आजच्या लेखामध्ये कमी गुंतवणुकीत आणि खर्चात भारतात कोणते व्यवसाय फायदेशीर आहे , ते आपण आज बघणार आहोत. प्रत्येक जण म्हणतात की माझ्याकडे पैसे आले की मग मी काहीतरी करेल पण पैसा म्हणतो, की तू आधी काहीतरी कर मग मी तुझ्याकडे येईल. सरकारी नोकरीचा आणि कॉर्पोरेट नोकरीचा खुळ हळूहळू कमी होत आहे. आणि लोक व्यवसायाकडे वळत आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की धंदा सुरू करण्यासाठी लोकांकडे भांडवल नाही आणि जर तुम्ही या लोकांमध्ये वळत असतील तर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल परंतु तुमच्याकडे जर गुंतवणूक जास्त नसेल. तर या लेखामध्ये आपण असे अनेक व्यवसाय बघणार आहोत जे कमी गुंतवणुकी चांगले फायदे देणारे व्यवसाय.
कॉफी शॉप व्यवसाय :
आपण हा व्यवसाय 7 मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत.
व्यवसाय करण्याची पद्धत : व्यवसाय करण्याची पद्धत म्हणजे काय ? खूप कमी गुंतवणुकीमध्ये एक चांगला प्रकारचा सेटअप लावने आणि या सेटअप मधून खूप चांगला किंमतीमध्ये कस्टमरला चांगल्या प्रकारची व्हरायटी उपलब्ध करून देणे.. म्हणजेच कस्टमरला खूप चांगल्या प्रकारची टेस्ट देणे. म्हणजेच व्यवसायाची पद्धत होय.
जागा (स्पॉट): जागा म्हणजेच स्पॉट स्पॉट हा आपला असा विचार करून निवडायचा असतो कारण त्यात स्पॉट वरती आपला धंदा असतो सगळाच नाही पण बराच पैकी जागेचा विचार करून त्याची निवड करायची असते. गर्दीचे ठिकाण पहिले पाहिजे. त्यानंतर शांतताही असायला पाहिजेत.
मेनू : मेनू मध्ये जे काही कॉफी चे प्रकार आहेत कूल कॉफी, थीककॉफी, हॉट कॉफी हे जे सगळे प्रकार आहे हे तुमच्या मेनूमध्ये असायला हवेत.
सेटअप : सेटअप कसा असायला पाहिजे सेटअप हा एकदम साधा सरळ असणार आहे जो की एक काउंटर असणे म्हणजे जो एक स्टॉल असेल तिने साईटला बंद असेल आणि फक्त समोरच्या साईटला उघड असेल याच्या आत मधलं ग्लास असतील खूप असतील मिक्सर असतील असे अनेक वस्तू सेटअप मध्ये लागतील अशा प्रकारे साधे सोपे सेटअप लावू शकता.
गुंतवणूक : गुंतवणूक म्हणजे काय आपण करणारा खर्च किंवा आपल्याकडून होणारा खर्च याला म्हणतो आपण गुंतवणूक. जो आपण स्टॉल सुरू करतोय ना त्याला 25 ते 30 हजार शंभर टक्के खर्च होणार.
मार्केटिंग : मार्केटिंग कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे जेणेकरून हा जो मार्केटिंगचा विषय आहे तो सोडवता येईल. याच्यामध्ये काय करू शकतो. आपण सगळ्यात गोष्ट आपल्याकडे काय आहेत 25 रुपयात आपण कॉपी विकतो जी की मार्केटमध्ये 40 ते 45 विकतात ते आपण 25 ते 30 विकतोय याच्यामध्ये काय होईल खूप चांगली क्वालिटी दिल्यानंतर, खूप रेट दिल्यानंतर लोकं वाढतील याप्रकारे जर आपण स्वतःच्या व्यवसायाची मार्केटिंग केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.
नफा : नफा म्हणजे प्रॉफिट हे आपल्याला किती होणार आणि कसे होणार हे पाहूया आपण जर एक कॉफी सेल करत आहोत तर एका कॉफीचा खर्च येतो बारा ते तेरा रुपये पंधरा रुपये आपल्याला मागे राहतो. आपल्याला दहा रुपयाचा नफा एका कॉफी मागे. म्हणजे दिवसाचा नफा हजार किंवा बाराशे रुपये एवढा होणार.
पोहा निर्मिती व्यवसाय :
हा उद्योग महाराष्ट्रात करता येईल का? त्याला नेमका कोणता व्हरायटीज लागतात? त्यासाठी कोणत्या मशनरीच लागतात ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट किती लागेल या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पोहा निर्मिती व्यवसाय असे म्हणता येईल की महाराष्ट्र मध्ये सकाळच्या नाष्ट्यामध्ये सगळ्यात जास्त वापरणा जाणारा पदार्थ म्हणजे अगदी नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत सगळ्यात जास्त वापर केला जातो असं म्हणता येईल की सकाळचा नाश्ता पोहे हे एक अविभाज्यक घटक बनले आहे.
हा जो महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात जो सकाळच्या वेळी खाल्ला जातो. हे जे पोहे आपल्या इथे उत्पादित होतात का? तर बऱ्याच जणांचा उत्तर येईल की नाही आपल्याकडे रॉ मटेरियल म्हणजेच राईस महाराष्ट्रात उत्पन्न होत नाही. हा पोहा गुजरात किंवा राज्याकडून आपल्याकडे येतो. आणि मग आपल्याकडे त्याचा कच्चा मालच आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण कसं काय त्याचं प्रोटेक्शन करायचं असा एक साधा प्रश्न सगळ्यांचा डोक्यामध्ये पडणं एक स्वाभाविक आहे. तर मला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करायची जर महाराष्ट्र मध्ये पोहे मिल सुरू झालं तर ते फक्त कोकणात तर विदर्भातील काही भागांत नाहीतर अगदी प्रत्येक भागात सुरू झालं आणि जर कच्चा माल जर जवळच्या भागांमधून किंवा जवळच्या राज्यांमधून जसं की नाशिक आहे. गोंदिया आहे, कोकणात मोठा भाग आहे किंवा आंध्र प्रदेश आहे भागात जर हा प्रकल्प सुरू झाला या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे.
आपल्याकडे हा जो पोहा विकला जातो. त्याचे दोन प्रकार आहेत एक सुट्टा पोहा आणि दुसरा म्हणजे पॅकिंग पोहा. हा जो पॅकिंग पोहा आहे हा मेजर ली गुजरातील नौशान या भागांमधून येतो. आपल्याकडे मनाव तसं पोहा मध्ये ब्रँडिंग झालेलं नाही. पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. जर हा उद्योग आपल्याकडे सुरू झाला, कच्चामाल जर या भागांमधून आपण उपलब्ध करू शकलो तर आपण ज्या भागांमध्ये राहतो ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तिथे हा उद्योग आपण सुरू करू शकतो. ब्रॅण्डिंग जरी विकला तरीसुद्धा हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकतो. किंवा सुरुवातीला नॉन ब्रांडींनी जरी विकला तरी पोहे हे मेल अशाच आशेने पोहे हे मागले जातात. तिथे सुद्धा प्रचंड स्कोप आहे सुरुवातीला साधारणतः एक टन च्या आसपास जर का हे युनिट आपल्याला उभं करायचं असेल तर सर्वसाधारणपणे सात ते आठ लाख खर्च अपेक्षित आहे त्यामध्ये तीन चार प्रकारच्या मशिनी आहेत. या व्यवसायासाठी जागा आपल्याला 500 ते 1000 स्क्वेअर फुट एवढी कमीत कमी जागा लागेल. शेड आपल्याला महत्त्वाचं लागेल तिथे रोजच कमीत कमी दीड ते दोन हजार लिटर पाण्याची आपल्याला सोय लागेल त्यासाठी लागेल पाण्याची टाक्या सुद्धा बांधावा लागतील.
हे उद्योग जर छोट्या स्वरूपात सुरू करायचा असेल तर कमीत कमी किमतीचा मशीन जरी घेतलं तरी चार ते पाच लाख हा उद्योग गाची सुरुवात करू शकतो या उद्योगाला सध्या आपल्याकडे खूप जास्त स्कोप आहे त्यामुळे जर आपण टप्प्याटप्प्याने जर याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला या संधीचा लाभ होईल कारण तुलानामक रित्या या उद्योगाची फारशी माहिती नसल्यामुळे अज्ञान असल्यामुळे आपल्याकडे अजून तेवढे प्रकल्प सुरू झाले नाही त्यामुळे सध्या यामध्ये स्पर्धा कमी आहे भविष्यात जर आवरनेस वाढत गेला. तरी स्पर्धा आली तरीसुद्धा मागणी प्रचंड असल्यामुळे फारशी देखील चिंता नसावी त्यामुळे नवउद्योजक काहीतरी वेगळे करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे किंवा एखादा वेगळा उद्योजक सुरू करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे त्यांच्यासाठी पोहा मिल उद्योग हा अतिशय फायदेशीर उद्योग आहे.
RO PLANT चा व्यवसाय :
RO Plant या व्यवसायाची खासियत या व्यवसायामध्ये काम अतिशय कमी आणि फायदा भरपूर आहे. पाणी हे जीवन आहे. शुद्ध पाण्याची व्यवस्था प्रत्येक भागात नसते त्यामुळे तुम्ही आरओ प्लांट टाकून शुद्ध पाणी तुम्ही लोकांना देऊ शकता. यासाठी लागणारे भांडवल अगदी छोटा प्लांट असेल तर वीस लाखापर्यंत ते 50 लाखापर्यंत यासाठी भांडव लागतं. जागा 150 ते 200 स्क्वेअर फुट. त्याच्यासाठी मशीन ची किंमत भरपूर आहे. लेबर तुम्ही एक ते दोन धरू शकता. याच्यामध्ये दररोजचा नफा जर मोठा मशीन बसवला तर 4 000 हजार पर्यंत नफा तर महिन्याला जवळपास दहा लाखापर्यंत तुम्ही कमवू शकता.
कपड्यांचा व्यवसाय :
कपड्यांच्या व व्यवसायाची खासियत या डिमांड भरपूर आणि घरच्या घरी करता येणारा व्यवसाय, हा व्यवसाय अतिशय मागणी असलेला व्यवसाय आहे. त्याच्यासाठी लागणारे भांडवल फक्त कच्चा माल म्हणजे जो कपडे विकत घेणार आहेत फक्त त्यासाठी म्हणजे अगदी दहा पाच हजारापासून चालू करू शकता. गृह उद्योग म्हणून सुद्धा चालू करू शकता म्हणजेच घरातूनच. म्हणजेच जागेची किंमत नाही. मशीन ची किंमत झिरो. दररोजचा नफा म्हणजे यामध्ये 30 ते 40 टक्के नफा असतो. महिन्याला नफा म्हणजे सुरुवातीला 10000 ते 15000 हजार होईल. तीस ते पस्तीस हजार पन्नास हजार महिन्याला नफा होऊ शकतो.
My Name is Ashvini Jadhav, I Work as a Content Writer for Satyanews and I like Writing Articles
Thanks.