खोकला आणि सर्दी यावर घरगुती रामबाण उपाय

खोकला आणि सर्दी यावर घरगुती रामबाण उपाय

खोकला आणि सर्दी यावर घरगुती रामबाण उपाय : सध्या हिवाळा ऋतू चालू आहे. आणि आठवड्याभरापासून वातावरणात अनेक वेगवेगळे बदल होत असलेले दिसून येत आहेत. कधी ऊन पडते तर कधी सावली,या वातावरणातील बदलाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असलेला दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकल्याचे प्रमाणही वाढत आहे. आणि त्यामुळे सर्दी खोकल्याचा रुग्णांमध्ये ही वाढ होत आहे. तर सर्दी, खोकला झाला असेल, तर तो होऊ नये यासाठी  आपण काही घरगुती रामबाण उपाय बघणार आहोत. तर ते खालील प्रमाणे :

  •  मीठ आणि पाणी
  •  लसुन मध आणि लिंबाचा रस
  •  कोरफड
  •  तुळशी
  • हळद आणि दूध
  •  कोमट पाणी
  •  आवळा
  •  अद्रक चहा

खोकला आणि सर्दी यावर घरगुती रामबाण उपाय

खोकला सर्दी यावर घरगुती उपाय

मीठ आणि पाणी :

एक ग्लास उकळलेले गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ घाला.आणि त्याचे गुळगुळीत मिश्रण बनवा. आणि त्या मिश्रणाने दिवसातून दोन किंवा तीन वेळेस गार्गल करा.यामुळे खोकला आणि सर्दी कमी होण्यास मदत होईल. तर हा उपाय खोकला आणि सर्दी यासाठी वापरला जाणारा एक घरगुती रामबाण उपाय आहे.

 लसुण, मध आणि लिंबाचा रस :

एक चमचा मध, दोन चमचे लिंबाचे रस आणि एक चतुर्थांश चमचे लसूण पेस्ट घ्या. हे सर्व मिक्स करून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट बनवा. आणि जोपर्यंत तुमची सर्दी कमी होत नाही, तोपर्यंत या मिश्रणाचा सेवन करा. यामुळे तुमची सर्दी आणि खोकला हे दूर होण्यास मदत होईल. तर हा उपाय सुद्धा देखील तुमच्या सर्दी आणि खोकला यासाठी एक रामबाण घरगुती उपाय आहे.आणि हा उपाय नियमित करा.

 कोरफड :

कोरफडाचे रस आणि मध हे दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून मिश्रण बनवा. आणि हे दोन्ही मिक्स करून प्यायल्याने खोकला आणि सर्दी दूर होण्यास मदत होते. तर हा सुद्धा खोकला आणि सर्दी साठी एक  घरगुती रामबाण उपाय आहे.

 तुळशी :

खोकला झाला असेल तर त्यासाठी उपाय म्हणून तुळशीच्या उपयोग केला जातो. तर त्यासाठी काही तुळशीची पाने तोडून घ्या आणि त्या पानांचा रस बनवा. हे रस प्यायल्याने खोकला आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. तर खोकला आणि सर्दी साठी हा सुद्धा एक घरगुती रामबाण उपाय आहे. आणि तुम्ही तो करू शकता.

 हळद आणि दूध :

एक ग्लास दूध घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे हळद मिक्स करा. दुधामध्ये हळद मिक्स करून त्याचे चांगले मिश्रण बनवा. हळद आणि दूध हे खोकला आणि सर्दी साठी आयुर्वेदिक आहे असे मानले जाते. हे प्यायल्याने देखील रोगांपासून सुद्धा आपला बचाव होतो. या दुधामुळे आपल्याला ताकद येते.जर तुमचा घसा दुखत असेल, तर हे दूध प्यायल्याने काही वेळातच तुमचा घसा चांगला होईल. तर सर्दी आणि खोकल्यासाठी हळद आणि दूध देखील एक घरगुती रामबाण उपाय आहे.

 कोमट पाणी :

कोमट पाणी पिणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. कोमट पाणी प्यायल्याने  गळ्याभोवती झालेली सूज ही कमी होते. सतत कोमट पाणी पिल्याने सर्दी आणि खोकला यांच्या विरुद्ध लढण्यास मदत होते. कोमट पाणी पिल्याने आपले आरोग्य हे चांगले राहते. त्यासाठी दररोज कोमट पाणी आपण प्यायला पाहिजे. तर कोमट पाणी हा सुद्धा देखील एक  घरगुती रामबाण उपाय आहे.

आवळा :

आवळ्याचे सेवन केल्याने रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. तसेच यकृतचं काम सुरळीत करण्यासाठी देखील आवळा मदत करतो. आवळ्यामध्ये मजबूत  रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळे तो बऱ्याच आजारांविरोधात लढतो. त्यामुळे आवळ्याचे सेवन केले पाहिजे. तर आवळा हा सुद्धा देखील एक घरगुती रामबाण उपाय आहे.

 अद्रक चहा :

अद्रक चहा प्यायल्याने आपल्याला फ्रेश वाटते. अद्रक चहा मुळे शोषण मार्गातील घाण बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे यापासून आपल्याला दिलासा मिळतो. अद्रक चहा प्यायला ने केवळ आपल्याला फ्रेशच वाटत नाही ,तरसर्दी आणि खोकला बरा होण्यास मदत होते.  त्यासाठी अद्रक चहा प्यायला पाहिजे. तर अद्रक चहा सुद्धा देखील सर्दी आणि खोकला बरा होण्यासाठी एक घरगुती रामबाण उपाय आहे.

खोकला आणि सर्दी यावर घरगुती रामबाण उपाय

खोकला आणि सर्दी बरा होण्यासाठी काय करावे?

  1.  हवेशीर खोलीत झोपायला हवे
  2.  नियमित चालणे
  3.  हरबल चहा पिणे
  4.  गरम पाणी प्यायला हवे
  5.  मिठाच्या पाण्याने गार्गल करायला हवे
  6.  नियमित योग आणि व्यायाम केले पाहिजे
  7.  केस धुतल्यानंतर आपले केस व्यवस्थित कोरडे करा

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *