खर्च बचत करून शेतकरी आपले उत्पन्न कसे वाढवू शकतात! जाणून घेऊया! : भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.आणि देशातील जास्तीत जास्त लोकं हे शेतीवर अवलंबून आहेत.म्हणजेच भारतीय शेतकरी लोकांची परिस्तिथी एवढी चांगली नाही. आणि त्यामुळे ते आपला जास्तीत जास्त उदरनिर्वाह हे शेतीतूनच चालवतात.आणि आता बघितले तर कृषी क्षेत्रात व्यापक बदल होत असलेले दिसून येत आहेत. त्यामुळे जर शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवून यशस्वी बनायचे असेल तर शेतकऱ्याला जसे काळ बदलत आहेत, अशा बदलत्या काळाप्रमाणे अपडेट राहणे आवश्यक आहे.आणि त्यामागे अनेक प्रकारची कारणे आहेत.त्यामुळे शेतकरी कितीही मेहनत करतो, परंतु पिकांचे उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीचा नफा हा मिळत नाही.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत.एकाच प्रकारे आणि एकच पीक सातत्याने घेतल्याने उत्पन्नात वाढ होत नाही. आणि शेतीचेही नुकसान होते.
चला तर मग जाणून घेऊयात, की शेतीतील कोणत्या बदलामुळे होईल उत्त्पन्नात वाढ?
जसे की आपण बघितले एकाच प्रकारे आणि एकच पीक सातत्याने घेतल्याने उत्त्पन्नात वाढ होत नाही. आणि शेतीचेही नुकसान होते.त्यामुळे सतत एकाच प्रकारचे पीक घेऊ नये.त्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामानुसार बदल करून पिके घ्यावीत.कारण यामध्ये पारंपरिक पिके घेतांना बदलत्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातून कमी उत्पन्न मिळू शकते.परंतु पिकांमध्ये बदल आणि शेडनेटमुळे उत्पन्नात वाढ होते.त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी.तर जाणून घेऊयात त्यासाठी काही टिप्स ज्याच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल.
शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार अपडेट राहणे
बदलत्या काळानुसार शेतकऱ्याने नेहमी अपडेट राहणे आवश्यक आहे.कारण कृषी क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत असलेले दिसून येत आहेत.आणि आता बघितले तर दिवसेंदिवस शेती सोप्या पद्धतीने करण्यासाठी यंत्रांचे आधुनिकिकरण केले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अपडेट राहणे आवश्यक आहे.जर शेतकरी अपडेट राहिले तरच आपल्या मेहनतीचा लाभ घेऊ शकतील.त्यामुळे त्यांचा खर्च वाचेल आणि सोबत वेळही वाचेल.
घरी बिया तयार करणे
शेतकऱ्यांनी स्वतः बिया तयार करून वापरावे. त्यामुळे त्यांचा खर्च वाचवता येतो.परंतु शेतकरी पेरणीसाठी बाजारातून बियाणे विकत घेतात. आणि त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो.पण विकत घेतलेल्या बियांमध्ये बहुतांश बियाणे प्रमाणात नाहीत.आणि त्यांचे उत्पादन हे 10% कमी आहेत.त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी बियाणे हे स्वतः तयार करून वापरणे चांगले. त्यामुळे त्यांचा खर्च देखील वाचू शकतो.
शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीचा वापर करणे
शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीचा वापर करून कृषीतज्ञाशी सल्लामसलत करून चांगली बियाणे निवडून त्याची लागवड करावी. यामुळे उत्पन्नात वाढ होईल.त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती हा फायदेशीर व्यवसाय होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
माती परीक्षण करणे
पिके लावण्याआधी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.कारण परीक्षण केल्याने त्यातून पिकाला आणि मातीला किती पोषण आवश्यक आहे ते समजते.आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पोषक घटकांची फवारणी करायला सोपे जाते.आणि योग्य प्रमाणात खते देण्याचे सुद्धा देखील समजते. त्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे.
शेतातील झाडे झुडपे जाळणे टाळावे
कारण आपण अनेकदा काय करतो तर शेतातील पिकांची कापणी झाली, की निर्जन शेतात झाडे झुडपे वाढतात.आणि शेतकरी काय करतात, शेतात पुन्हा पिकांची पेरणी करण्यासाठी जी झुडपे वाढलेली असतात त्यांना ते काढत नाहीत. तर ते जाळून टाकतात. आहे काय होते याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होतो. म्हणून झुडपे ही काढून त्याचे खत म्हणून वापरणे चांगले.
My Name is Bhagyashri Chavan, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles