शेतीशी संबधित पाच हजारात व्यवसाय सुरू करून कमवतो 5 लाख रुपये महिना – साई वर्धन:

शेतीशी संबधित पाच हजारात व्यवसाय सुरू करून कमवतो 5 लाख रुपये महिना - साई वर्धन:

आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस बेरोजगार वाढत आहे त्यातच काही असे तरुण आहेत जे दुसऱ्या तरुणांना रोजगार देत आहे, त्यापैकीच एक साई वर्धन या 23 वर्षीय तरुणाने फक्त पाच हजारात व्यवसाय सुरू करून आज महिन्याला 5 लाख रुपये कमावतो.

तर मग चला जाणून घेऊया साई वर्धन ने काय केले आणि कसे एक सक्सेसफुल व्यवसाय सुरू केले.

कोण आहे साई वर्धन?

साई वर्धन आंध्र प्रदेश मधील थोटापल्ली  गावाचा तरुण आहे ज्याने बेंगलोर मधील कॉर्पोरेट नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करण्याअगोदर साई वर्धन 2017 ते 2019 वर्षी त्याने दोन वर्षाचा डिप्लोमा केला आणि लगेचच नोकरी करू लागला.

त्याला नोकरीमध्ये 22000 पगार मिळत होते परंतु त्याची इच्छा झाली की आपल्याला एक व्यवसाय सुरू करायचे आहे म्हणून त्याने 2021 वर्षी Farm Org Foods नावाची कंपनी सुरू केली आणि आता कमावतो महिन्याला पाच लाख रुपये.

 

साई वर्धन ची कंपनी Farm Org Foods काय काम करते?

साई वर्धन चे शेतीशी जुने नाते होते म्हणून त्याने विचार केला आपल्याला शेतीशी संबंधितच व्यवसाय करायचे आहे आणि त्याने Farm Org Foods नावाची शेतीशी संबंधित कंपनी सुरू केली. या कंपनीमध्ये तो ऑरगॅनिक आंबे विकू लागला त्यानंतर त्याने विचार केला की त्याच्या आईचा जो लोणचं बनविण्याच्या व्यवसाय होता त्याला पुढे नेले पाहिजे म्हणून त्याने सोशल मीडियाच्या मदतीने स्वतःचे जे प्रॉडक्ट आहेत त्याचे मार्केटिंग करू लागला.

त्यामुळे लोकांचा विश्वास साई वर्धन जिंकू लागला आणि त्याचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात विक्री होऊ लागले. साई वर्धन ची कंपनी पुढे जाऊ लागली मग त्याने विचार केला की आपल्याला यामध्येही काहीतरी नवीन करायला पाहिजे.

साई वर्धन ने कंपनीमध्ये नवनवीन प्रॉडक्ट तयार करू लागले आणि विकू लागले:

कंपनीचे ऑरगॅनिक आंबे, लोणचं असे प्रॉडक्ट जगभर प्रसिद्ध होऊ लागले. त्या प्रॉडक्ट ला भारतामध्येच नव्हे तर अमेरिकेत व तसेच ब्रिटनमध्येही त्यांच्या प्रॉडक्टची मागणी वाढू लागली, म्हणून साई वर्धन आता कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळे भाज्या तसेच लोणचं असे प्रॉडक्ट बनवत आहे आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ठिकाणी देखील विकत आहे.

तरुणांना काय शिकायला पाहिजे?

साई वर्धन याने फक्त 5000 रुपयात व्यवसाय सुरू केला आणि दुसऱ्या तरुणांना रोजगार देऊ लागला त्यामुळे तरुणांना काही जर नवीन करायचे असेल तर फक्त करण्याचे प्रामाणिक इच्छा आणि चिकाटी महत्त्वाची असते. खूप साऱ्या समस्या येतात आणि जातातही, खूप सारे प्रयत्न यशस्वी होतात तसेच अयशस्वी ही परंतु आपली जिद्द चिकाटी आणि मेहनत एक दिवस आपल्याला यशस्वी बनवते.

हि स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कॉमेंट मध्ये जरूर कळवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *