स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया(SAIL) मध्ये इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांच साठी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून 200 पेक्षा अधिक वेकेन्सी निघालेल्या आहेत.
GATE 2024 परीक्षेमध्ये चांगले स्कोर मिळाले असतील अशाही उमेदवारांना अप्लाय करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी साठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे व ही भरती 25 जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
या भरतीमध्ये एकूण 249 इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांच साठी भरती होणार आहे व ही भरती GATE परीक्षे मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर होणार आहे.
या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी GATE परीक्षेच्या रजिस्ट्रेशन नंबर चे आवश्यकता असणार आहे म्हणजेच जे उमेदवार GATE 2024 च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशाच उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांच साठी जागा रिक्त आहेत ते खालील प्रमाणे:
कम्प्युटर – 9 जागा
सिविल – 21 जागा
इलेक्ट्रिकल – 61 जागा
इलेक्ट्रॉनिक – 5 जागा
इन्स्ट्रुमेंटेशन – 11 जागा
मेकॅनिकल – 69 जागा
मेटालार्जी – 61 जागा
केमिकल – 10 जागा
कॅटेगरी नुसार जागा:
जनरल कॅटेगिरी – 103 जागा
ओबीसी – 67 जागा
ईडब्ल्यूएस – 24 जागा
एससी – 37 जागा
एसटीसाठी – 18 जागा
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया च्या या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी इंजिनीयर असायला पाहिजे कम्प्युटर सिविल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स केमिकल इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल आणि मेटालार्जी अशा इंजिनिअरिंगच्या 65% सह इंजिनिअरिंगची डिग्री असायला हवी.
एससी, एसटी आणि विभागीय उमेदवारासाठी 55% सह इंजीनियरिंग डिग्री असायला हवी.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय:
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 25 जुलै 2024 पर्यंत 28 वर्ष असायला हवे म्हणजेच 25 जुलै 1996 च्या अगोदर उमेदवाराचा जन्म नसायला पाहिजे
कसे होणार सेलेक्सन:
या भरतीमध्ये GATE 2024 मार्क्स नुसार मेरिट लिस्ट बनणार आहे त्यानंतर जे उमेदवार मिरीट लिस्ट मध्ये येणार आहेत त्यांना ग्रुप डिस्कशन किंवा मुलाखतीसाठी बोलविले जाणार आहे. जर दोन उमेदवाराचे कट ऑफ सारखे असतील तर GATE परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे सिलेक्शन केले जाणार आहे.
किती असणार फीस:
या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी व तसेच ईडब्ल्यूएस कॅटेगिरी च्या उमेदवारांना 700 रुपये एप्लीकेशन फी असणार आहे आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी व विभागीय उमेदवार यांना एप्लीकेशन फी ₹200 असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही भरतीची ऑफिशियल नोटिफिकेशन पहावी
My Name is Jagdish Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles