PF धारकांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे गव्हर्मेंट कडून दिली जाणार अशी अपेक्षा PF धार करत आहेत, गेल्या आर्थिक वर्षात PF व्याजाचे दर 10 आधार पॉइंट नुसार वाढवून 8.25 टक्के केले आहे त्यामुळे आता PF धारकांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे सरकार जमा करणार अशी अपेक्षा केली जात आहे.
(EPFO) च्या संघटनेने PF च्या व्याजदरामध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती त्यामुळे आर्थिक वर्ष 2023 24 साठी PF चे व्याजदर 8.15 टक्क्या वरून 8.25 टक्के एवढे वाढून दिले होते त्यामुळे आता व्याजाचे पैसे सरकार अकाऊंट मध्ये ट्रांसफर करेल अशी अपेक्षा केली जात आहे.
त्यामुळे PF चे व्याज अकाऊंट मध्ये केव्हा येणार याची उत्सुकता पगारदार लोकांना लागली आहे तर चला जाणून घेऊया आजच्या या लेखामध्ये.
ईपिफओने च्या अधिकाऱ्याने एका सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की व्याज देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच ती तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये दिसेल सोबतच त्यांनी असे सांगितले की संपूर्ण व्याजाची रक्कम एकाच वेळी दिली जाईल त्यामुळे PF धारकांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की अर्थसंकल्पानंतर म्हणजेच 23 जुलै रोजी हे व्याज अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles