010 रोजी पासून ही योजना सुरू केली आहे या योजनेत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल देखील केले आहेत. आता कशी दिला जाणार सबसिडी मित्रांनो दुग्ध व्यवसाय डेरी प्लॅन उघडण्यासाठी तुम्हाला अनुदानाचा लाभ कसा मिळेल याबद्दल जाणून घेऊया. या योजनेअंतर्गत दिल्या जाणारा अनुदान हे बँक इंडेड सबसिडी असेल या योजनेअंतर्गत नाबार्ड कडून दिले जाणारा अनुदान तुम्ही ज्या बँक खात्यातून कर्ज घेतला आहे त्यास बँक खात्यात दिले जाईल यानंतर ती बँक कर्ज देणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमा करतात.

दहा म्हशीच्या डेरी वरती आपल्याला किती कर्ज मिळू शकता. जर तुम्हाला दहा मशीनची डेअरी उघडायची असेल तर दहा लाख रुपये लागतील यापैकी तुम्हाला बँके कडून किमान सात लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतो यावर तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या डी इ डी एस योजने सुमारे अडीच लाख रुपयाची सबसिडी मिळेल हे अनुदान नाबार्ड कडून दिले जातात.

बँक कर्ज साठी अर्ज कसा करावा ? बँकेच्या कर्जासाठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला एक डेरी प्रकल्प म्हणजेच डेरी प्रोजेक्ट बनवावा लागेल उघडायची आहे त्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल या सोबतच कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रे द्यावे लागतील आता ती कागदपत्रे कोणती आहेत यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅन कार्ड, अर्जदार दाराचे जात प्रमाणपत्र, अर्जदाराच्या बँक खातेचा कॅन्सल चेक बँकेत ना हरकत प्रमाणपत्र, याशिवाय डेअरी प्रोजेक्ट रिपोर्टचे झेरॉक्स.

डेअरी फार्मिंगचे प्रकार कोणते आहेत :

डेअरी फार्मिंग चे खालील काही प्रकार आहेत. ते तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकतात.

  1. Holy Steel Variation :- या गाईचे दूध खूप ज्यादा मात्रा मध्ये असतो. ही गाई खूप दिवसापर्यंत दूध देत असते.
  2. Brown Switch :- ही गाय दुसऱ्या गायांपेक्षा अधिक दूध देते, आणि फॅटही खूप जास्त पाहायला मिळतील
  3. Jersey :- या गायची एक काशीद अशी आहे, की ही गाय जितकी जास्त खाते. तेवढे जास्त दूध देते,
  4. Greenland :- ही एक गाय अशी आहे, जी ही गाय भारतातील नाही.  ही ब्राझील मधील काय आहे. आणि या गाईचे दूध देण्याबाबत रेकॉर्ड आहे. परंतु हे गाय जास्त दिवसापर्यंत दूध देत नाही.

वरील दिलेल्या गायांचे तुम्ही डेअरी फार्मिंग टाकू शकतात. किंवा त्याचबरोबर तुम्ही म्हशीचे, शेळीचे, कोंबड्याचे व इतर अनेक प्रकारचे जनावरांचे तुम्ही डेअरी फार्मिंग टाकू शकतात.

दूध डेरी व्यवसाय संपूर्ण सविस्तर माहिती
दूध डेरी व्यवसाय संपूर्ण सविस्तर माहिती

डेअरी फार्मिंग वर्ग 8 म्हणजे काय?

डेअरी फार्मिंग वर्ग 8 म्हणजे, दुग्धव्यवसाय हे दुधाच्या दीर्घकालीन उत्पादनाशी संबंधित कृषी तंत्र आहे, ज्यावर नंतर दही, घि, मलई इत्यादी. दुग्धजन्य पदार्थ मिळविण्यासाठी प्रक्रिया केली जाते. यामध्ये गायी, म्हशी, शेळी, मेंढ्या यांसारख्या दुग्धजन्य प्राण्यांचे व्यवस्थापन समाविष्ट असते. जनावरांची रोगांपासून ते खाण्यापिण्या पर्यंत काळजी घेतली जाते. आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांची नियमित तपासणी केली जाते. निरोगी प्राणी शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ असतो. त्या प्राण्यांचे हाताने किंवा यंत्राद्वारे दूध काढले जातात. दुधाचे जतन करून दुग्धजन्य पदार्थांमध्ये औद्योगिकरित्या रूपांतरित केले जाते, जे नंतर काही इतर व्यावसायिक कारणांसाठी वापरले जातात.

डेअरी फार्मवर काय उत्पादित केले जाते :

दुग्धशाळेत उत्पादित होणारे दूध अनेक वेगवेगळ्या पदार्थासाठी वापरले जातात, ज्यात चीज, दही, चॉकलेट, घी, कवळ्या असलेल्या दुधापासून पेनिस सुद्धा बनू शकतात, त्याचबरोबर हे व इतर अनेक लोकप्रिय प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. हे वरील दिलेल्या पदार्थांसाठी डेअरी फार्मवर उत्पादित केले जातात.

गायींना दूध वाढवण्यासाठी कोणते खाद्य चांगले आहे :

शेतकरी मित्रांनो आपल्याकडे गाय किंवा म्हशी असतात. ते जर आजारी पडले तर, आपण डॉक्टरांना बोलतो, आणि मग डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात. आणि गाय ठीक पण होते. परंतु याचा परिणाम असा होतो, की गाई आजारी पडल्यामुळे गाईचे दुधाचे प्रमाण कमी होतो. अशा आजाराने काय होतो, की गाय चारा खाने कमी करते, पाणी पिणे कमी करते. खाणे पिणे कमी केल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी होते. त्यासाठी आपल्याकडे उपाय असतो, की आपल्याकडे जी मसुरीची दाळ असते. ते दाळ दोन किलो घ्यायची,दोन किलो मसुराची डाळ का? घ्यायची, कारण गायला आपण दररोज चार किलो दाळ देणार आहोत.

तर ते कशाप्रकारे द्यायची हे आपण जाणून घेऊया, हे दाळ व्यवस्थित रित्या उकाळून घ्यायची, दाळ शिजवून घ्यावे त्यानंतर थंडी होऊ द्यायची. थंडी झाल्यानंतर आपली जी खडी साखर असते. ती भुगा करून घ्यायची आणि भुगा झाल्यानंतर ती खडी साखर दाळ मध्ये मिक्स करून संध्याकाळी गाईला द्यायचे. जेणेकरून गाईचे दूध शंभर टक्के वाढेल. हे वरील उपाय केल्याने तुमचे गाईचे दूध तर शंभर टक्के वाढेलच, त्याचबरोबर तुम्ही अजून एक उपाय करू शकतात. ते म्हणजे, तुम्ही गुवाचे पाणी सुद्धा गाईला प्यायला देऊ शकतात, जेणेकरून गाईच्या पोटातील जे काही घाण असतील, ते बाहेर पडेल आणि गाईचे काही दिवसातच दुधाच्या उत्पादनात वाढ होईल.

म्हशीचे दूध उत्पादन कसे वाढवायचे :

काही कारणामुळे म्हशीचे दूध उत्पादन कमी होतात.  म्हशीचे दूध का? कमी होतात, हे बघायला गेले तर याच्या मागे दहा-पंधरा कारणे असतात. परंतु यामध्ये अतिशय प्रमुख कारण म्हणजे, ते म्हणजे म्हशीची पचन समता व्यवस्थित नसणे, हे त्या ठिकाणी असतं, तर अनेक लोक दूध उत्पादन वाढवण्यासाठी बरेच माग पशुखाद्य खाद्य सुरक्षा मिलर, पिक्चर विटामिन त्यांना देत असतो. परंतु हे दिलेले आहार आहे, खाद्य आहे हे जनावर कशाप्रकारे पचवत किती कार्यक्षमतेने पचवत याच्यावर ते जनावर किती दूध देईल. हे त्यांच्यावर अवलंबून असतात. मग हे पहिले पचन संस्था कशी चांगली करायची. किंवा आपल्या जनावरची पचन संस्था बिघडली की काय हे समजून घ्यायच. म्हशीचे दूध वाढण्यासाठी त्याची पचन संस्था व्यवस्थित राहण हे अतिशय महत्वाचे असतात.

जर आपण म्हशीची पचन संस्था जर चांगली करत असलो. तर 90% म्हशीचे दूध त्या ठिकाणी वाढलेले असते. पचन संस्था जर चांगली करायची असली तर मार्केटमध्ये अनेक माग औषधी असतात. तर त्याला पर्याय म्हणूनच घरगुती उपाय आहे. त्यावर कुठलाही साईड इफेक्ट नाही. ते आपण मनुष्यप्राणी सुद्धा ते आहार घेऊ शकतो. तर त्या आहाराचे नाव आहे ते म्हणजे खाता सोडा जे आपण दाळ बट्टी मध्ये टाकून खातो. तर या खात्या सोडा बाबत बोलायचे तर हे खाता सोडा जनावरच्या ऍसिडिटी कम करण्यासाठी वापर केला जातो. जनावरांना ऍसिडिटी का होते, यावर तुम्ही विचार करत असाल, जे पशुपालक असतात, त्यांच्याकडे काही प्रमाणात हिरवा चारा कमी पडतो, आणि त्यामुळे आपण बऱ्याच प्रमाणात सुक्या साऱ्याचा प्रमाण वाढवतो, त्याचबरोबर पशु आहार पण खूप प्रमाणा वाढवतो. व काही ठिकाणी आपल्याकडे जे धान्य पिकत आहे. त्या धान्याचा उपाय आपण खुराक म्हणून म्हशीला देत असतो.

यामुळे होतं काय की बरसा सुका चारा होऊन जातो. त्याच्यामुळे पाणीची क्षमता कमी होते, आणि जनावरांना ऍसिडिटी होते. तर तुम्ही हा खाता सोडा वापरून म्हशीची ऍसिडिटी कमी करू शकतात. जेणेकरून काही दिवसातच म्हशीच्या दुधात उत्पन्नात वाढ होईल.

One thought on “दूध डेरी व्यवसाय संपूर्ण सविस्तर माहिती

  1. Greetings

    For a limited time we would like to offer you a NO-COST Reputation Video that you can put on your Website, LinkedIn, Facebook, Instagram etc.

    We simply turn your static 5 Star Reviews into SEO content and will be seen on the Front Page of Google when prospects are looking up your Online Reputation.

    What’s the Catch – excellent question – if you like the video we produce for you, all we need from you is 3 referrals. When you introduce them to us, and they decide to work with us, they will get a 50% Discount from our retail pricing. But you get it for NO-COST just for introducing them to us!

    GET YOUR NO-COST VIDEO HERE:
    https://YourFreeReputationVideo.repvids.com

    Thank You,
    Media Relations

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *