माझी कन्या भाग्यश्री योजना ! पात्रता काय? लाभ किती मिळणार?

माझी कन्या भाग्यश्री योजना ! पात्रता काय? लाभ किती मिळणार?

महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते. याच धोरणा अनुसरून राज्यातील मुलीसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यांमध्ये मुलीचे शिक्षण व आरोग्या  मध्ये सुधारणा करणे. मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे. याचबरोबर समाजामध्ये मुलीच्या जन्माविषयी नकारात्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलीच्या विषयी सकारात्मक विचार निर्माण करणे. हे मुख्य उद्देश आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम

 • सुकन्या योजना माजी कन्या भाग्यश्री योजना मध्ये समाविष्ट करण्यात असल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजना लागू राहतील त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार योजनेचा दाखला सादर करणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करताना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 •  योजनेमध्ये दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळेत जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील या योजनेच्या अंतर्गत 18 वर्षांनी मिळणारी डिपॉझिट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे पाहिजे त्याचबरोबर मुलगी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे
 • ही योजना दारिद्र्यरेषेखालील बीपीएल तसेच दारिद्र्यरेषेवरील एपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना लागू असेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ दिला मिळण्यात येईल त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना लागू राहील.

माझी कन्या भाग्यश्री योजना ! पात्रता काय? लाभ किती मिळणार?

माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये किती धन राशी मिळणार

पहिल्या प्रकरणांमध्ये कुटुंबामध्ये एका मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब योजना सक्रिय केल्यानंतर शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये पन्नास हजार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल यानंतर बँक मध्ये मुलीच्या नावाने मुदत ठेवीत गुंतवलेले पन्नास हजार रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. पुढे पुन्हा मुदत 50 हजार रुपये ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले. फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल. त्यानंतर पुढे पुन्हा पन्नास हजार रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी ध्येय असलेले व्याज प्लस  मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी मुलीला काढता येईल. कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन सक्रिय करणे आवश्यक असेल आणि असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50 हजार रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँक मध्ये मुदत ठेवी मध्ये जमा केलेल्या मुलीच्या वयानुसार देय असलेली व्यायाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना ! पात्रता काय? लाभ किती मिळणार?

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कागदपत्रे कोणती

 • लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे पालकाचे अधिकृत रहिवासी प्रमाणपत्र.
 • मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र.
 • लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करण्याला लाभार्थी कुटुंबाने दोन मुलीच्या नंतर कुटुंब योजना सक्रिय केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • बीपीएल श्रेणी रेशन कार्ड मिळकत प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र
 •  अर्जदाराचे मोबाईल नंबर
 • मुलीचे व मातेचे बँक पासबुक
 •  पासपोर्ट साईज फोटो

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कोठे करावा

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र पालकांनी ऑनलाइन फॉर्म पीडीएफ (PDF) डाऊनलोड करून किंवा योजनेच्या संबंधित कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज करून आपल्या विभागातील अंगणवाडी सेविकेच्या मदतीने संपूर्ण अर्ज तपशिलावर भरून अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेच्या संबंधित महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *