Startup Steps: व्यवसाय कसा निवडला जातो आणि नवीन व्यवसाय कसा  करावा 2024 मध्ये

Startup Steps: व्यवसाय कसा निवडला जातो आणि नवीन व्यवसाय कसा  करावा 2024 मध्ये

आजच्या लेखामध्ये नवीन व्यवसाय कसा करावा (Startup Steps) आणि  व्यवसाय कसा निवडला जातो हे बघणार आहोत. बरेच नवीन व्यवसायिकांना व्यवसाय कसा निवडावा, कसा करावा आणि व्यवसाय कसा वाढवावा हे माहिती नसते. व्यवसाय सुरू करताना कधीही दुसऱ्याचे पाहून व्यवसाय कधीही करू नका, कधीही स्वतःच्या आवडीचा व्यवसाय करावा. तुम्हाला काय आवडते त्याची लिस्ट तयार करा, त्यामध्ये दहा-बारा असे व्यवसाय लिहा. ज्यामध्ये तुम्हाला अधिक आवड आहे. त्यामधील एकच व्यवसाय निवडा. व्यवसाय निवडल्यानंतर तो बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे का, हे तपासून बघा. 

कारण आपल्याला बारही महिने उत्पन्न मिळायला हवा. जो व्यवसाय निवडला आहे. त्याची बाजारपेठेत किती मागणी आहे किती लोक ते विकत घेतात, त्याचे ग्राहक कोण आहे याचा निरीक्षण करा. जी वस्तू व्यवसाय म्हणून निवडली आहे, ती कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे. ते ठिकाण आपल्या शॉप पासून किती अंतरावर आहे, वाहतूक सुविधा आहे का याचा अभ्यास करा. 

startup-steps-in-marathi-2

ज्या वस्तूचा आपण व्यवसाय करणार आहोत, त्याचा सॅम्पल ग्राहकांना वापरण्यास द्या. त्याविषयी त्याचे मत व त्यांना वस्तू कशी वाटली, हे जाणून घ्या. त्यांच्या प्रक्रियेवर तुमचा व्यवसाय अवलंबून आहे. ती वापरण्यास किती योग्य आहे. तुमच्या वस्तूमध्ये किती गुणवत्ता आहे, किती टिकाऊ आहे, ग्राहकांचा  प्रतिसाद उत्तम असेल तर पुढे व्यवसाय करायला काही हरकत नाही. याची खात्री घ्या म्हणजे तुमचा व्यवसाय वाढेल. ज्या वस्तूचा तुम्ही व्यवसाय करणार आहात. त्या वस्तूचे उत्पादक कोण आहे. त्यांचे ठिकाण कोठे आहे याची माहिती पूर्णपणे घ्या.

कशामुळे एखाद्या गोष्टीचा व्यवसाय होतो?

व्यवसायाची वेगळी कल्पना:

तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात तो व्यवसाय आपण प्रत्येक दैनंदिन नुसार चालू असतो. त्यामुळे त्या मध्ये आणखी व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळी कल्पना वेळोवेळी बदलत्या काळा नुसार कशा निर्माण करू शकता. त्या गोष्टीकडे पूर्ण करणे लक्ष द्या.

भांडवल:

मित्रांनो व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल ही सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात तुम्ही जर तुमची बँक स्टेटमेंट तुमचे जर का सर्वे डॉक्युमेंट क्लिअर ठेवले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शासकीय योजना चा फायदा घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे एक नवीन बिजनेस लोन मना किंवा जर तुमचा बिझनेस स्ट्रॉंग असेल तुमच्या बिजनेस मध्ये इन्व्हेस्ट सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये उभे राहू शकतात.

startup-steps-in-marathi-3

व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन:

कोणत्याही व्यवसायामध्ये चढ-उतार असतातच. त्यामुळे एखादी गोष्ट जर का चुकीची आहे किंवा ही मला जमत नाही हा दृष्टिकोन काढून टाका. कारण व्यवसाया त सकार्यात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक गोष्टीतून  शिकण्यासारखा दृष्टिकोन ठेवा.

बिजनेस प्लॅन:

जो काही व्यवसाय करत आहेत त्या व्यवसायाचे बिजनेस प्लॅन तुमच्याकडे ऑलरेडी असले पाहिजे किंवा तुम्ही तयार केले पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्लॅनिंग नुसार अगदी लोकांपर्यंत पोहोचू शकतात. 

startup-steps-in-marathi-7

व्यवसायासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे:

व्यवसायासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे तुम्ही जो व्यवसाय करत आहात तो अंदाधुंदी करू नका. Food business असो की आणखी कोणताही असो त्यासाठी लागणारे जे काही कंपनीचे रजिस्ट्रेशन Documents असेल किंवा छोटासा उद्योग आधार असेल अशी जी छोटे-मोठे लायसन्स असतात. ही प्रत्येकाने वेळोवेळी तुमच्या व्यवसायासाठी documents काढली पाहिजे.

व्यवसायात संयम ठेवा:

संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीमध्ये असेल तोच व्यक्ती या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो.

बिजनेस पार्टनर चांगला निवडा:

लोक म्हणतात की पार्टनरशिप मध्ये केलेले व्यवसाय फेल ठरतात. अनेकांचे बिजनेस बुडतात. तर कोणताही व्यवसाय करताना जर का तुम्ही बिजनेस पार्टनर प्रॉपर निवडला आणि तुमची बिझनेस मधली होणारी इन्कम ची जी आओजाऊ आहे ती योग्य प्रकारे त्याची देवाणघेवाण केली तर तुम्हाला तुमच्या बिझनेस पार्टनर कडून धोकाही  नसतो आणि तुम्ही योग्यरीते मार्केटमध्ये काम करू शकता.

startup-steps-in-marathi-4

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे Basic मुद्दे असतात ते कुठले मुद्दे आहेत ते आपण पाहूयात.

  • लोकांची मागणी : लोकांची मागणी आपण जो व्यवसाय करणार आहेत. त्या व्यवसायाची लोकांना सेवा देणार आहोत जी वस्तू विकणारे आहोत. त्या प्रॉडक्टची मागणी किती प्रमाणात आहे. याचा आपण अगोदर याचा विचार केला पाहिजे. याची चाचणी केली पाहिजे. लोकांची मागणी काय लोकांचे कल कुठल्या गोष्टीकडे जास्त आहे. त्यानंतरच आपण त्या व्यवसायात पडले पाहिजे.
  • आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्धी कोणते? : आपला व्यवसायातील प्रतिस्पर्धी कोण आहे आपण व्यवसायामध्ये घुसण्या आधी आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत कारण आपल्या अगोदर तेच व्यवसाय करत असतील त्यानंतर आपणही तोच व्यवसाय सुरू केला असेल तर आपले प्रतिस्पर्धी कोण आहे ते आपण जाणून घेऊन आपण त्यांच्यापेक्षा अधिक चांगली सेवा  ग्राहकांना देऊ याचा आपण विचार करायला पाहिजे.
  • व्यवसाय विस्तार करण्याची संधी किती आहेत: आपण दोघ व्यवसाय करत आहे वर्षाला कमीत कमी दहा ते पंधरा टक्के अशी वाठ झाली पाहिजे. तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळतील. त्यामुळे असा कुठलाच व्यवसाय आहे ती त्याच्यामध्ये विस्ताराला खूप संधी आहेत असा व्यवसाय करायला काही हर कत नाही हरकत नाही.
  • आपला व्यवसायाचे लोकेशन: आपण ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू करणार आहोत जी सेवा लोकांना देणार आहोत त्या ठिकाणचे लोकेशन कसा आहे त्या ठिकाणचा एरिया कसा आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण की संपूर्ण व्यवसाय जो आहे यांच्यावरच डिफेन्स असतो. कारण लोकेशन हे खूप महत्त्वाचे आहे. कारण हे चांगले बाजार पेठ असल्यावरच त्या ठिकाणी व्यवसाय चालू करायला काहीच हरकत नाही.
  • व्यवसायात नफ्याचे प्रमाण किती: आपल्याला किती प्रमाणामध्ये नफा मिळणार आहेत या व्यवसायामध्ये मध्ये आपल्याला जास्त प्रमाणा त नफा मिळाला पाहिजे असाच व्यवसाय आपण निवडावा. कारण की बरेच वेळेस असं होतं की व्यवसाय चालू केल्यानंतर आपण लक्षात घेत नाही याचात  किती प्रमाणामध्ये नफा आहे ते.

startup-steps-in-marathi-5

तुम्ही हे देखील पाहू शकता: Phone pay, Paytam , Google pay, UPI वापरत असाल तर…

व्यवसाय विक्री वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

  •  ग्राहकाकडून वेळोवेळी प्रॉडक्ट सर्विस बद्दल प्रतिक्रिया घेत राहा त्याच्या अपेक्षा नुसार प्रॉडक्ट मध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करा.
  • जाहिरात कॅम्पेन सतत चालू ठेवा जाहिरात मध्ये खंड पडू देऊ नका.
  • प्रॉडक्ट डिझाईन मध्ये वेळोवेळी ठराविक कालांतराने बदल करणू त्याला नवीन रूप देण्याचे प्रयत्न करा.
  • शॉप असल्यास शॉप प्रेझेंटेशन मध्ये आणि सेटअप मध्ये वेळोवेळी सुधारणा करा प्रॉडक्ट प्रमाणेच शॉप मध्ये नाविन्यपूर्ण बदल करा. हे बदल केल्याने ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील.
  • विविध धार्मिक सणांना डिस्काउंट ऑफर ठेवा जसे की दिवाळी दसरा न्यू इयर इत्यादी.
  • आपल्या प्रोडक्टची कॅटेगिरी ग्राहकांसमोर मांडा.
  • विक्रीच्या ठिकाणी आपले प्रॉडक्ट लोकांचे लक्षवेधी अशा ठिकाणी ठेवा.

startup-steps-in-marathi-6

स्टेप बाय स्टेप व्यवसायाची सुरुवात कशी करावी

  1. व्यवसायाची योग्य निवड: व्यवसाय सुरू करताना व्यवसायाची योग्य निवड करणे खूप गरजेचे आहे.तुम्ही जर व्यवसायाची योग्य निवड केली नाहीय तर तुम्ही व्यवसायामध्ये सक्सेस होणार नाहीये तर व्यवसायाची निवड करताना काय करायचे आहे तुम्हाला कोणत्या व्यवसायामध्ये जास्त इंटरेस्ट तुम्हाला कोणती गोष्ट आवडते तुमचा स्किल कोणत्या गोष्टींमध्ये आहे तोच व्यवसाय  तुम्ही केला पाहिजे.
  2. व्यवसायाचा सर्वे करणे: व्यवसायाचा सर्वे म्हणजे काय मी ज्या जागेवर सर्वे करणार आहात ती जागा कुठे आहेत तुम्ही शहरात व्यवसाय करणार आहात की खेडेगावात व्यवसाय करणार आहात जर तुम्ही शहरांमध्ये व्यवसाय करणार असाल तर त्या शहरांमध्ये जागा कशी आहे जागा कुठे आहे त्या जागे वर त्या एरियामध्ये त्या व्यवसायाला मागणी आहे का तो व्यवसाय तिथे चालेल का या सर्व गोष्टी बघणं गरजेचे आहे.
  3. व्यवसाय सेटअप: आता आपण व्यवसायाचा सर्वे केला जागेची निवड केली आता. तुम्हाला व्यवसाय डिझाईन करायचा फॉर एक्झाम्पल तुमचा शॉप असेल तर तुम्हाला तो डिझाईन व्यवस्थित करावा लागेल इंटेल असेल मालाची मान्य असेल आणि काही गोष्टी असतील जागा व्यवस्थित क्लीन केली पाहिजे आजूबाजूची जागा डेकोरेट केली पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवसायाच्या सेटअप मध्ये गरजेचे आहे.
  4. व्यवसायाचे उद्घाटन: व्यवसायाचे ओपनिंग करणे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या मित्र मंडळी असतील आजूबाजूचे असतील मार्केटमधील व्यापारी मंडळी असतील आणि तुमचे जोडलेली लोक असतील सर्वांना बोलून तुम्हाला ओपनिंग एक ग्रँड ओपनिंग घेणे गरजेचे आहे तरच तुमचा व्यवसाय जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त ग्राहक तुम्हाला जोडले  जातील.
  5. मार्केटिंग व्यवसायातला: अविभाज्य घटक आहे जर तुम्ही मार्केटिंग व्यवस्थित केलं तर तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालणार आहे आणि तुम्ही व्यवसायामध्ये यश मिळू शकता आता मार्केटिंग करताना बरेच गोष्टी करणे गरजेचे त्यामध्ये ऑनलाईन मार्केटिंग ऑफलाइन मार्केटिंग असेल माऊथ पब्लिसिटी असेल तुम्हाला जास्तीत जास्त जे लोक जोडलेले आहेत ते मार्केटिंग मध्ये तुम्हाला उपयोग होईल आता ऑनलाईन मार्केटिंग करत असताना तुम्हाला फेसबुक आहे व्हाट्सअप आहे इतर स्पेशल मीडिया आहे या सर्व गोष्टींमधून मार्केटिंग जास्तीत जास्त करून जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे मग आणि तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक खेचून आणायचं आहे तर तुम्हाला व्यवसायाची ओपनिंग दर्जेदार घ्यायची आहे.
  6. व्यवसायाचे रजिस्ट्रेशन: व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करणे खूप गरजेचे आहे तुमचा जर व्यवसाय नगर पालिकेच्या क्षेत्रामध्ये असेल तुम्हाला नगरपालिकेचा मंजुरी घेणे गरजेचे आहे जर तुमचा व्यवसाय महानगरपालिके च्या क्षेत्रामध्ये असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची मंजुरी घेणे त्याचबरोबर गव्हर्मेंट चे उत्तम रजिस्ट्रेशन असेल शॉप ॲक्ट लायसन असेल हे पूर्ण तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागतं.
  7. व्यवसायासाठी शासकीय सबसिडी: काही जणांचे आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असते ते व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करतात. व्यवसायासाठी सबसिडी च्या शोधात असतात. आता गव्हर्मेंट सबसिडी खूप आहेत तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कोणती सबसिडी घेऊ शकता याचं तुम्हाला शोध करणे गरजेचे आहे. त्यानुसार तुम्हाला सबसिडीची अप्लाय करायचे आहे आणि कुठली योजना आपल्या व्यवसायासाठी आहे.

अधिक माहिती साठी खालील VIDEO पाहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *