इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय आणि पावतीची वाट पाहत आहात तर अशी करा डाउनलोड:

इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय आणि पावतीची वाट पाहत आहात तर अशी करा डाउनलोड:

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर लगेचच इन्कम टॅक्स रिटर्न विभागाकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याची पावती दिली जाते परंतु जर तुम्ही इन्कम टॅक्स भरलेला आहे तरी तुम्हाला पावती मिळाली नाही तर ती पावती कशाप्रकारे डाऊनलोड करायची ही माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर लगेचच पावती टॅक्स भरणाऱ्या उमेदवाराच्या ई-मेल वरती पाठवली जाते तरीही जर पावती तुम्हाला मिळालेली नसेल तर ती तुम्ही कशी डाऊनलोड करू शकता हे आज आपण पाहणार आहोत.

केव्हा तयार होती ही एकनॉलेजमेंट पावती?

जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा आरटीआर-वी वरून पावतीची संख्या म्हणजेच पावतीचा नंबर तुम्ही बघू शकता जो की तुमच्या रजिस्टर केलेल्या ईमेल आयडी वरती पाठवला जातो त्यानंतर तुम्ही ई-फाइलिंग पोर्टल ला भेट देऊन सबमिट केलेले फॉर्म हा ऑप्शन निवडून पावती वरील संख्येचा कन्फर्मेशन करून घेऊ शकता.

काय असते ही एकनॉलेजमेंट पावती?

जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एखाद्या व्यक्ती द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरला जातो तेव्हा त्या व्यक्तीला एक रिटर्न पावती दिली जाते आणि त्या पावती मध्ये एक ट्रेकिंग नंबर असतो ज्याद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारी व्यक्ती संपूर्ण माहिती त्या ट्रेकिंग नंबर द्वारे पाहू शकता जेव्हा ही पावती तयार केली जाते तेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या व्यक्तीला समजून येते की आपला इन्कम टॅक्स रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न डिपार्टमेंटला पोहोचलेला आहे.

पावती डाउनलोड कशी करायची?

इन्कम टॅक्स रिटर्न ची पावती डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्स रिटर्न च्या पोर्टल वरती जाऊन लॉगिन करावे लागते, पोर्टल वरती लोगिन माय अकाउंट या टॅबमध्ये जाऊन ‘ई-फाइलिंग प्रोसेसिंग स्थिति’ या टॅबमध्ये जाऊन तुम्ही पावती डाऊनलोड करू शकता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *