या शेळीचे पालन करा आणि 1 किलो मटन 3000 ते 3500 हजार ला विका – Goat Farming :

या शेळीचे पालन करा आणि 1 किलो मटन 3000 ते 3500 हजार ला विका - Goat Farming :

Goat Farming Business : या प्रकारची शेळीपालन करून शेळीपालक लाखो रुपयांचा मालक बनू शकतो कारण या शेळीचे वजन 110 ते 135 किलो पर्यंत जाते आणि या प्रकारच्या शेळी जास्त करून महाराष्ट्र मध्येच दिसून येतात. आज आपण ही शेळी कोणत्या प्रकारची आहे आणि या शेळीचे पालन कोठे केली जाते व या शेळीचे किंवा बोकडाचे मास तीन ते साडे तीन हजार रुपये किलोने कशाप्रकारे विकले जाते याची माहिती पाहणार आहोत.

आजच्या परिस्थितीमध्ये पशुपालन हेच शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन बनत चाललेले आहे काही वर्षांपूर्वी शेती हेच शेतकऱ्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन होते परंतु आता दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चाललेली आहे त्यामुळे शेतीसोबतच पशुपालन हेदेखील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन बनलेले आहे.

हे कोणत्या प्रकारची शेळी आहे?

आज आपण माहिती घेणार आहोत “साऊथ आफ्रिकन बोअर शेळीची”. या शेळीच्या व बोकड्याच्या 1 किलो मासाची किंमत 3000 ते 3500 किलोपर्यंत आहे, कारण या जातीच्या शेळीच्या आणि बोकड्या च्या मासाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे हे शेळीची प्रजाती आपल्या महाराष्ट्रातील पुणे, सांगली व तसेच कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात या प्रजातीची शेळीपालन करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत.

कशी दिसते ही शेळी आणि किती आहे वजन?

या प्रजातीच्या बोकडाची लांबी 70 CM होते तर बकरी ची लांबी 50 CM पर्यंत असते. या प्रजातीच्या शेळी आणि बोकडे यांची त्वचा सफेद असते व तसेच यांची मान थोड्याशा लाल कलरची असते तसेच या प्रजातीचे कान लांब असते जे खाली लटकत असतात. या प्रजातीचे वजन हे 110 ते 135 किलो पर्यंत असते, प्रजातीच्या वयोमानानुसार यांचे वजन कमी-जास्त होत जाते.

या प्रजातीच्या शेळीना कुठे आहे मागणी?

या प्रजातीच्या शेळी आणि बोकडांना वेगवेगळ्या जागेवरून मागणी होत असते विदेशातही या शेळीसाठी मोठी मागणी आहे, तसेच या प्रजातीचे मास खाण्यासाठी चांगले लागत असल्यामुळे मोठ मोठ्या हॉटेलमध्येही या शेळी आणि बोकडाची मागणी जास्त प्रमाणात होताना दिसते आणि तसेच याची किंमतही मोठ्या प्रमाणात शेळीपालन करणाऱ्या व्यवसायिकांना मिळत असते आणि मोठा नफा यातून शेळीपालक व्यवसायिक करून घेत असतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *