महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 28/06/2024 रोजी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत अविवाहित मुलगी, विवाहित महिला, घटस्फोटीत महिला, परित्यक्तत्या महिला आणि निराधार महिला अशा सर्व महिलांना लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी नारीशक्ती दूत एप्लीकेशन (App) च्या मदतीने करू शकता आणि ज्यांना ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे ते फॉर्म डाउनलोड करून फॉर्म भरून संबंधित अधिकाऱ्याकडे ते जमा करू शकता.
या योजनेसाठी राज्यातील महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे व तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांचे अर्ज येतील त्या महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेचा शासन निर्णय तुम्ही या https://www.maharashtra.gov.in/ वेबसाईट वरती पाहू शकता.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार:
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेमध्ये राज्यातील विवाहित, विधवा महिला, घटस्फोटीत महिला, परित्यक्तत्या महिला आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित मुलगी योजनेसाठी पात्र असणार आहेत.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी वयाची पात्रता काय आहे?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी वरील पात्र महिला किंवा अविवाहित मुलगी यांनी कमीत कमी वयाचे 21 वर्ष व जास्तीत जास्त वयाचे 65 वर्ष पूर्ण असायला हवे 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त महिला किंवा मुलगी या योजनेसाठी पात्र नाहीत.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
- महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र.
- ज्या लाभार्थी महिलांकडे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र नसेल त्यांनी त्या महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र देणे महत्त्वाचे आहे.
- जर लाभार्थी महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल तर आणि अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यासाठी लाभार्थी महिलेला तिच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थी महिलांना देणे आवश्यक आहे.
- ज्या लाभार्थी महिले कडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्या महिला पिवळे व केसरी रेशन कार्ड उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागेवर देऊ शकता.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र नाहीत:
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी खालील लाभार्थी पात्र नाहीत
- ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला किंवा अविवाहित मुलगी या योजनेसाठी पात्र नाही.
- जर एकाच घरामध्ये दोन अविवाहित मुली आहेत त्यांपैकी फक्त एकच मुलगी या योजनेसाठी पात्र आहे
- ज्यांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहे असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत
- ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत
- सरकारी कर्मचारी अपात्र असतील.
- जर लाभार्थी 1500 किंव्हा त्यापेक्षा जास्त रकमेचा सरकारी योजनेचा लाभ घेत असेल.
सदर योजनेची माहिती तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती घेऊ शकता.
My Name is Satyanews Web Desk, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Dynamic Articles